Marathi govt jobs   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती...   »   DMER प्रवेशपत्र 2023
Top Performing

DMER प्रवेशपत्र 2023 जाहीर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

DMER प्रवेशपत्र 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 07 जून 2023 रोजी DMER प्रवेशपत्र 2023 जाहीर आहे. एकूण 5182 पदांसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर एक नोटीस जाहीर केली त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील रिक्त पदांची भरती परीक्षा दिनांक 12 ते 20 जून 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर भरती मधील सर्व पदाचे DMER प्रवेशपत्र 2023 उमेदवारांच्या लॉगीन खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज या लेखात आपण DMER प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

DMER प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

DMER प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे आहे. TCS मार्फत परीक्षा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची परीक्षा 12 ते 20 जून 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. DMER प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DMER प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER)
भरतीचे नाव

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023

लेखाचे नाव

DMER प्रवेशपत्र 2023

पदांची नावे
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ग्रंथपाल
  • स्वच्छता निरिक्षक
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ
  • आहारतज्ञ
  • औषधनिर्माता
  • डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
  • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
  • ग्रंथालय सहाय्यक
  • व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
  • दुरध्वनीचालक
  • महिला अधिक्षीका / वॉर्डन
  • वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
  • अंधारखोली सहाय्यक
  • क्ष-किरण सहाय्यक
  • सांखिकी सहाय्यक
  • दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
  • भौतिकोपचारतज्ञ
  • दंत तंत्रज्ञ
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
  • विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
  • नेत्रचिकित्सा सहाय्यक
  • डायलेसिस तंत्रज्ञ
  • शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
  • शिंपी
  • सहाय्यक दंत तंत्रज्ञ
  • मोल्डरूम तंत्रज्ञ
  • लोहार / सांधाता
  • वाहनचालक
  • गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
  • क्ष किरण तंत्रज्ञ
  • सुतार
  • कातारी- नि जोडारी
  • जोडारी मिश्री / बॅचफिटर
  • वरिष्ठ लिपिक
  • अधिपरिचारीका
  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

5182

DMER प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
DMER परीक्षेची तारीख 2023 12 ते 20 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

DMER प्रवेशपत्र 2023 ची नोटीस

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER) ने 12 ते 20 जून 2023 च्या दरम्यान होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. 07 जून 2023 रोजी जाहीर झालेली DMER प्रवेशपत्र 2023 ची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DMER प्रवेशपत्र 2023 नोटीस

DMER प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

DMER प्रवेशपत्र 2023 दिनांक 07 जून 2023 रोजी जाहीर झाले असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DMER प्रवेशपत्र 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना 09 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 2023 10 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2023 25 मे 2023
DMER प्रवेशपत्र 2023 07 जून 2023
DMER भरती परीक्षेची तारीख 2023 12 ते 20 जून 2023
PCMC Hall Ticket 2022
Adda247 Marathi Application

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/देत/ आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय व सर्वप्रित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोगा केंद्र विभागात गट क परिचर्या व तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा – २०२३ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दि. 12 जून ते दि. 20 जून, 2023 या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. यासाठीचे DMER प्रवेशपत्र 2023 उमेदवारांच्या लॉगिन आयडी वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

DMER प्रवेशपत्र 2023
DMER प्रवेशपत्र 2023 नोटीस

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

DMER प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @med-edu.in ला भेट द्या.
  • त्यानंतर नवीन संदेश (New) वर क्लिक करा.
  • तिथे जाहिरात 2023-24 वर क्लिक करा
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे दिल्या अर्ज लिंक वर क्लिक करा.
  • आता आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • तिथे Action टॅब मधील Eye बटनावर क्लिक करा.
  • आता आपले DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करून घ्या

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या DMER भरती परीक्षेत चांगले गुण घ्यायचे असल्यास आपल्याला वैद्यकीय संशोधन संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने दोन विभाग आहे तांत्रिक पदे व अतांत्रिक पदे या भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम सविस्तर स्वरुपात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

DMER प्रवेशपत्र 2023 जाहीर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा_7.1

FAQs

DMER प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

DMER प्रवेशपत्र 2023 दिनांक 07 जून 2023 रोजी जाहीर झाले.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षा 2023 कधी होणार आहे?

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षा 2023 दिनांक 12 ते 20 जून या कालावधीत होणार आहे.

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक मला कोठून मिळेल?

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.