Table of Contents
महाराष्ट्राचे हवामान
महाराष्ट्राचे हवामान: कोणत्याही भौगोलिक क्षेत्रावर किंवा पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी अनेक वातावरणीय आविष्कार एकाच वेळी घडून आल्यामुळे वातावरणाला जी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीला त्या वेळेचे हवामान असे म्हणतात. वातावरणाची ती तत्कालीन स्थिती असते. वातावरणीय दाब, वाऱ्यांची दिशा व वेग, तापमान, ढगांचा विस्तार, ढगांच्या तळपृष्ठाची उंची आणि त्यांचे प्रकार, आर्द्रता, वर्षण आणि त्याचे विविध प्रकार, दृश्यमानता इ. भौतिक घटकांवर व त्यांच्यातील क्रिया-प्रक्रियांवर हवामान अवलंबून असते. हे भौतिक घटक सातत्याने बदलत असतात. हवामानही त्याप्रमाणे सारखे बदलत असते. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे येथील हवामानात वैविध्य आढळते. पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीमुळे अडविले जाऊन प्रतिरोध पाऊस पडतो. आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती 2023व इतर स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्राच्या हवामानावर बऱ्याचदा प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण महाराष्ट्राचे हवामान या घटकाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
महाराष्ट्राचे हवामान | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | जिल्हा न्यायालय आणि सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | महाराष्ट्राचा भूगोल |
लेखाचे नाव | महाराष्ट्राचे हवामान |
महाराष्ट्राचे हवामान
महाराष्ट्राच्या पश्चिमेस विशाल अशी सह्याद्रीची पर्वतरांग असल्याने महाराष्ट्राचे विविध प्राकृतिक विभाग तयार होतात. त्यानुसार महाराष्ट्राचे हवामान हे प्रत्येक प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे आहे. प्रत्येक वातावरणीय घटक वातावरणाचे विशेष गुणधर्म दर्शवितो. निरनिराळ्या घटकांमुळे व आविष्कारांमुळे वातावरणाला एक प्रकारचे भौतिक स्वरूप प्राप्त झालेले असते, त्याला हवामान-संहती किंवा वातावरणीय आविष्कारांचा समूह (वेदर सिस्टीम) असे म्हणतात. त्यात भूपृष्ठावरील तसेच उच्च वातावरणातील सर्व पातळ्यांवर प्रतीत होणाऱ्या आविष्कारांचा समावेश करण्यात येतो. मानवी व्यवहारांचा हवामानाशी फार घनिष्ठ संबंध असतो. मानवी व्यवहारांचे असे एकही अंग किंवा उपांग नाही की, ज्याचा हवामानाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध घडून येत नाही. या दृष्टीने हवामानाच्या निरीक्षणांत सूर्यप्रकाशाचे प्रमाण, उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा, समुद्रपृष्ठावरील लाटांची उंची व तरंगलांबी आणि भूमिपृष्ठावर निर्माण होणारे महापूर यांसारख्या घटनाही अंतर्भूत केल्या जातात.
महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल अत्यंत महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्राचा हवामान प्रकार:- उष्णकटिबंधीय मोसमी
- महाराष्ट्रातीत पर्जन्य नैऋत्य मोसमी वा-यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो.
- कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी 2500 ते 3500 मिमी.
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण 700 मिमी. अंबोली, सिंधुदुर्ग
- कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस- आंबेसरी
- पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारे जिल्हे – सोलापूर, अहमदनगर
- अवर्षणग्रस्त भागात पर्जन्यमान 500 मिमीहून कमी महाराष्ट्रातील ऋतु संक्रमणाचा महिना ऑक्टोबर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेली ठिकाणे – मालेगांव (1902), देवळाती (1960)
- सह्याद्री पर्वतच्या पश्चिम उतारावर पडणारा पाउस हा प्रतिरोध प्रकारचा असतो
- समुद्रावरुण येणारे वारे पश्चिम घाटामुळे कोकणात अडवले जातात यामुळे कोकणात प्रतिरोध पाउस पडतो
- महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्हा करतो
- भारतात सर्वाधिक पर्जन्य मौसिनराम तर महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य आंबोली या ठिकाणी होते
- महाराष्ट्र पठारावर हवामान कोरडे तर कोकणचे हवामान हे सम आहे.
- महाराष्ट्राच्या हवामानावर सह्याद्री पर्वतचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.
- उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा नागपूरला सर्वात जास्त तर अकोल्याला सर्वात कमी असते.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर येथे आढळते.
- दख्खनच्या पठारावर हवामान आद्र तर पठारी प्रदेशातील तापमान विषम प्रकारचे असते.
- विजांच्या कडकडासह मुसळधार पाउस पडणे हे आवर्त पर्जन्याचे उदाहरण आहे.
- दिवसा समुद्राकडून जमीनीकडे वाहणारे वारे म्हणजे खारे वारे तर रात्री जमीनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे म्हणजे मतलाई वारे होय.
- जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असतो कारण हवा विरळ असते.
- हवा बाष्प सम्पृक्त होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हणतात.
- नागपूरला उन्हाळ्यात आद्रता बरीच कमी असते.
- समभार रेषा एकमेकींना जवळ असतात याचा अर्थ वायुभाराचे उतारमाण तीव्र आहे.
- महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वारा आगमन व निर्गमन यामध्ये अनिश्चितता असते तर ऑक्टोबर-नोवेम्बेर महिन्यादरम्यान मान्सून वारे माघारी फिरतात.
- मान्सून या शब्दाचा अर्थ मौसमीपणा असा होतो.
- मान्सून प्रदेशात नैऋत्य मैसमी वारे यामुळे पाउस पडतो तर पश्चिमघाटाच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात.
- सूर्याची तिरपे किरणे पडतात त्यामुळे हिवाळ्यात महाराष्ट्रात काही वेळा तापमानात अचानक घट होते.
- बाष्पीभवनामुळे वतवरणाच्या तापमानावर कोणताही बदल होत नाही.
- एल नीनो म्हणजे दक्षिण प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह आहे.
- महाराष्ट्रात एकूण पर्जन्यपैकी 100% पर्जन्य नैऋत्य मैसमी वाऱ्यांमुळे होते.
- महाराष्ट्रात उन्हाळ्यातसुद्धा माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळ या ठिकाणी हवा ठंड असते.
प्राकृतिक विभाग | हवामानाची विविधता |
कोकण | उष्ण, सम व दमट हवामान |
सह्याद्री (प.घाट) | थंड व आर्द्र हवामान |
महाराष्ट्र पठार | उष्ण, कोरडे व विषम हवामान |
महाराष्ट्रातील पर्जन्य
साधारणतः जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मान्सूनचे महाराष्ट्र राज्यात आगमन होते. राज्यातील सर्वासाठीच पावसाचे आगमन हे सुखकारक असते. महाराष्ट्रातील शेती, धरणे, उधोगधंदे यांना लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा यामुळे होतो भारतामध्ये एकूण 15 हवामान विभाग आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 03 हवामान विभाग आहेत. महाराष्ट्रातील विविध पर्जन्य विभागाबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.
अति पर्जन्य विभाग : या विभागात 250 ते 400 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात जांभा प्रकारची मृदा आढळते. जांभा मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या मातीस लाल रंग प्राप्त झाला आहे. संबंधीत विभागात दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग आहे.
अति पर्जन्याचा विभाग : या विभागात 225 ते 300 मिली मीटर पाऊस पडतो. या विभागात जांभा विरहीत मृदा आढळते. तांबुस किंवा तपकिरी रंगाची मृदा येथे आढळते. रायगड, ठाणे, मुंबई हा भाग यात येतो,
पश्चिम घाट माथा विभाग: या विभागात 300 ते 500 मिली मिटर एवढा पाऊस पडतो. या विभागात काळी भरडी मृदा आढळते. हा विभाग सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सातारा यांच्या काही भागामध्ये आढळते.
पर्जन्य छायेचा विभाग: या विभागात 75 ते 125 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात काळसर व करडी मृदा आढळते. नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्हृयाचा काही भाग येथे ही मृदा आढळते.
अवर्षण विभाग: या विभागात 50 ते 70 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात खरीब व रब्बीची पिके घेतली जातात. येथील मृदा चुनखडी युक्त काळी मृदा आहे. सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, धुळे या जिल्हयांचा काही भाग या विभागात येतो.
निश्चित पाऊस विभाग: या विभागात 70 ते 100 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागातील मृदा ही मध्यम काळी मृदा आहे. मराठवाडा व विदर्भाचा पश्चिम भाग जळगाव, बुलढाणा अमरावती या जिल्हयांमध्ये ही मृदा आढळते.
मध्यम जास्त पर्जन्य पावसाचा विभाग: या विभागामध्ये 90 ते 125 मिली मिटर एवढा पाऊस पडतो. या विभागामध्ये तपकिरी काळी मृदा आढळते. नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्हयाचा उत्तर भाग, वाशिम, परभणी येथे ही मृदा आढळते.
जास्त पर्जन्याचा पुर्व विदर्भ विभाग: 125 ते 175 मिली मिटर एवढा पाऊस पडतो. तपकिरी तांबडी मृदा आढळते. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्हयामध्ये आढळते.
महाराष्ट्राचे हवामान: नमुना प्रश्न
प्रश्न1. महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व ______ जिल्हा करतो.
- सोलापूर
- कोल्हापूर
- नागपूर
- चंद्रपूर
उत्तर. (b)
प्रश्न 2. दक्षिण प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाहाला काय म्हणतात?
- अल कीनो
- विली विली
- एल नीनो
- एल चीनो
उत्तर. (c)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.