Marathi govt jobs   »   Study Materials   »   Dr. Babasaheb Ambedkar
Top Performing

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 – Biography, Books, and Facts | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, शिक्षण, पुस्तके आणि इतर महत्वाची माहिती

Table of Contents

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024: Dr. Bhimrao Ramji Ambedkar, popularly known as Babasaheb Ambedkar, was a visionary leader, social reformer, jurist, and the architect of the Indian Constitution. His contributions to the upliftment of marginalized communities and the fight against social discrimination are invaluable. Every year, on April 14th, Dr. B R Ambedkar Jayanti is celebrated across India to commemorate his birth anniversary. Let’s delve into the significance, history, and celebrations associated with Dr. B R Ambedkar Jayanti 2024.

Ambedkar Jayanti, also referred to as Bhim Jayanti, is observed annually on April 14th to commemorate the birth anniversary of Dr. Bhim Rao Ambedkar, widely recognized as the “Father of Indian Constitution.” Born in 1891, Ambedkar held pivotal roles as the principal architect of the Indian Constitution and served as the first Law Minister of Independent India. Besides, he was esteemed as a jurist, economist, and social reformer.

Throughout his life, he dedicated himself to the elimination of discrimination against the untouchables and advocated for the rights of women and labor. Consequently, his birthday is also recognized as ‘Equality Day.’

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024: Overview

Dr Babasaheb Ambedkar was born on April 14, 1891, and had an extraordinary achievement of fighting for education and the welfare of society throughout his life. Get an Overview of Dr. Babasaheb Ambedkar in the table below.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024: Overview
Category Study Material
Name Dr. Bhimrao Ramrao Ambedkar
Article Name Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024
Birth 14th April 1891
Mahaparinivan Din 06th December 1956
Also Known as Babasaheb / Bharat Ratna
Known for
  • Dalit rights movement
  • Heading committee drafting Constitution of India
  • Dalit Buddhist movement

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024: 14 एप्रिल रोजी महापुरुष विश्वरत्न भारतरत्न महानायक संविधान निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणास Adda247 Marathi परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !!!

भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. भीमराव रामजी आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक थोर व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी आपल्या वर्तनातून आणि विचारातून मानवतेचा संदेश दिला. त्यांना भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार देखील म्हणतात.

ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. 

आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे.

अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा,

जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.

अशी शिकवण देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी महत्वाची माहिती पाहणार या लेखात दिली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. त्यांनी अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार‘ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते‘ असेही म्हणतात.

Babasaheb Ambedkar Jayanti 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.

Inspirational thoughts of Dr. Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Inspirational thoughts of Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर सर्वांना शिकवण दिली. त्यांचे काही प्रेरणादायी विचार खाली देण्यात आले आहे.

  • महिलांनी मिळवलेल्या प्रगतीवरून मी समाजाची प्रगती मोजतो.
  • स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणारा धर्म मला आवडतो.
  • शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि आंदोलन करा.
  • मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.
  • महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो.
  • मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
  • लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे समाविष्ट करणारी राज्यघटना असलेल्या माझ्या
  • देशाचा, भारताचा मला अभिमान आहे.
  • कायदा आणि सुव्यवस्था हे शरीराच्या राजकारणाचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.
  • आयुष्य मोठे नसून महान असावे.
  • इतिहास दाखवतो की जिथे नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र संघर्षात येतात तिथे विजय नेहमीच अर्थशास्त्राचाच होतो. निहित हितसंबंधांना सक्ती करण्याइतपत ताकद असल्याशिवाय स्वेच्छेने स्वत:ला वेठीस धरल्याचे कधीच ज्ञात नाही.

Dr. Babasaheb Ambedkar: Biography | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र

Dr. Babasaheb Ambedkar: Biography: बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. 1818 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म (Babasaheb Ambedkar) झाला. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे 14वे व अंतिम अपत्य होते.

Dr. Babasaheb Ambedkar: Biography
नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
जन्म तारीख 14 एप्रिल 1891
जन्म ठिकाण महू, इंदोर, मध्यप्रदेश
वडिलांचे नाव रामजी मोलोजी सकपाल
आईचे नाव भीमाबाई मुबारदकर
पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर (1906-1935)
सविता आंबेडकर (1948-1956)
डॉ आंबेडकर यांची निर्माण केलेले काही संघ समता सैनिक दल
पक्ष स्वतंत्र कामगार
दिल्लीतील निवासस्थान Hoardings Avenue
मुंबईतील निवासस्थान हिंदू कॉलनी, दादर
राजगृह ग्रंथालय 32,000 ग्रंथांचे भांडार
डॉ आंबेडकर यांचा मृत्यू 06 डिसेंबर 1956

Dr. Babasaheb Ambedkar: Higher Education | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

Higher Education: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळविलेल्या पदव्या खालीलप्रमाणे आहेत.

1912 : BA (पर्शियन, इंग्रजी) from Elphinston College, मुंबई

शिष्यवृत्ती : सयाजीराव गायकवाड (10 वर्ष नोकरी करण्याच्या अटीवर)

पुढील शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कला प्रयाण.

वर्ष पदवी विषय
1913 M.A. प्राचीन भारतातील व्यापार
1916 PhD

National Dividend of India- Historical and Analytical Study (Guide: Prof. Selimman.)

1916

London School of Economics ला प्रवेश (शिक्षण अर्धवट सोडावे लागले)

बडोदा संस्थानात नोकरी करण्यासाठी परतले. तेथे Military Secretary पदावर रुजू झाले. परंतू नंतर ती नोकरी सोडली आणि मुंबई मध्ये Stocks & Shares मध्ये सल्ला देणारी कंपनी सुरु केली.

1918 ते 1920 : प्राध्यापक, सिडनेहॅम कॉलेज, मुंबई.

1920 साली शाहू महाराज यांनी शिष्यवृत्ती देवून लंडन येथे पाठवले.

वर्ष पदवी विद्यापीठ विषय
1921 M.Sc. London University

 

Provincial Decentralization of Imperial Finances in India
Duties of Democratic Government in India.
1922 Law Bon University, Germany
1923 D.Sc. London University The problem of the Rupee.

The problem of the Rupee हा प्रबंध पुढे RBI कडून History of Indian Indian currency & Banking नावने प्रसिद्ध करण्यात आला.

1923 साली भारतात परतल्यावर इंग्रज सरकारची District Judge म्हणून नेमणूकीची तसेच 3 वर्षात High Court Judge म्हणून पदोन्नती देण्याची ऑफर. परंतू डॉ आंबेडकर यांनी हा प्रस्ताव नाकारला.

1919 : साउथबोरो सुधारणा समिती समोर साक्ष:

  • समितीचे इतर सदस्य: चिमणलाल सेटलवाड, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, श्रीनिवास शास्त्री, तेजबहादूर सप्रू
  • सरकारकडून अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त: वि. रा. शिंदे, डॉ. आंबेडकर

1928: सायमन कमिशन समोर साक्ष:

  • पुरुष व स्त्रिया दोघांना समान मताधिकार मिळावा ही मागणी.

Social Reformers of Maharashtra- Part 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे)

 

Babasaheb Ambedkar- Established Institutions | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था

Dr. Babasaheb Ambedkar- Established Institutions: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था  खालीलप्रमाणे आहे.

  1. बहिष्कृत हितकारणी सभा (1924-1928)
  • अध्यक्ष: चिमणलाल सेटलवाड
  • कार्याध्यक्ष: डॉ. आंबेडकर
  • कार्यवाह: सीताराम सिवतरकर
  • ब्रीदवाक्य: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
  • हस्तलिखित: सरस्वती विलास
  • 1924: बहिष्कृत मेळा वृत्तपत्र सुरु केले
  • 1925: सोलापूर येथे वसतीगृह स्थापन
  • 1928: भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ
    • पनवेल, जळगांव येथे येथे वसतीगृहे स्थापन
  • 1929: भारतीय बहिष्कृत समाजसेवी सभा स्थापन
  • तसेच वि. रा. शिंदे यांच्या “निराश्रित सहाय्यकारी मंडळी” संस्थेवर ताबा प्रस्थापित केला.
  1. समता सैनिक दल (1926)
  • सदस्य: पूर्वीचे ब्रिटिशांच्या लष्करातील निवृत्त सैनिक
  • बुधवार: लष्करी कवायतीसाठी
  • 1938: संख्या 2000 सैनिक
  1. समाज समता संघ (1927)
  • जात-पात मोडक मंडळ, पंजाबच्या धर्तीवर
  • श्रीधरपंत टिळक यांच्यासोबत स्थापना
  • अस्पृश्यांसोबबत सहभोजन
  • अस्पृश्यांचे वैदिक विवाह

Social Reformers of Maharashtra- Part 4 (लोकमान्य टिळक)

Dr. Babasaheb Ambedkar: Newspapers | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे

Newspapers: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  1. मूकनायक साप्ताहिक (1920)
  • त्यावर सुरूवातीला “संत तुकाराम” यांचा अभंग
  • संपादक : पांडूरंग भाटकर
  • नंतर संपादक : ज्ञानदेव घोलप
  • का. र. मित्र यांच्या मनोरंजन छापखान्यात छपाई
  1. समता पाक्षिक (1928)
  • संपादक: देवराव विष्णु नाईक
  1. बहिष्कृत समाज पाक्षिक (1927-1928)
  • त्यावर सुरूवातीला “संत ज्ञानेश्वर” यांची वचने.
  • सत दोन वर्षे चालले.
  • 1930 ला पुन्हा सुरु केले.
  • त्यावेळी अग्रलेख: पुनश्च हरीओम.
  • लोकहितवादी यांची शतपत्रे पुन्हा छापली.
  1. मानवता वृत्तपत्र (1928-30)
  2. जनता पाक्षिक (1930-56)
  • अग्रलेख: आम्ही शासनकर्ता जमात बनणार
  • 1956: त्याचे नाव बदलून प्रबुद्ध भारत‘ ठेवले
  • “अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ” आणि “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया”चे अधिकृत वृत्तपत्र

Dr. Babasaheb Ambedkar: Books | बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ संपदा

Books: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ संपदा खालीलप्रमाणे आहे.

  1. 1918: Small Holdings in India
  2. 1924: Castes in India
  3. 1937: Annihilation of Caste (जात-पात तोडक मंडळाच्या सभेतील अध्यक्षीय भाषण)
  4. 1940: Thoughts on Pakistan (पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा. त्यातून हिंदूच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होईल असे मत)
  5. 1943: Ranade, Gandhi & Jinnah.
  6. 1945: What Congress & Gandhi have done to untouchables.
  7. 1946: Who were the Shudras? (पूर्वकालीन क्षत्रिय)
  8. 1948: The Untouchables.
  9. 1955: Thoughts on linguistic States.
  10. 1957: Riddles in Hinduism.
  11. 1957: Buddha & His Dhamma. (मृत्युनंतर प्रकाशित ).
  12. आत्मचरीत्र: Waiting for Visa

Dr. Babasaheb Ambedkar Conversion | डॉ. बाबासाहेब आंबेडकर- धर्मांतर

Dr. Babasaheb Ambedkar Conversion: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराविषयी महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

13 ऑक्टोबर 1935:  येवला सभा (नाशिक)

  • स्वागताध्यक्ष: अमृत धोंडीबा रणखांबे
  • घोषणा: मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.
  • त्यानंतर 1 वर्ष बाबासाहेबांनी विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला.
  • 1950: बौद्ध धर्म परीषद, कोलंबो येथे हजर.
  • 1952: बौदध परीषद, रंगूनला हजर.
  • 1956: जागतिक बुद्धिस्त परीषद्, काठमांडू येथे उपस्थित.
  • 14 ऑक्टोबर 1956: नागपुरात बौद्ध धर्माचा स्वीकार (दिक्षा- चंद्रमणी महास्थिवीर यांनी दिली.)

Social Reformers of Maharashtra- Part 5 (राजर्षी शाहू महाराज)

Babasaheb Ambedkar: Awards and honors | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

Babasaheb Ambedkar: Awards and honors: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहे.

राष्ट्रीय सन्मान भारतरत्न : सन 1990 मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर “भारतरत्न” हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे भारत सरकारने एप्रिल 1990 च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते डॉ. सविता आंबेडकर यांनी स्वीकारला. 14 एप्रिल 1990 हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता.

मानद पदव्या: डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) : ही सन्माननीय पदवी 05 जून 1952 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने प्रदान केली. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक’ असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.

टपाल तिकिटे: भारतीय टपालने इ.स. 1966,1973,1991,2001 आणि 2013 मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. 

Babasaheb Ambedkar Jayanti 2022
Post Stamp

नाणे: इ.स. 1990 मध्ये, भारत सरकारने आंबेडकरांची 100वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ ₹1 चे नाणे काढले होते. आंबेडकरांची 125व्या जयंतीच्या निमित्ताने ₹10 आणि ₹125 ची नाणी 2015 मध्ये काढले गेले होते. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.

Social Reformers of Maharashtra- Part 6 (सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई)

Babasaheb Ambedkar: Death | भीमराव आंबेडकर यांचे महापरीनिर्वाण

Dr. Babasaheb Ambedkar: Death: डॉ. आंबेडकर यांनी 1954 मध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घेतली मधुमेह, अस्पष्ट दृष्टी यासारख्या विविध आजारांमुळे त्याची तब्येत ढासळली होती. प्रदीर्घ आजारामुळे 6  डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि शेवटच्या संस्कारांना उपस्थित राहण्यासाठी प्रचंड लोक जमले.

विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम !!!

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 - Biography, Books, and Facts_6.1

FAQs

Where was Dr. Babasaheb Ambedkar born?

Dr. Babasaheb Ambedkar was born in Mhow, Indore (Madhya Pradesh).

Who was the chairman of the drafting committee of the incident committee?

Dr. Babasaheb Ambedkar was the Chairman of the Drafting Committee.

To which religion did Dr. Babasaheb Ambedkar convert?

Dr. Babasaheb Ambedkar converted to Buddhism.

When was the Pune Agreement signed between Dr. Babasaheb Ambedkar and Mahatma Gandhi?

The Pune Agreement was signed between Dr. Babasaheb Ambedkar and Mahatma Gandhi on September 25, 1932.