Marathi govt jobs   »   Study Materials   »   Economic Survey of Maharashtra 2022-23
Top Performing

Economic Survey of Maharashtra 2022-23 | महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

Economic Survey of Maharashtra 2022-23

Economic Survey of Maharashtra 2022-23: The Economic Survey of Maharashtra 2022-23 brings out the economic trends in Maharashtra and facilitates a better appreciation of the mobilization of resources and their allocation in the Budget. The Survey analyses the trends in agricultural and industrial production, infrastructure, employment, money supply, prices, imports, exports, foreign exchange reserves, and other relevant economic factors that have a bearing on the Budget. In this article, you will get detailed information about the Economic Survey of Maharashtra 2022-23. Along with this some important points of the Economic Survey of Maharashtra 2022-23 discuss in this article.

Economic Survey of Maharashtra 2022-23
Category Study Material
Useful for Exam All Competitive Exam
Article Name Economic Survey of Maharashtra 2022-23
Economic Survey of Maharashtra Presented by  Devendra Fadanvis
Economic Survey of Maharashtra Released Date 08 March 2022

Economic Survey of Maharashtra 2022-23

Economic Survey of Maharashtra 2022-23: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी (Economic Survey of Maharashtra 2022-23) हे महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचा वार्षिक दस्तऐवज आहे. अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी विधान मंडळात अर्थसंकल्पाच्या अगदी आधी सादर केल्या जातो. हा दस्तऐवज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान मंडळातील दोन्ही सभागृहांना सादर केला जातो. सन 2022-23 मध्ये नाममात्र (सध्याच्या किमतीनुसार) एकूण राज्य उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्याचे वास्तविक (वर्ष 2011-12 च्या स्थिर किमतीनुसार) एकूण राज्य उत्पन्न 21 लाख 65 हजार 558 कोटी इतके आहे. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षासाठी हा घटक महत्वाचा आहे. आगामी काळातील तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात.

Economic Survey of Maharashtra 2022-23 | महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

Economic Survey of Maharashtra 2022-23: महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) जाहीर करण्यात आला आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा विकासाचा दर हा देशाच्या विकास दरापेक्षा कमी आहे. तसेच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.

Must Read: Maharashtra Budget 2023-24

Economic Survey of Maharashtra 2022-23: Key Highlight | महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23: महत्वाचे मुद्दे

  • सन 2022-23 मध्ये राज्याच्या ‘कृषि व संलग्न कार्ये’ क्षेत्रात 10.2 टक्के वाढ अपेक्षित असून, ‘उद्योग’ क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि ‘सेवा’ क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित आहे.
  • पूर्वानुमानानुसार सन 2022-23 मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 35,27,084 कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,65,558 कोटी अपेक्षित आहे.
  • सन 2022-23 च्या पूर्वानुमानानुसार दरडोई राज्य उत्पन्न 2,42,447 अपेक्षित आहे तर सन 2021-22 मध्ये ते 2,15,233 होते.
  • र्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता राज्याची महसूली जमा 4,03,427 कोटी, तर सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता 3,62,133 कोटी आहे.
  • अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे 3,08,113 कोटी आणि 95,314 कोटी आहे.
  • माहे एप्रिल ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीत प्रत्यक्ष महसूली जमा 2,51,924 कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता राज्याचा महसूली खर्च 4,27,870 कोटी अपेक्षित असून सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता 3,92,587 कोटी आहे.
  • अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा 26.5 टक्के अपेक्षित असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा 22 टक्के अपेक्षित आहे.
  • अर्थसंकल्पीय अंदाज 2022-23 नुसार राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.5 टक्के आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 18.4 टक्के आहे.
  • वार्षिक कार्यक्रम 2022-23 करिता एकूण 1,50,000 कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला असून त्यापैकी 18,175 कोटी जिल्हा योजनांकरिता आहे.
  • सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य २० टक्के हिश्श्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • सप्टेंबर, 2022 पर्यंत राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक 10,88,502 कोटी असून ती अखिल भारताच्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या 28.5 टक्के होती
Economic Survey of Maharashtra 2022-23
Adda247 Marathi App

Economic Survey of Maharashtra 2022-23: State Economy | राज्य अर्थव्यवस्था

Economic Survey of Maharashtra 2022-23: State Economy: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील राज्य अर्थव्यवस्थेशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ७० टक्के वाढ अपेक्षित आहे.
  • सन 2022-23 मध्ये राज्याच्या ‘कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्के वाढ, ‘उद्योग’ क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि ‘सेवा’ क्षेत्रात ६.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. पुर्वानुमानानुसार सन 2022-23 मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ 35,27,084 कोटी अपेक्षित आहे.

Economic Survey of Maharashtra 2022-23: Population | लोकसंख्या

Economic Survey of Maharashtra 2022-23: Population: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23 मधील लोकसंख्येशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • भारताचे महानिबंधक यांचे कार्यालयामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात येते. जनगणना हा लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांबाबत व्यापक माहिती देणारा एकमेव स्रोत आहे. जनगणना २०११ ही १८७२ पासूनच्या अखंडित मालिकेतील पंधरावी जनगणना असून स्वातंत्र्योत्तर सातवी आहे. सामाजिक व आर्थिक विकासासाठी धोरण आखणी आणि विविध योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याकरिता शासनास जनगणनेची आकडेवारी उपयुक्त ठरते.
  • राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, केंद्र शासन यांनी प्रकाशित केलेल्या प्रक्षेपित लोकसंख्येनुसार राज्याची दि. 1 मार्च, 2021 रोजीची प्रक्षेपित लोकसंख्या 12.44 कोटी आहे. प्रक्षेपित नागरी लोकसंख्येचे राज्य आणि अखिल भारतासाठी प्रमाण अनुक्रमे 48.0 टक्के आणि 34.4 टक्के आहे.
  • जनगणना 2021 नुसार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी होती व ती अखिल भारताच्या लोकसंख्येच्या 9.3 टक्के होती. महाराष्ट्र हे देशामध्ये उत्तरप्रदेश नंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य होते. निवडक राज्याकरिता जनगणना 2011 नुसार लोकसंख्या तक्ता 2.2 मध्ये दिली आहे.
Economic Survey of Maharashtra 2022-23
लोकसंख्या

Economic Survey of Maharashtra 2022-23: State Income | राज्य उत्पन्न

Economic Survey of Maharashtra 2022-23: State Income: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील राज्य उत्पन्नाशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • देशांतर्गत स्थूल उत्पन्न अर्थव्यवस्थेचे आकारमान दर्शविते. देशांतर्गत स्थूल उत्पन्नाचा वृद्धिदर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी वापरला जातो. विशिष्ट कालावधीतील क्षेत्रनिहाय स्थूल मूल्यवृद्धिवरुन अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या तुलनात्मक स्थितीचे आकलन होते.
  • चालू मालिकेतील (पायाभूत वर्ष 2011-12) कार्यपद्धतीनुसार राष्ट्रीय स्तरावरील क्षेत्रनिहाय अंदाज मूळ किंमतींवर आधारित स्थूल मूल्यवृद्धिच्या स्वरुपात तर देशांतर्गत स्थूल उत्पन्न हे बाजार किंमतींवर आधारित आहे. राज्यासाठी/जिल्ह्यासाठी क्षेत्रनिहाय अंदाज मूळ किंमतींवर आधारित स्थूल राज्य/जिल्हा मूल्यवृद्धिच्या स्वरुपात व स्थूल राज्य/जिल्हा उत्पन्नाचे अंदाज बाजार किंमतींवर आधारित आहेत. चालू किंमतींवर आधारित अंदाजांना सांकेतिक तर स्थिर किंमतींवर आधारित अंदाजांना वास्तविक असे संबोधण्यात येते.
  • सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ₹ 35,27,084 कोटी अंदाजित आहे.
Economic Survey of Maharashtra 2022-23
राज्य उत्पन्न

Economic Survey of Maharashtra 2022-23: Institutional Finance | राज्यातील औद्योगिक गुंतवणूक

Economic Survey of Maharashtra 2022-23: Institutional Finance: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0

  • गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशाने राज्यात माहे जून 2020 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माहे जून 2020 ते डिसेंबर, 2022 पर्यंत, राज्याने ₹ 2.74,202 कोटी गुंतवणुकीसह सुमारे 4.27 लाख अपेक्षित रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या 124 प्रकल्पांचे सामंजस्य करार केले. एकूण प्रस्तावित गुंतवणुकीमध्ये नवीकरणीय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि स्टील उत्पादन या क्षेत्रातील गुंतवणुकीचा हिस्सा सुमारे 70 टक्के आहे.
  • जागतिक आर्थिक परिषदेच्या दावोस, स्वित्झर्लंड येथे झालेल्या 53 व्या वार्षिक बैठकीत, राज्याने उच्च तंत्र आणि पायाभूत सुविधा, उर्जा, माहिती तंत्रज्ञान/ फिनटेक / डेटा सेंटर, स्टील उत्पादन आणि कृषि व अन्नप्रक्रिया घटक या क्षेत्रांमधील ₹ 1.37 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व एक लाखांहून अधिक रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या 19 प्रकल्पांचे सामंजस्य करार केले.

विशाल प्रकल्प

  • राज्यात माहे सप्टेंबर 2022 पर्यंत ₹ 6,11,271 कोटी प्रस्तावित गुंतवणुकीसह 6.72 लाख अपेक्षित रोजगार निर्मितीच्या 738 विशाल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ₹ 1,35,927 कोटी प्रत्यक्ष गुंतवणुकीसह सुमारे 1.76 लाख रोजगार निर्मिती क्षमतेच्या २५६ प्रकल्पांना पात्रता प्रमाणपत्रे देण्यात आली.

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम

  • वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणान्या उपक्रमांचे त्यांच्या वार्षिक उलाढाल तसेच वस्तुनिर्माण उपक्रमाकरिता यंत्रसामग्रीतील गुंतवणूक व सेवा पुरविणाऱ्या उपक्रम यांचा समावेश आहे.
Economic Survey of Maharashtra 2022-23
राज्यातील औद्योगिक गुंतवणूक

Economic Survey of Maharashtra 2022-23: Agriculture | कृषी

Economic Survey of Maharashtra 2022-23: Agriculture: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील कृषीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • कृषि व संलग्न कार्य क्षेत्र अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांपैकी एक असून त्याचा एकूण राज्य मूल्य वृद्धीत सरासरी 12.1 टक्के हिस्सा आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त ग्रामीण लोकसंख्या त्यांच्या उपजीविकेसाठी शेती व संलग्न कार्यावर अवलंबून आहे. या क्षेत्राला मदत करण्यासाठी शासन विविध योजना आणि कार्यक्रम राबवत आहे तसेच नैसर्गिक आपत्तींचा या क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे.
  • राज्याचा एक तृतीयांश भाग कमी आणि अनियमित पावसाच्या पर्जन्यछायेच्या क्षेत्रात येतो. राज्यातील निव्वळ पेरणी क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 54 टक्के आहे. उपलब्ध संसाधनांचा इष्टतम उपयोग होण्याच्या दृष्टीने पीकांमध्ये विविधता आणणे व पीक पद्धतीमध्ये बदल करणे महत्वाचे आहे. संसाधनांचा शाश्वत वापर, पीक विविधतेला चालना देणे आणि बाजार, हवामान, क्रेडिट सुविधा आणि ई-कॉमर्सची माहिती शेतकन्यांना देणे यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे.
Economic Survey of Maharashtra 2022-23
कृषी

Economic Survey of Maharashtra 2022-23 PDF

Economic Survey of Maharashtra 2022-23 PDF: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) ची pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Economic Survey of Maharashtra 2022-23, Know about Maharashtrachi Arthik Pahani in Marathi_8.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Study Material

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.

लेखाचे नाव लिंक
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

Economic Survey of Maharashtra 2022-23, Know about Maharashtrachi Arthik Pahani in Marathi_10.1

FAQs

When has Maharashtra Economic Survey 2022-23 announced?

Maharashtra Economic Survey 2022-23 has released on 08 March 2022.

Who announced Maharashtra Economic Survey 2022-23?

Maharashtra Economic Survey 2022-23 announced by Finance Minister Devendra Fadnavis.

According to the forecast for the year 2022-23, the economic growth rate of the state is predicted to increase by what percentage?

According to the forecast for the year 2022-23, the economic growth rate of the state is predicted to increase by 6.8 percent.