Table of Contents
Forts in Maharashtra District wise List: Study Material for MHADA Exam 2021: जिथे शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात. किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आहे. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याला (Forts in Maharashtra) याची माहिती असावी कारण पेपरमध्ये कोणता किल्ला कोणत्या जिल्हात आहे, कोणत्या किल्ल्याच काय महत्व आहे, महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत (Total forts in Maharashtra), इ माहितीवर प्रश्न विचारले जातात. आगामी म्हाडा भरतीच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान विषयावर एकूण 50 विचारले जातील त्यात महाराष्ट्रातील किल्ले यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. आज आपण या लेखात जिल्हानुसार महाराष्ट्रील किल्ले | Forts in Maharashtra District wise List: Study Material for MHADA Exam 2021, जिल्हानुसार किल्यांची नावे, महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत, पर्यटनासाठी महत्वाचे किल्ले (Forts in Maharashtra) याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Forts in Maharashtra District wise List | जिल्हानुसार महाराष्ट्रातील किल्ले: Study Material for MHADA Exam 2021
District wise forts in Maharashtra: महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन कसे केले आहे?
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’
अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं.
What is meant by Fort? | किल्ला म्हणजे काय?
What is meant by Fort?: जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत.
रामायण, महाभारत, अग्नीपुराण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, ऋग्वेद, अग्नीपुराण,अथर्ववेद,वराहमिहिराची बृहत्संहिता , मनुस्मृती अशा जुन्या ग्रंथात किल्ल्यांचे महत्व दिलेले आढळते. म्हणजे त्याही काळात आपल्या देशात किल्ले होतेच.
प्रथमं गिरीदुर्गंच , वनदुर्गं द्वितीयकम्
तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम्
लाला लक्ष्मीधराने देवज्ञविलास या ग्रंथात किल्ल्यांचे (Forts in Maharashtra) आठ प्रकार सांगितले आहेत. त्यातील सर्वात उत्कृष्ट गिरिदुर्ग – म्हणजे डोंगरी किल्ला, त्यानंतर वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला. गव्हरं म्हणजे एखाद्या गुहेचा उपयोग किल्ल्यासारखा करता आला तर तो तिस-या श्रेणीचा किल्ला मानला जातो. चौथ्या दर्जाचा किल्ला म्हणजे जलदुर्ग – पाण्यातला किल्ला. कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशातील किल्ला हा पाचव्या प्रतीचा तर मिश्रपध्दतीचा किल्ला म्हणजे सहाव्या प्रतीच किल्ला. संपूर्ण गावकुस किंवा गावाभोवती कोट असेल तर तो सातव्या प्रकारचा किल्ला व एखादा नुसता कोट किंवा गढी हा आठव्या प्रकारचा किल्ला.
सर्वसाधारणपणे डोंगरावर असणारा गिरिदुर्ग, समुद्रात बेटावर असणारा जंजीरा किंवा जलदुर्ग, जमिनीवर असणारा भुईकोट किंवा स्थळदुर्ग असे किल्ले आपल्याला माहीत असतात.
MHADA परीक्षा 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Types of Forts in Maharashtra | महाराष्ट्रातील किल्याचे प्रकार
Types of Forts in Maharashtra: वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत परंतु त्यांचा अर्थ जवळपास एकच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.
- निसर्गसिद्धीत जलाने वेष्ठीत असा तो जलदुर्ग
- दुर्घट चढाच्या व पाण्याच्या सोयीने समृध्द अशा शिखरावरील गिरिदुर्ग
- पाषाणात भक्कम बांधून काढलेला तो अष्मदुर्ग
- विटाचुन्याने बांधलेला व खंदकाने वेष्ठीत तो इष्टिकादुर्ग
- चिखलमातीतच बांधून काढलेला तो मृतिकादुर्ग
- दाट काटेरी झाडांच्या कुंपणाने संरक्षित तो वाक्षर्य किंवा वनदुर्ग
- ओसाड व जलहीन प्रदेशात मध्येच पाण्याच्या आश्रयाने बांधलेला तो मरुदुर्ग
- वेळू किंवा लाकडाचा कुड किंवा भिंती यांचा सभोवार तट असलेला तो दारुदुर्ग
- शस्त्रास्त्रासहित शूर योद्ध्यांनी रक्षण केला जात आहे तो नृ किंवा नरदुर्ग
डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग): हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.
District wise forts in Maharashtra | महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले
District wise forts in Maharashtra: खालील तक्त्यात महाराष्ट्रील जिल्हावार किल्ले (Forts in Maharashtra) दिलेली आहे. ज्याचा अभ्यास आपलाला म्हाडा भरती 2021 च्या परीक्षेत नक्की होईल.
जिल्हा | किल्ले |
अकोला |
|
अमरावती |
|
अहमदनगर |
|
उस्मानाबाद |
|
औरंगाबाद |
|
कोल्हापूर |
|
गोंदिया |
|
चंद्रपूर |
|
जळगाव |
|
बीड |
|
भंडारा |
|
ठाणे |
|
धुळे |
|
नंदुरबार |
|
नागपूर |
|
नाशिक |
|
पुणे |
|
रायगड |
|
सांगली जिल्हा |
|
सोलापूर |
|
सातारा |
|
How many Forts are in Maharashtra | महाराष्ट्रात किती किल्ले आहे
How many Forts are in Maharashtra: महाराष्ट्रात 350 हून अधिक किल्ले (Forts in Maharashtra) असून ते सर्व ऐतिहासिक महत्त्वाचे आहेत. दोन्ही साम्राज्यांनी (आदिलशाह व मोघल) व शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर कसे राज्य केले, युद्धे लढली आणि लक्षात ठेवण्यासारखे काहीतरी मागे सोडले या सर्व कथा किल्ले तुम्हाला सांगतात. जंजिरा, रायगड, पन्हाळा, राजमाची, तिकोना आणि प्रतापगड हे राज्यातील सर्वात लोकप्रिय किल्ले (Forts in Maharashtra) आहेत. यापैकी कोणत्याही किल्ल्याचा प्रवास करणे फार कठीण नाही आणि जर तुम्ही साहस शोधत असाल तर तुम्ही त्यापैकी काही ट्रेक देखील करू शकता.
How many Forts are in Mumbai | मुंबईत किती किल्ले आहे
How many Forts are in Mumbai: सतराव्या शतकातील मुंबई सात बेटांमध्ये विभागली होती, या प्रत्येक बेटाला स्वत:चे महत्त्व होते. त्यामुळे प्राचीन व मध्ययुगात माहीम, शिवडी, माझगाव, शीव या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले होते. त्यांची डागडुजी, पुनर्बांधणी सतत होत असे, मुंबई बेटांना मुख्य भूमीपासून अलग करणारी महिकावती उर्फ माहीमची खाडी अतिशय महत्त्वाची होती. या माहीम खाडीच्या मुखावर बिंबराजांचा किल्ला होता. माहीम खाडीच्या पश्चिम मुखावरील वरळी, बांद्रा आणि माहीमचा किल्ला पाहिल्यावर तिच्या दक्षिण तिरावरून पूर्वेकडे जाताना काळा किल्ला, रिवा किल्ला आणि शीवचा किल्ला असे आणखी तीन लहान किल्ले आपल्याला पाहाता येतात. मात्र आज खाडी आणि रवाजण यात भराव टाकल्यामुळे पूर्वेकडून आत येणारा जलमार्ग बंद होऊन मुंबई व साष्टी एकजीव झाले आहेत, परंतु मुंबई बेटांवरील या किल्ल्याच्या (Forts in Mumbai) स्थानांचा जुना नकाशा पाहिला की या किल्ल्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
Best Forts to Visit in Maharashtra | महाराष्ट्रातील पर्यटनासाठी महत्वपूर्ण किल्ले
Best Forts to Visit in Maharashtra: खाली महाराष्ट्रातील महत्वाच्या किल्यांची (Forts in Maharashtra) माहिती दिली आहे.
शिवनेरी किल्ला: भीमाशंकराच्या जटात अन् नाणेघाटाच्या ओठात एक बुलंद किल्ला आहे. त्याचे नाव शिवनेरी. 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य 3, शके 1552 या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला.
तोरणा किल्ला: गुंजण मावळातला हा बलदंड दुर्ग, पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला. त्याची उंची 1404 मीटर आहे. या डोंगरावर तोरणाची खूप झाडं होती. म्हणून हा तोरणा ! पण पुढे शिवरायांनी तो ताब्यात घेतल्यावर त्याचा प्रचंड विस्तार पाहून त्याचं नाव ठेवलं ‘प्रचंडगड’. याच किल्ल्याची डागडुजी करीत असताना शिवाजीराजांना अमाप भूमीगत धन मिळाले.
कोंडाणा किल्ला: कोंडाणा हा प्राचीन किल्ला शिवरायांच्या ताब्यात खूपच प्रारंभी आला. ‘आधी लगीन कोंडाण्याचे अन् मग रायबाचं’ असं ठरवून आलेला, पोलादी छातीचा नी कणखर मनगटाचा तानाजी मालुसरे इथं यशाचा धनी झाला.
भारतातील उच्च न्यायालयांची यादी
रायगड किल्ला: जेष्ठ शुध्द 13, शके 1596 आनंदनाम संवत्सर म्हणजे 6 जून 1674 रोजी शिवाजीराजांना राज्याभिषेक रायगडावर झाला. क्षत्रिय अकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती झाले. रायरी किल्ल्याचा रायगड असे नाव बदलले. रायगड हा स्वराज्याची राजधानी होती. सह्याद्री पर्वत रांगेत बसलेले आहे आणि तुम्हाला खाली हिरवीगार व्हॅलीचे उत्कृष्ट दृश्य दिसते. हा रमणीय किल्ला आहे.
दौलताबाद किल्ला: 14व्या शतकात बांधलेल्या दौलताबाद किल्ल्याला देवगिरी असेही म्हणतात. हे औरंगाबादपासून सुमारे 16 किमी अंतरावर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दौलताबाद मुघल, पेशव्यांनी आणि मराठ्यांनी काबीज केले. हाईक वर जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
प्रतापगड: तुम्ही साताऱ्याला जात असाल तर प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यासाठी तुमच्या प्रवासात पुरेसा वेळ असल्याची खात्री करा. 1657 मध्ये बांधलेले, ते तुम्हाला किनारपट्टीवरील कोकणचे चित्तथरारक दृश्य देते आणि महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे. तुम्ही ट्रेक करण्याच्या मूडमध्ये नसल्यास, गडावर जाण्यासाठी तुम्ही नेहमी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहू शकता. हे एक्सप्लोर करण्यासारखे आहे आणि तुम्हाला किल्ल्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फोटो काढायचे आहेत.
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs: District Wise Forts In Maharashtra
Q1. किल्ला म्हणजे काय?
Ans जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात.
Q2. नळदुर्ग कोणत्या जिल्हात आहे?
Ans. नळदुर्ग ठाणे जिल्हात आहे.
Q3. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Ans. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.
Q4. शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्यावर झाला?
Ans. शिवरायांचा राज्याभिषेक रायगड किल्यावर झाला.
Q5. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो