Marathi govt jobs   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती...   »   DMER परीक्षा विश्लेषण 2023
Top Performing

DMER परीक्षा विश्लेषण 2023, ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेचे विश्लेषण तपासा

DMER परीक्षा विश्लेषण 2023

DMER परीक्षा विश्लेषण 2023: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 13 जून 2023 रोजी ग्रंथपाल सहाय्यक पदाची परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. सहाय्यक ग्रंथपाल पदाच्या परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार सहाय्यक ग्रंथपाल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण 13 जून 2023 रोजी झालेल्या सहाय्यक ग्रंथपाल पदाच्या DMER परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

DMER परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

ग्रंथपाल सहाय्यक पदाची परीक्षा 13 जून 2023 रोजी घेण्यात आली होती. ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेचे विश्लेक्षण या लेखात देण्यात आले आहे. DMER परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DMER परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER)
भरतीचे नाव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023
लेखाचे नाव DMER परीक्षा विश्लेषण 2023
पदांचे नाव

ग्रंथपाल सहाय्यक

DMER ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेची तारीख 2023 13 जून 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
एकूण गुण 200
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

 

DMER परीक्षेचे स्वरूप 2023 (ग्रंथपाल सहाय्यक)

DMER भरती परीक्षा 2023 अंतर्गत ग्रंथपाल सहाय्यक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 90 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी 30 60
4 तांत्रिक विषय 40 80
एकूण 100 200  

DMER परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट

ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 12-13 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 12-13 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी 26-27 सोपी ते मध्यम
4 तांत्रिक विषय 36-37 सोपी ते मध्यम
एकूण 86-90 सोपी ते मध्यम

विषयानुरूप DMER परीक्षा विश्लेषण 2023

ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न आणि तांत्रिक विषयातील एकूण 40 असे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयानुसार DMER परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

DMER परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

ग्रंथपाल सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या DMER परीक्षा 2023 मध्ये मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, उतारा यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
शब्दांच्या जाती 4
लिंग 1
समानार्थी शब्द 1
विरुद्धार्थी शब्द 1
वचन 1
म्हणी व वाक्प्रचार 2
समास 2
उतारा 3
एकूण 15

DMER ग्रंथपाल सहाय्यक परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी विषयाचे विश्लेषण

DMER भरती परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Singular-Plural form, Passage, Sentence rearrangement, Error detection, Incorrect spelling यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Passage (Story Based) 3
Parts of Speech 4
Sentence Rearrangement 2
Error Detection 2
Incorrect Spelling 1
Voice 1
Narration 1
Tense 1
Total 15

DMER परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास  2
भूगोल  3
चालू घडामोडी  4
विज्ञान 2
स्टॅटिक जी.के  4
एकूण  15

सामान्य ज्ञान या विषयात विचारलेले काही प्रश्न खालील प्रमाणे आहे.

  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली?
  • स्टेट बँक ऑफ इंडियाचे अगोदरचे नाव काय होते?
  • बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय कोठे आहे?
  • रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरवात कधी झाली?
  • युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे?
  • CRR म्हणजे काय?
  • ताजमहाल कोणी बांधला?
  • सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
  • टीव्हीचा शोध कोणी लावला?
  • मोरुस्काचे उदाहरण कोणते आहे?

DMER परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

DMER भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी यात गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांचा समावेश होतो. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने पदावली, मिश्रण, संख्या मालिका पूर्ण करणे, टक्केवारी, रेल्वे, अक्षरमाला, नातेसंबंध, आकृत्या पूर्ण करणे आणि जोड्या जुळवणे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
पदावली 2
रेल्वे 1
नफा तोटा 1
शेकडेवारी 1
बोट व प्रवाह 1
शब्दकोशानुसार योग्य मांडणी 1
अक्षरमाला 2
संख्यामाला 2
घड्याळ 1
नातेसंबंध 1
आकृत्या पूर्ण करणे 2
एकूण 15
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख 

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

DMER परीक्षा विश्लेषण 2023, ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेचे विश्लेषण तपासा_5.1

FAQs

DMER परीक्षा 2023 अंतर्गत ग्रंथपाल सहायक पदाची परीक्षा कधी झाली?

DMER परीक्षा 2023 अंतर्गत ग्रंथपाल सहायक पदाची परीक्षा 13 जून 2023 रोजी झाली.

ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

DMER परीक्षा विश्लेषण 2023 मी कुठे पाहू शकतो?

या लेखात DMER परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात दिले आहे.

DMER परीक्षा 2023 मधील ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहे?

DMER परीक्षा 2023 मधील ग्रंथपाल सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 86-90 आहेत.