Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील उद्योग

महाराष्ट्रातील उद्योग | जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील उद्योग, जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील उद्योग: महाराष्ट्र राज्याला उद्योगांमधील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात शेती भरपूर प्रमाणात केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग प्रामुख्याने शेतीवर आधारित आहेत. राज्यात स्थापित केलेल्या विविध औद्योगिक संस्थांमुळे येथील उद्योगांना चालना मिळाली आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून महाराष्ट्रातील उद्योग यावर हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्रातील उद्योग यावर सविस्तर माहित घेणार आहोत.

महाराष्ट्रातील उद्योग : विहंगावलोकन

महाराष्ट्रातील उद्योग : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय महाराष्ट्राचा भूगोल
उपयोगिता जिल्हा न्यायालय परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव महाराष्ट्रातील उद्योग
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • महाराष्ट्रातील उद्योग: उद्योगांचे प्रकार
  • महाराष्ट्रातील उद्योग: मोठे उद्योग
  • महाराष्ट्रातील उद्योग: लघु उद्योग
  • महाराष्ट्रातील उद्योग: जिल्ह्यानुसार उद्योग कोणते

उद्योग म्हणजे काय?

आपण उद्योग कशाला म्हणू शकतो? कच्च्या मालावर प्रक्रिया करून उपयुक्त असा पक्का माल तयार करणे म्हणजे उद्योग होय. काही उद्योगामधून तयार होणारा पक्का माल हा पुढील उद्योगासाठी उपयुक्त असतो. उद्योगाचा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक घटकांच्या जीवनावर परिमाण होत असतो. उद्योगांमुळे नवनवीन शहरे विकसित होतात. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारखी शहरे उद्योगामुळे विकसित झाली आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग: उद्योगांचे प्रकार

महाराष्ट्रातील उद्योगांचे प्रकार: महाराष्ट्र राज्य हे विविध प्रकारच्या उद्योगांनी समृध्द असे राज्य आहे. राज्यात साखर, सुती कापड, औषधे, खते, वाहने, संरक्षण साहित्य, रसायने, विविध प्रकारची विद्युत उपकरणे, कागद, काचसामान इत्यादीचे उत्पादन प्रामुख्याने होते. महाराष्ट्रातील उद्योगांचे मोठे उद्योग, लघुउद्योग, कुटीरोद्योग असे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

1. मोठे उद्योग:

मोठ्या जागेत, मोठ्या भांडवलावर व मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी जे उद्योग उभारले जातात, त्यांचा समावेश मोठ्या उद्योगांमध्ये होतो. उदा. कापड उद्योग, साखर उद्योग इ. या प्रकारच्या उद्योगांचा समावेश मोठ्या उद्योगांमध्ये होतो.

2. लघु उद्योग:

कमी जागेत, कमी भांडवल गुंतवून  व कमी प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी जे उद्योग उभारले जातात, त्यांचा समावेश लघुउद्योगांमध्ये होतो. हे उद्योग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. अनेक मोठ्या उद्योगांना लागणारे छोटे छोटे भाग तयार करणारे लघुउद्योग मोठ्या उद्योगांच्या जवळपास असतात. लघुउद्योग प्रामुख्याने बाजारपेठांच्या आसपास विकसित होतात. उदा. प्लॅस्टिकच्या विविध वस्तु गोतीची अवजारे, धातूंची भांडी तयार करणे, तेलगिरण्या इत्यादी या प्रकारच्या उद्योगांचा समावेश लघुउद्योगांमध्ये होतो.

3. कुटीरोद्योग:

टोपल्या, चटया, मातीची भांडी, पापड, उदबत्त्या इत्यादी तयार करणे या घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीरोद्योग म्हणतात. या उद्योगांतील बहुतांश माल स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. महाराष्ट्राच्या सर्वच भागांत वेगवेगळे कुटीरोद्योग आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग: मोठे उद्योग

महाराष्ट्र राज्यात अनेक मोठ्या प्रकारचे उद्योग आहेत. त्यातील काही प्रमुख उद्योग आपण या लेखात पाहणार आहोत.

  • कापड उद्योग: कापड उद्योग हा राज्यातील एक महत्त्वाचा व अतिशय जुना उद्योग आहे. कापड उद्योग हा कापसाच्या शेतीवर आधारित उद्योग आहे. सूतगिरणी आणि कापड उद्योग हे एकमेकांना पूरक उद्योग आहेत. पूर्वी मुंबई शहर हे कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. महाराष्ट्रात एकूण 104 कापड गिरण्या आहेत.  आता यंत्रमागांद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव, येवला व इचलकरंजी ही महत्त्वाची केंद्रे आहेत.
  • साखर उद्योग: साखर उत्पादनात महाराष्ट्राचा देशात आघाडीवर असून 34% पेक्षा जास्त साखर उत्पादन महाराष्ट्र राज्य करते. साखर उद्योग महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ऊस लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात साखर निर्मितीसाठी लागणारा उस हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होतो, म्हणून येथे साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत.

वरील दोन प्रमुख उद्योगसोबत वाहन निर्मिती, रसायन, औषध निर्मिती,  संरक्षण साहित्य निर्मिती, तेल शुद्धीकरण, सिमेंट निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान अशा प्रकारचे मोठे उद्योगही महाराष्ट्रत आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग: लघु उद्योग

महाराष्ट्र राज्यात काही प्रमाणात लघु उद्योग आहेत. त्यातील काही प्रमुख उद्योग आपण या लेखात पाहणार आहोत.

  • कागद उद्योग: राज्यात बांबू, लाकूड, उसाची चिपाडे इत्यादी कच्चा माल वापरून कागदाची निर्मिती केली जाते.  बल्लारपूर, पुणे, खोपोली, कन्हान, पैठण या ठिकाण कागद उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो.
  • तेलगिरण्या: राज्यात सुर्यफुल, भुईमुग इत्यादी कच्च्या मालापासून तेल निर्मिती केली जाते. जळगाव, सांगली, आकोला, धुळे या जिल्ह्यांमध्ये तेलगिरण्या आहेत.

वरील उद्योगांसोबत शेतीची अवजारे, धातूंची भांडी तयार करणे, मद्य निर्मिती या उद्योगांचा समावेश लघुउद्योगांत होतो. हे उद्योग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विखुरले गेले आहेत. अनेक मोठ्या उद्योगांना पूरक लघुउद्योग मोठ्या उद्योगांच्या जवळपास असतात. लघुउद्योग प्रामुख्याने बाजारपेठांच्या परिसरात विकसित झालेले असतात.

महाराष्ट्रातील उद्योग: जिल्ह्यानुसार उद्योग कोणते

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील प्रमुख उद्योग आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत.

जिल्हा उद्योग
सोलापूर कापड निर्मिती, सूतगिरणी, विडी निर्मिती, कुंकू निर्मिती, विणकाम
वाशिम हातमाग, कापड निर्मिती, रेशम निर्मिती, रायानिक खत निर्मिती
वर्धा कापड निर्मिती, हातमाग, साखर निर्मिती
सिंधुदुर्ग खनिज संप्पतीवर आधारित उद्योग, वस्त्र उद्योग, लाकडी खेळणी तयार करणे
लातूर सूतगिरणी, साखर निर्मिती, प्लास्टिक बूट व चप्पल निर्मिती
यवतमाळ कागद निर्मिती, कोळसा निर्मिती, साखर उद्योग, तेल निर्मिती
नागपूर यंत्र उद्योग, खत निर्मिती, सूतगिरणी,
मुंबई कापड उद्योग, चित्रपट निर्मिती, माहिती व तंत्रज्ञान, वाहन निर्मिती, तेल शुद्धीकरण
पुणे यंत्र उद्योग, काचसामान, वाहन निर्मिती, माहिती व तंत्रज्ञान, साखर निर्मिती
नांदेड साखर उद्योग,
कोल्हापूर साखर उद्योग , चित्रपट निर्मिती
नंदुरबार जिनिंग व प्रेसिंग, सुतगिरणी, औषधे व सुगंधित तेल निर्मिती
ठाणे कापड उद्योग, औषध निर्मिती,
जळगाव जिनिंग व प्रेसिंग, साखर उद्योग, रेशीम कापड निर्मिती, तेल गिरण्या, युद्ध साहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग

महाराष्ट्रातील उद्योग: काही महत्वाचे

  • महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात मिळून एकूण 18 प्रमुख उद्योग आहेत.
  • मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात अनेक उद्योग विकसित झाले आहेत. हे ‘औद्यौगिक त्रिकोण’ म्हणून ओळखले जाते.
  • भारताच्या एकूण औद्यौगिक उत्पदानाच्या स्थूल मुल्यापैकी 21% स्थूल उत्पदान मूल्य महाराष्ट्रात होते.
  • महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना मध्ये बेलापूर (अहमदनगर) येथे स्थापन करण्यात आला.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्रात एकूण प्रमुख उद्योग किती आहेत?

महाराष्ट्रात एकूण 18 प्रमुख उद्योग आहेत.

महाराष्ट्रातील उद्योगाचे प्रकार किती व कोणते?

महाराष्ट्रातील उद्योगांचे मोठे उद्योग, लघुउद्योग, कुटीरोद्योग असे तीन प्रमुख प्रकार आहेत.

महाराष्ट्रातील 'औद्यौगिक त्रिकोण' कोणत्या क्षेत्राला म्हटले जाते?

मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात अनेक उद्योग विकसित झाले आहेत. हे 'औद्यौगिक त्रिकोण' म्हणून ओळखले जाते.