Table of Contents
Police Bharti 2024 Shorts
Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan |
वेब लिंक | अँप लिंक |
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan
|
वेब लिंक | अँप लिंक |
Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.
Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
विषय | भारतीय अर्थव्यवस्था |
टॉपिक | अर्थसंकल्पांचे स्वरूप |
अर्थसंकल्पांचे स्वरूप
अर्थसंकल्प | तपशील |
पारंपारिक अर्थसंकल्प (Traditional Budget) | यात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर किंवा कोणत्या गोष्टींंवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो. |
निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) | निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग हा अमेरिकेमध्ये झाला.या अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output) अर्थसंकल्प निर्मिती करणे हा आहे. |
फलनिष्पत्ती अर्थसंकल्प (Outcome Budget) | हे विविध विभाग आणि मंत्रालयाचे मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय खर्चाच्या प्रगतीचे पत्रक असते. यामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या विकासोन्मुख फलनिष्पत्तीचे मापन केले जाते. विभागांना किती निधी आवंटित केला गेला होता, तो योग्य कार्याकरिता खर्च करण्यात आला किंवा नाही याचाही समावेश असतो. |
शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget) | या मध्ये दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्चाचा अंदाज मांडला जातो. पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. महाराष्ट्र राज्याने 1 एप्रिल 1986 रोजी शून्याधारित अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर हे होते. |
लिंगाधारित अर्थसंकल्प (Gender Based Budget) | 2005 मध्ये, भारताने केंद्रीय अर्थसंकल्पासह लिंगाधारित अर्थसंकल्प जारी करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राने 2013 पासून लिंगाधारित अर्थसंकल्प स्वीकारले आहे. लिंगाधारित अर्थसंकल्प हा एक प्रकल्प आहे जो सार्वजनिक निधीचे वाटप आणि मार्गण करण्यासाठी लिंगानुसार भिंग लागू करतो.हा स्वतंत्र अर्थसंकल्प नसून मुळ अर्थसंकल्पातच मांडला जातो. |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.