Marathi govt jobs   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती...   »   DMER परीक्षा विश्लेषण 2023

DMER परीक्षा विश्लेषण 2023, क्ष किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेचे विश्लेषण तपासा

DMER परीक्षा विश्लेषण 2023

DMER परीक्षा विश्लेषण 2023: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 16 जून 2023 रोजी सकाळच्या शिफ्ट मध्ये क्ष किरण तंत्रज्ञ पदाची परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार क्ष किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण 16 जून 2023 रोजी झालेल्या क्ष किरण तंत्रज्ञ पदाच्या DMER परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

DMER परीक्षा विश्लेषण 2023 (ग्रंथपाल सहाय्यक) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

DMER प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

DMER परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

क्ष किरण तंत्रज्ञ पदाची परीक्षा 16 जून 2023 रोजी पहिल्या शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती. क्ष किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेचे विश्लेक्षण या लेखात देण्यात आले आहे. DMER परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DMER परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER)
भरतीचे नाव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023
लेखाचे नाव DMER परीक्षा विश्लेषण 2023
पदांचे नाव

क्ष-किरण तंत्रज्ञ

DMER क्ष किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेची तारीख 2023 16 जून 2023
शिफ्ट I
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
एकूण गुण 200
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

DMER परीक्षेचे स्वरूप 2023 (क्ष-किरण तंत्रज्ञ)

DMER भरती परीक्षा 2023 अंतर्गत क्ष-किरण तंत्रज्ञ पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 90 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी 30 60
4 तांत्रिक विषय 40 80
एकूण 100 200  
DMER परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट
क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो
अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 12-13 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 11-12 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी 25-26 सोपी ते मध्यम
4 तांत्रिक विषय 35-36 सोपी ते मध्यम
एकूण 83-87 सोपी ते मध्यम

विषयानुरूप DMER परीक्षा विश्लेषण 2023

क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 प्रश्न आणि तांत्रिक विषयातील एकूण 40 असे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयानुसार DMER परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

DMER परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

DMER परीक्षा 2023 मध्ये मराठी विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, प्रयोग, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, उतारा यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
शब्दांच्या जाती 2
वाक्याचे प्रकार (मिश्र वाक्य) 1
समानार्थी शब्द 1
विरुद्धार्थी शब्द 1
एकवचन – अनेकवचन 1
प्रयोग 3
म्हणी व वाक्प्रचार 2
पुस्तकाचे लेखक (कऱ्हेचे पाणी) 1
अलंकार 3
एकूण 15

DMER क्ष-किरण तंत्रज्ञ परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी विषयाचे विश्लेषण

क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Parajumble, Synonyms, Antonyms, One Word Substituion, Fill in the blank, Sport the Error, Parts of Speech यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Parts of Speech 4
Parajumble 3
Spot the Error 3
Incorrect Spelling 1
Synonyms 1
Antonyms 2
One Word Substitution 1
Total 15

DMER परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास  2
भूगोल  3
चालू घडामोडी  4
विज्ञान 3
स्टॅटिक जी.के 3
एकूण  15

सामान्य ज्ञान या विषयात विचारलेले काही प्रश्न खालील प्रमाणे आहे.

  • अर्जुन तेंडूलकर आयपील 2023 मध्ये कोणत्या संघात होता?
  • कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
  • माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिले?
  • बेगम हजरत महाल (अवधची बेगम) कोणत्या नावाबाची पत्नी होती?
  • पूर्व वाहिनी नदी वर एक प्रश्न होता.
  • अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत?

DMER परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

DMER भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी यात गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांचा समावेश होतो. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने पदावली, मिश्रण, संख्या मालिका पूर्ण करणे, टक्केवारी, रेल्वे, अक्षरमाला, नातेसंबंध, आकृत्या पूर्ण करणे आणि जोड्या जुळवणे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
पदावली 4
काळ व काम 1
गुणोत्तर व प्रमाण 1
क्षेत्रफळ / घनफळ 2
शब्दकोशानुसार योग्य मांडणी 1
अक्षरमाला 2
संख्यामाला 2
घड्याळ 1
आकृत्या पूर्ण करणे 1
एकूण 15
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

DMER परीक्षा 2023 अंतर्गत क्ष-किरण तंत्रज्ञ पदाची परीक्षा कधी झाली?

DMER परीक्षा 2023 अंतर्गत क्ष-किरण तंत्रज्ञ पदाची परीक्षा 16 जून 2023 रोजी झाली.

क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

DMER परीक्षा विश्लेषण 2023 मी कुठे पाहू शकतो?

या लेखात DMER परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात दिले आहे.

DMER परीक्षा 2023 मधील क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहे?

DMER परीक्षा 2023 मधीलक्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 83-87 आहेत.