Marathi govt jobs   »   DTP Maharashtra Recruitment 2023   »   DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023
Top Performing

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023, DTP महाराष्ट्र शिपाई पदाच्या परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023: नगर विकास विभागाने एकूण 125 शिपाई पदांच्या भरतीसाठी DTP महाराष्ट्र भरती 2023 जाहीर केली आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 अधिसूचनेत शिपाई पदाच्या परीक्षेचे स्वरूप व विषयानुसार अभ्यासक्रम देण्यात आला आहे. DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असल्यास आपल्याला कोणत्या विषयातील कोणता टॉपिक वाचावा याबद्दल माहिती मिळते. आज या लेखात DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 व DTP महाराष्ट्र परीक्षेचे स्वरूप याबद्दल माहिती पाहणार आहोत.

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 च्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव DTP महाराष्ट्र भरती 2023
पदाचे नाव शिपाई
एकूण रिक्त पदे 125
लेखाचे नाव DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.urban.maharashtra.gov.in

DTP महाराष्ट्र परीक्षेचे स्वरूप 2023 (शिपाई)

DTP महाराष्ट्र भरतीच्या परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर आपल्याला DTP महाराष्ट्र परीक्षेचे स्वरूप 2023 माहिती असणे आवश्यक आहे. तरच कोणत्या विषयाला किती गुण आहेत, कोणत्या विषयावर भर द्यायचा याबाबत माहिती मिळते. शिपाई पदाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयात प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. शिपाई पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200
  • शिपाई पदाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील.
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.
  • परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळांत परीक्षा (SSC) परीक्षेच्या समान असेल.
  • परीक्षेचे माध्यम अद्याप जाहीर करण्यात आले नाही. जसे जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप घोषणा केली नाही.
  • परीक्षेच्या कालावधीबाबत अधिकुत माहिती उपलब्ध नाही आहे.

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र शिपाई भरती परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी (बुद्धिमत्ता चाचणी व गणित) असे एकूण 04 विषय आहेत. या सर्व विषयांचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

विषय अभ्यासक्रम तपशील
मराठी भाषा
  • व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समास, समानार्थी शब्द विदा शब्द )
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह
  • म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
  • वाक्य पृथ:करण व त्याचे प्रकार
  • लेखक व कवींची टोपण नावे
  • समूहदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे
इंग्रजी भाषा
  • Grammar
  • Common Vocabulary
  • Sentence Structure
  • Idioms and Phrases and their meaning
  • Comprehension of passage
  • Sentence Arrangement and Error Correction
सामान्य ज्ञान
  • चालू घडामोडी
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • महाराष्ट्राचा भूगोल
  • भारताची राज्यघटना
  • महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
  • प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
  • प्रसिद्ध दिवस
  • मुलभूत संगणक
बौद्धिक चाचणी

अंकगणित

  • संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, म. सा. वि. आणि ल.सा.वि., दशांश अपूर्णाक वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर व प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, बधवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णाक, घातांक, सरासरी व शेकडेवारी.

बुद्धिमत्ता चाचणी

  • क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्या मधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शीका), रांगेवर आधारीत प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घडयाळ, नाते संबंधीची ओळख, निरिक्षण आणि आकलन.

 

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

DTP महाराष्ट्र भरती 2023 शी संबंधित इतर लेख

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mapack
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023, DTP महाराष्ट्र शिपाई पदाच्या परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम_5.1

FAQs

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे का?

होय, DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे.

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 मी कोठे पाहू शकतो?

DTP महाराष्ट्र अभ्यासक्रम 2023 या लेखात देण्यात आला आहे.

DTP महाराष्ट्र परीक्षेचे स्वरूप 2023 मी कोठे पाहू शकतो?

DTP महाराष्ट्र परीक्षेचे स्वरूप 2023 या लेखात देण्यात आले आहे.

DTP महाराष्ट्र शिपाई पदाची परीक्षा किती गुणांची होणार आहे?

DTP महाराष्ट्र शिपाई पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे.