Marathi govt jobs   »   Study Materials   »   भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना
Top Performing

भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | Establishment of underground movements and counter-governments : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?

सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे.  पाठ्यपुस्तक  अभ्यास प्रक्रियेत  एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे.  ज्याद्वारे  तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.

Title  अँप लिंक वेब लिंक
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज लिंक लिंक

 

भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा

भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना

भूमिगत चळवळ :

  • 1942 च्या अखेरीस जनआंदोलनाला नवे वळण मिळाले.
  • आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले.
  • जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, युसूफ मेहेरअली, सुचेता कृपलानी, एस. एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, ना.ग.गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यांसारखे अनेक नेते आघाडीवर होते.
  • रेल्वेमार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी आंदोलकांनी दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली.
  • संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले.

भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | Establishment of underground movements and counter-governments : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_3.1

  • सिंध प्रातांत हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वमार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
  • सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा ‘आझाद दस्ता‘, नागपूरच्या जनरल आवारी यांची ‘लाल सेना‘ अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले.
  • मुंबईला विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्याला ‘आझाद रेडिओ’ म्हणत. त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जात.
  • अशी प्रक्षेपण केंद्रे कोलकता, दिल्ली व पुणे येथे काही काळ चालली.

प्रतिसरकारांची स्थापना 

  • देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात.
  • बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.
  • महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | Establishment of underground movements and counter-governments : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_4.1
  • कुंडल येथील क्रांतिअग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. 
  • या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत.
  • सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातिभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली.
  • त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

टॉपिक  संदर्भ  अँप लिंक वेब लिंक
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव 11 वी इतिहास (जुने) लिंक लिंक
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग 10 वी भूगोल लिंक लिंक
राजकीय पक्ष 10 वी इतिहास व राज्यशास्त्र लिंक लिंक
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ 11 वी इतिहास (जुने) लिंक  लिंक 
वनस्पतींचे वर्गीकरण 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान लिंक  लिंक 
भारतातील नद्या 10 वी भूगोल  लिंक  लिंक 

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | Establishment of underground movements and counter-governments : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_6.1

FAQs

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज ही कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे ?

महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज उपयुक्त आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये कोणते विषय कवर होतील ?

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे इतिहास,भूगोल,पर्यावरण,अर्थशास्त्र,सामान्य विज्ञान तसेच पंचायत राज व राज्यशास्त्र हे सर्वच विषय दररोज कवर होणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज चा परीक्षांसाठी काय फायदा आहे ?

पाठ्यपुस्तके स्पर्धापरीक्षा अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात. जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्याचसाठी आम्ही ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज घेऊन आलो आहोत.