Table of Contents
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार: या लेखात आपण महाराष्ट्रातील विविध वने व वनांचे प्रकार, महाराष्ट्रातील विविध प्रकारचे जंगल, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि महाराष्ट्रातील अभयारण्य यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती अभ्यासू.
जिल्हा परिषद 07 दिवसाचा रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार | |
कॅटेगरी | अभ्यास साहित्य |
कशासाठी उपयुक्त | जिल्हा परिषद भरती 2023 |
विषय | अभ्यास साहित्य (भूगोल) |
टॉपिक | महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार |
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये: स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल विषयाचा अभ्यास करताना महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये या विषयवार बऱ्याचदा प्रशा विचारले जातात. MPSC, ZP आणि तसेच महाराष्ट्रातील इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी विविध विषयवार अभ्यास साहित्याचे लेख तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. तर चला मग या लेखात आपण अभ्यास करूयात महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये. या लेखात आपण पाहुयात वने व वनांचे प्रकार, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, आणि महाराष्ट्रातील अभयारण्ये.
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार
महाराष्ट्रात वनस्पतींचे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण प्रकार पाहावयास मिळतात. ते पुढील प्रमाणे :
- उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
- उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये
- उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
- उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये किंवा उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये
- उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्ये
- उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये

1. उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:
वार्षिक पर्जन्य: सुमारे 200 से. मी. किंवा त्याहीपेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात
प्रदेश: महाराष्ट्रामध्ये कोकण भागात सह्याद्रीच्या पायथ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित अरण्ये पाहावयास मिळतात.
वृक्षांचे स्वरूप :
- घनदाट वनांचे आच्छादन वृक्षांची उंची साधारण 45 ते 60 मी.
- उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने ही नेहमी सदाहरीत व अतिदाट असतात.
- या वन प्रकारातील वृक्षांना वरच्या बाजूस पाने व फांद्या भरपूर असतात व त्या एकमेकांत आच्छादलेल्या असतात.
- वृक्षे ही दाटीवाटीने व सलग वाढलेली असतात.
वृक्षांचे प्रकार: सदाहरित अरण्यांमध्ये नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ वगैरे वृक्ष आढळतात, त्या घनदाट अरण्यात अधूनमधून बाबू आणि कळक यांचे विविध प्रकार आहेत.
आर्थिक महत्त्व :
- या वनस्पती आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या नसतात.
- या वन प्रकारातील लाकूड कठीण असते.
- या ठिकाणी फळे, कंदमुळे, पाने इत्यादी वनस्पती मिळून त्याचा व्यापार केला जातो.
- येथील वृक्षांचा वापर बहुतकरून इंधनासाठी व जळाऊ लाकूड म्हणून केला जातो. दळणवळणाच्या अपुन्या सोयींमुळे या ठिकाणी फारसा वनउद्योगाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही म्हणून ही वने आर्थिकदृष्ट्या फारशी महत्त्वाची नाही.
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चे उठाव
2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये:
वार्षिक पर्जन्य: 200 सें. मी. पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात.
प्रदेश: पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे सहयाद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात. विशेषतः आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित अरण्ये आहेत. सदाहरित अरण्ये आणि पानझडीची अरण्ये यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत.
वृक्षांचे स्वरूप:
- सदाहरीत वन प्रकारातील वृक्षांपेक्षा कमी उंचीची वृक्ष असतात.
- वृक्षांची उंची साधारणतः 20 ते 30 मी. एवढी असते.
- या प्रकारची वने सलग पट्ट्यात न वाढता तुटक स्वरूपात वाढतात.
- सर्वच वृक्षांची पाने ही एकाच वेळी गळून पडत नाहीत. विशिष्ट कालावधीने ती गळतात. म्हणून ही वने हिरवीगार दिसतात.
वृक्षांचे प्रकार: निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदंब, शिसम, बिबळा वगैरे वृक्ष आढळतात. बांबूची वने कमी प्रमाणात आहेत.
आर्थिक महत्त्व:
- ही वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत.
- येथील वृक्षांच्या लाकडाचा वापर हा मुख्यत्वे इमारत व फर्निचरसाठी केला जातो.
- येथील लाकूड जळाऊ इंधन म्हणून वापरले जाते.
- महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर परिसरात मध गोळा करण्याचा व्यवसाय चालतो.
3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:
वार्षिक पर्जन्य: प्रदेश सहयाद्री पर्वतावर 250 से. मी. पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत.
प्रदेश: माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकडयांवरही ही अरण्ये आहेत.
वृक्षांचे स्वरूप:
- वृक्षांचे लाकूड मऊ असते.
- अनेक प्रकारची वृक्ष, वेली, झुडपी या भागात असतात. त्यामुळे ती हिरवी दिसतात.
- वृक्षांची विविधता या ठिकाणी जास्त असते.
वृक्षांचे प्रकार: वृक्षांचे प्रकार उपउष्ण सदाहरित अरण्यात जांभळा, मंजन, हिरडा, आंबा, भेडा, कारवी वगैरे महत्वाचे वृक्ष आहेत.
आर्थिक महत्त्व:
- वन औषधी तयार करणे व तिचा विक्रीचा व्यवसाय करणे.
- मध गोळा करणे व मधुमक्षिका पालन केंद्र चालविणे.
- विविध प्रकारची फुले गोळा करून वनौषधी, पेय तयार करणे.
भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानी
4. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये किंवा उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:
वार्षिक पर्जन्य: वार्षिक पाऊस 120 से 160 से.मी
प्रदेश: महाराष्ट्रात जी अरण्ये प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्यांच्या पूर्व भागात चिरोली आणि नवेगाव टेकड्यांवर आहेत. तो परिसर ‘आलापल्लीची अरण्ये’ म्हणून ओळखला जातो. याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्हयाचा काही भाग, सातपुडा पर्वतरांगांतील गाविलगड टेकड्या (मेळघाट) यांचा समावेश होतो. उत्तर कोकणातील डोंगररांगा, तसेच सह्याद्री चा घाटमाथा, पर्जन्यछायेचा प्रदेश, शंभू महादेव डोंगररांगा हरिश्चंद्र- बालाघाट आणि सातमाळा डोंगररांगा या ठिकाणी आर्द्र पानझडी अरण्ये पाहावयास मिळतात. कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पुसे व नंदुरबार जिल्ह्यात पानझडी अरण्ये आहेत
वृक्षांचे स्वरूप:
- ही वने पावसाळ्यात वाढतात, तर उन्हाळ्याच्या सुरवातीला यांची पाने गळतात.
- झाडांची सरासरी उंची 30 ते 40 मीटर.
- पावसाळा सुरू झाल्यानंतर वृक्षांना नवीन पालवी फुटतात. या प्रकारची वने फार घनदाट नसतात.
- वनातील वृक्षे मऊ लाकडाची असतात.
वृक्षांचे प्रकार: आर्द्र पानझडी अरण्यात प्रमुख वनस्पती सागवान आहेत. याशिवाय आईन, हिरडा, बिबळा, लेंडी, येरूल, किंडल, कुसुम, आवळा, शिसम, सिरस वगैरे वृक्ष आढळतात. बांबूची वनेही पाहावयास मिळतात. व्यवहारात ते वासे म्हणून प्रसिद्ध आहेत.
आर्थिक महत्त्व:
- ही वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असतात.
- सागाच्या लाकडाचा वापर इमारती लाकूड व फर्निचरसाठी होतो.
- डिंक, लाख, मध गोळा करणे, तेंदूची पाने गोळा करणे, मोहाची फुले गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतो.
- लाकूड कटाई उद्योगासाठी ही वने महत्त्वाची असतात.
- वनौषधी, वनफुले इत्यादी विक्रीचा व्यवसाय या वन प्रकारात चालतो.
5. उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्ये:
वार्षिक पर्जन्य: 80 ते 120 सें. मी. असणाऱ्या प्रदेशात रूक्ष पानझडी अरण्ये आढळतात
प्रदेश: सातपुडा पर्वतरांगा आणि अजिंठा डोंगररांगांत रूक्ष पानझडी अरण्ये आढळतात. घाटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालगत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यांवरही ही अरण्ये पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे विदर्भामध्येही डोंगराळ भाग व्यापलेला आहे
वृक्षांचे स्वरूप:
- ही वने अतिशय विरळ असतात. वृक्षांना काटे असतात.
- मध्यम उंचीची व झुडपांच्या स्वरूपात आढळतात.
- विशिष्ट अंतरावर या वनातील वृक्ष आढळतात.
- वनातील वृक्षांची पाने ही उन्हाळ्याच्या सुरवातीला गळतात.
वृक्षांचे प्रकार: उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्यात सागवान, धावडा, शिसम, तेंदू, पळस, बेल, खेर, अंजन वगैरे वृक्ष असतात.
आर्थिक महत्त्व:
- सागवान लाकडाचा समावेश असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही वने महत्त्वाची असतात.
- मध, डिंक, लाख व कात तयार करण्याचा व्यवसाय या वन प्रकारात चालतो.
- आयुर्वेदिक तेल तसेच औषधी तयार करून ती विक्री करण्याचा व्यवसाय चालतो. तेंदूची पाने गोळा करून विडी उद्योगासाठी त्याचा वापर केला जातो.
- इंधन म्हणून यामधील वृक्षांचा वापर होतो.
6. उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये:
वार्षिक पर्जन्य: 80 से. मी. पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात.
प्रदेश: दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्याच्या लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगररांगांवर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी झाडे आढळतात. पुणे, सातारा, सांगली व अहमदनगरच्या पूर्व भागात, तसेच सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भ भागातही टेकड्यांवर काटेरी अरण्ये आहेत.
वृक्षांचे स्वरूप:
- या वन प्रकारातील वृक्षांच्या फांद्यांना काटे असतात
- पानांच्या टोकावर शेवटी काटे असतात.
- पाण्याच्या शोधार्थ वृक्षांची मुळे जमिनीत खूप खोलवर गेलेली असतात.
- वृक्षांच्या पानांचा आकार लहान असतो.
- वृक्षांचे लाकूड टणक असते व वृक्षांची साल जाड असते.
- कोरड्या ऋतूतही ही वृक्षे व वेली तग धरू शकतात. (जिवंत राहू शकतात.)
वृक्षांचे प्रकार: काटेरी अरण्यात बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष सर्वत्र आढळतात. निंब झाड अनेक ठिकाणी पाहावयास मिळते.
आर्थिक महत्त्व:
- आर्थिकदृष्ट्या ही वने फारशी महत्त्वाची नसतात.
- वनातील वृक्षांचा वापर हा जळाऊ लाकूड म्हणून केला जातो.
- काही वृक्षवेलींचा वापर हा आयुर्वेदिक वनौषधींसाठी केला जातो.
- लाकडाचा उपयोग हा मुख्यत्वे शेतीची अवजारे तयार करण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागात कुंपणासाठी या वृक्षांचा व फांद्यांचा वापर केला जातो.
- सुगंधी अत्तर, तेल, औषधासाठी आवश्यक रोशा (सोफीया व मोतीया), कुशल आणि शेडा जातीचे गवत मिळवून त्याचा उपयोग केला जातो.
7. किनारपट्टीवरीलखारफुटीचीकिनारपट्टीवने (खांजणवने):
प्रदेश: महाराष्ट्राच्या पश्चिम कनारपट्टीलगत नद्यांच्या मुखाशी भरती-ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान खाड्यांची निर्मिती झाली आहे. या खाड्यांच्या दलदलयुक्त खाजण क्षेत्रात खारफुटीची बने खाजण वने आढळतात. महाराष्ट्रातील एकूण वनामध्ये या वनांचे प्रमाण नगण्य म्हणजे 0.9% इतके आहे. आचरा, रत्नागिरी, देवगड, वैतरणा, मुंब्रा, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा या किनारी प्रदेशाचा समावेश होतो.
वृक्षांचे स्वरूप:
- या प्रकारची वने दाट व एकमेकांत वाढलेली असतात
- दलदलयुक्त प्रदेशातून ही बने वर आलेली असतात
- वृक्षाच्या खोडाला खूप मोठ्या प्रमाणावर उपमुळे असतात त्यामुळे वृक्षाच्या खोडाला खूप मोठा आधार असतो.
- वृक्षांची उंची फार नसते.
- वृक्षे ही झुडपांच्या स्वरूपात दाट वाढलेली असतात.
- ही बने क्षारयुक्त पाणी असलेल्या भागात आढळतात.
- सिंधुदुर्गच्या आचरा खाडीच्या किना-यावर कांदळ मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यावरून या वनांना कांदळवन असे संबोधतात.
वृक्षांचे प्रकार: चिपी, आंबेटी, काजळा, मरांडी, कांदळ, तिवर या जातीच्या वनस्पती आढळतात.
आर्थिक महत्त्व:
- आर्थिकदृष्ट्या ही वने फारशी महत्त्वाची नसतात.
- लाकूड हलके असल्यामुळे व पाण्याच्या संपर्कात वाढल्यामुळे होड्या व बोटी तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो.
- जळाऊ लाकूड व इंधनासाठी याचा वापर होतो.
- समुद्रातील जलचर प्राण्यांच्या आश्रयासाठी या वनांचा वापर होतो.
- या वनांमुळे सागरकिनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
महाराष्ट्रात सध्या 6 राष्ट्रीय उद्याने आहेत ती पुढील प्रमाणे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान (जि. चंद्रपूर.) :

स्थापना :- 1955
क्षेत्रफळ :- 116.55 चौ.कि.मी.
हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. वाघ, मगर, सूरी आणि गवा यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान हे येथील प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल. या ठिकाणी लहान-मोठे खूप तलाव आहेत व ताडोबा नावाचा तलाव सर्वात मोठा आहे. अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही त्याची ओळख सांगता येईल.
प्राण्यांचे वास्तव्य :- वाघ, चितळ, सांबर, चिंकाळा, मगरी, गवे, हरीण इत्यादी वन्यप्राण्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान (गोंदिया) :

स्थापना :- 1972
क्षेत्रफळ :- 133.88 चौ.कि.मी.
नवेगाव नावाचे सरोवर (तलाव) या भागात आहे. त्या नावावरून नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. पानझडी वृक्ष प्रकारच्या वनात हे राष्ट्रीय उद्यान आहे. पट्टेदार मण्यार, तलावातील पाणमांजरे यासाठी हे उद्यान प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतात.
प्राण्यांचे वास्तव्य :- बिबटे, नीलगाय, अस्वल, भेकर, सांबर, पट्टेदारमण्यार, हरीण इत्यादी.
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली, मुंबई उपनगर) :

स्थापना : 1969 स्वातंत्रपूर्व काळात या उद्यानाला कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे नाव होते. स्वातंत्र्यानंतर वन विभागाने याचे नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. 19 81मध्ये या राष्ट्रीय उद्यानाचे नामांतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानात पुरातन अशी कान्हेरी लेणी हे प्रेक्षणीय ठिकाण आहे. इतर राष्ट्रीय उद्यानांच्या तुलनेत या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सर्वाधिक असते. मेट्रो शहरालगत असणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे.
प्राण्यांचे वास्तव्य :- रानमांजर, मुंगूस, अस्वल, लंगूर, उदमांजर इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच (नागपूर) :

स्थापना :- 1983
क्षेत्रफळ : : 275 चौ.कि.मी.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असणारे हे राष्ट्रीय उद्यान आहे. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात उगम पावणारी पेंच नदी दक्षिणेकडे वाहत येऊन ज्या वन प्रदेशातून प्रवास करून दोन भागांत विभाजन करते त्या वनप्रदेशाला पेंच राष्ट्रीय उद्यान असे म्हणतात. 1977 साली अभयारण्यांचा दर्जा प्राप्त हे वनक्षेत्र पुढे चालून राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले व 1992या वर्षी व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. उत्तम नियोजनामुळे 2011 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाला उत्तम नियोजन पुरस्कार म्हणून घोषित करण्यात आले. तोतलाडोह परिसरात पेंच नदीवरील प्रकल्प या भागात आहे. प्राण्यांचे वास्तव :- वाघ, चितळ, सांबर, पट्टेदार वाघ
चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली):

स्थापना :- 2004
क्षेत्रफळ : 317.67चौ.कि.मी.
महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्री पर्वतरांगेवर सदाहरीत वन प्रकार क्षेत्रात सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसील अंतर्गत वारणा नदी परिसरातील वनक्षेत्र 1982 मध्ये चांदोली अभयारण्य म्हणून घोषित झाले. पुढे 2004 मध्ये या वनक्षेत्राला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. आज सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर हे राष्ट्रीय उद्यान आहे. सदाहरीत हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करते.
युनेस्कोने २०१२ या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यान जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही हे राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते.
प्राण्यांचे वास्तव्य :- वाघ, बिबट्या, शेकरू, गवे, अस्वल, सांबर, हरियाल इत्यादी प्राणी व पक्षी वास्तव्य करतात.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते
गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती) :

स्थापना : 1974
क्षेत्रफळ :- 1673 चौ.कि.मी.
अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सातपुडा पर्वतरांगेत चिखलधारा व धारणी तालुक्यातील हे वनक्षेत्र गुगामल (मेळघाट) राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखता येते. जवळच तापी नदीखोरे परिसरापर्यंत गाविलगड डोंगररांगेत या राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार आहे. मेळघाटात कोरकू ही आदिवासी जमातीसोबत इतरही जमातीचे लोक वास्तव्य करतात. खंडू, खापर, सिपना, गाळगा आणि डोलारा या पाच नद्या मेळघाटातून वाहत जाऊन तापी नदीला मिळतात. याच राष्ट्रीय उद्यानात निसर्ग संग्रहालय आहे. मेळघाट हा महाराष्ट्रात जैवविविधतेचे भांडार म्हणून ओळखला जातो.
प्राण्यांचे वास्तव्य :- • पट्टेवाले वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, भेकरे, चितळ, नीलगाय, चौशींगी अस्वले, रानमांजरे, तरस व कोल्हे इत्यादी प्राण्यांसोबत रानकोंबड्या, बदके, करकोचे, मोर, पोपट, सुरगण, घार, बुलबुल, मैना इत्यादी पक्षी आढळतात.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान तपशीलवार
महाराष्ट्रातील अभयारण्ये
महाराष्ट्रातील सध्या 50 अभयारण्ये आहेत.
कन्हाळगाव – हे महाराष्ट्रातील 50 वे अभयारण्य ठरले असून त्याचे एकूण क्षेत्र 269 चौरस किलोमीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याला 4 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 16व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
No. | अभयारण्याने | जिल्हा |
1 | आंबा बरबा | बुलढाणा |
2 | अंधारी | चंद्रपूर |
3 | अनेर डॅम | धुळे |
4 | भामरागड | गडचिरोली |
5 | भीमाशंकर | पुणे |
6 | बोर | वर्धा-नागपूर |
7 | चपराळा | गडचिरोली |
8 | देऊळगाव रेहकुरी | अहमदनगर |
9 | ज्ञानगंगा | बुलढाणा |
10 | गौताळा | औरंगाबाद- जळगाव |
11 | घोडझरी | चंद्रपूर |
12 | माळढोक | अहमदनगर- सोलापूर |
13 | इसापूर | यवतमाळ |
14 | जायकवाडी | औरंगाबाद |
15 | कळसुबाई | अहमदनगर |
16 | करंजा सोहल | अकोला |
17 | कर्नाळा | रायगड |
18 | काटेपूर्णा | अकोला |
19 | कोका | भंडारा |
20 | कोयना | सातारा |
21 | लोणार | बुलढाणा |
22 | मालवण (सागरी) | सिंधुदुर्ग |
23 | मानसिंगदेव | नागपूर |
24 | मयुरेश्वर सुपे | पुणे |
25 | मेळघाट | अमरावती |
26 | नागझिरा | गोंदिया- भंडारा |
27 | नायगाव (मोर) | बीड |
28 | नांदूर-मध्यमेश्वर | नाशिक |
29 | नर्नाळा | अकोला |
30 | नवेगाव | गोंदिया |
31 | नवीन बोर | नागपूर-वर्धा |
32 | गंगेवाडी | सोलापूर |
33 | नवीन नागझिरा | गोंदिया |
34 | पैनगंगा | यवतमाळ-नांदेड |
35 | फणसाड | रायगड |
36 | भामरागड | गडचिरोली |
37 | प्राणहिता | गडचिरोली |
38 | राधानगरी | कोल्हापूर |
39 | सागरेश्वर | सांगली |
40 | सुधागड | पुणे |
41 | ताम्हिणी | पुणे-रायगड |
42 | तानसा | ठाणे |
43 | ठाणे खाडी(फ्लेमिंगो) | ठाणे |
44 | टिपेश्वर | यवतमाळ |
45 | तुंगारेश्वर | ठाणे |
46 | उमरेड-कहांडला | भंडारा – नागपूर |
47 | वान | अमरावती |
48 | यावल | जळगाव |
49 | येडशी रामलिंग | उस्मानाबाद |
50 | कन्हाळगाव | चंद्रपूर |
For More Study Articles, Click here
FAQ: महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
Q.1 महाराष्ट्रात एकूण अभयारण्य किती आहेत?
Ans: महाराष्ट्रात एकूण 50 अभयारण्य आहेत.
Q.2 महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने आहेत का?
Ans: हो, महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने आहेत.
Q.3 ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
Ans: ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर ला आहे.
Q.4 महाराष्ट्रातील वनांची माहिती कुठे मिळेल?
Ans: महाराष्ट्रातील वनांची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
