Table of Contents
भौतिक राशींचे मापन
भौतिक राशींचे मापन: जिल्हा न्यायालय भरती 2023(Jilha Nyayalay Bharati) मध्ये कनिष्ठ लिपिक व शिपाई/हमाल संवर्गातील पदांच्या परीक्षेत विज्ञान विषयास अनन्य साधारण महत्व आहे. विज्ञान हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात भौतिक राशींचे मापन या घटकावर थोडक्यात माहिती पाहणार आहे.
भौतिक राशींचे मापन: विहंगावलोकन
भौतिक राशींचे मापन: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | जिल्हा न्यायालय भरती परीक्षांसाठी उपयुक्त |
विषय | विज्ञान |
लेखाचे नाव | भौतिक राशींचे मापन |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
भौतिक राशी
आपण दररोजच्या दैनंदिन प्रक्रियेत असंख्य वस्तू व पदार्थांचे मोजमाप करत असतो. उदा. भाजीचे वजन, वाहनांचा वेग इत्यादी. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. भौतिक राशींचे परिमाण (Magnitude) सांगण्यासाठी मूल्य (Value) व एकक (Unit) यांचा वापर करतात.
राशींचे प्रकार
अदिश राशी (Scalar Quantity)
केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, म वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य म इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ क परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर न होतो. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर, 101° फॅरनहाइट ताप इत्यादी.
सदिश राशी (Vector Quantity)
परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान.
मापन पद्धती
1.एमकेएस (MKS) पद्धती – या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत मोजतात. एमकेएस या मापन पद्धतीमध्ये त लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन होते.
2.सीजीएस (CGS) पद्धती – या मापन पद्धतीत लांबी सेंटिमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदात मोजतात.
3.एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती : सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती System International (SI) सध्या जगभरात वापरली जाते. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धती असेही म्हणतात. यानुसार लांबी, वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे सोबतच्या तक्त्यामध्ये दिली आहेत.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.