Table of Contents
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अपडेट
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अपडेट: राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी 30 मे ते 09 जून 2023 या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. 30 मे ते 09 जून 2023 या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांना आपल्या अर्जात बदल करण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 30 मे ते 09 जून 2023 या कालावधीत अर्ज केलेले उमेदवार दि. 05 ते 07 डिसेंबर 2023 या कालावधीत आपल्या अर्जात बदल करू शकत होते. महाराष्ट्र शासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध संवर्गातील 717 पदे भरण्याकरिता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 जाहीर केली आहे. या लेखात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 717 पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग |
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 |
पदाचे नाव | राज्यस्तरीय संवर्गातील पदे
जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
|
एकूण रिक्त पदे | 717 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://stateexcise.maharashtra.gov.in/ |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अपडेट अर्जात बदल करण्यासाठी लिंक
30 मे ते 09 जून 2023 या कालावधीत अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवर जाऊन आपल्या अर्जात बदल करू शकतात.
30 मे ते 09 जून 2023 या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अर्जात बदल करण्यासाठी लिंक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अपडेट : अधिकृत प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 रोजी अधिसुचना प्रकाशित केली होती. परंतु त्याआधी याच वर्षी 30 मे 2023 रोजी देखील या भरती साठी अधिसुचना जाहीर झाली होती पण ती भरती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातर्फे राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 बद्दल एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी या विभागाने दि. 30 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराताला अनुसरून परिपूर्ण अर्ज भरून शुल्क भरलेले आहेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जातील. तथापि, त्यांना समांतर आरक्षणातील प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या प्रवर्गातून अर्ज करावयाचा असल्यास त्यांना पूर्वीच्याच अर्जात दुरुस्ती (Edit) करण्यास दि. 05 डिसेंबर ते दि. 07 डिसेंबर 2023 या कालावधीत परवानगी होती परंतु त्यात आता 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अटी व सूचना
पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अटी व सूचना खाली दिलेल्या आहेत.
- ज्या उमेदवारांनी जवान व जवान नि वाहनचालक या पदांसाठी या विभागाने दि. 30 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अनुसरून अर्ज भरलेला असेल परंतु शुल्क भरलेले नसेल तर त्यांनी परीक्षा शुल्क भरावे व त्यांच्या पूर्वीच्याच अजांत आवश्यकतेनुसार दुरुस्ती (Edit) करावी.
- ही भरतीप्रक्रिया राज्यस्तरीय असल्यामुळे दि. 30 मे 2023 रोजीच्या जाहिरातीला अनुसरून जवान व जवान-नि-वाहनचालक पदासाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार तसेच दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही राज्यस्तरीय समजण्यात येईल व त्यांना संपूर्ण राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती स्वीकारावी लागेल.
- लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि वाहनचालक आणि चपराशी या पदाकरिता दि. 30 मे 2023 रोजीच्या जाहिरातीमध्ये दि. 13 जून 2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दिली होती. त्यामुळे दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा दि. 30 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण असावी तर अशा उमेदवारांची महत्तम वयोमयदिची मुदत ही दि. 30 एप्रिल 2023 ची असेल. या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जाहिरातीमधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसुचना
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसुचना: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत एकूण 717 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसूचना लिंक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 महत्वाच्या तारखा: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 17 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसुचना | 15 नोव्हेंबर 2023 |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती अर्ज सुरु होण्याची तारीख | 17 नोव्हेंबर 2023 |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2023 |
30 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराताला अनुसरून अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी अर्जात दुरुस्तीची तारीख | दि. 05 डिसेंबर ते |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 परीक्षेचा कालावधी | 05 ते 17 जानेवारी 2023 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप