Table of Contents
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी योग्य अभ्यासाचे नियोजन असेलच पाहिजे आणि अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व विषय कव्हर झाले पाहिजे. Adda247 मराठी, सर्व उमेदवारांसाठी उत्तम नियोजनासोबत विविध विषयातील अभ्यासक्रमातील विविध टॉपिकसवर लेख आणत असते. ज्याणेंकरून या लेखांमार्फत उमेदवारांना चांगला अभ्यास करता यावा. तर चला आजच्या या लेखात आपण राज्यशास्त्र या विषयावरील मूलभूत कर्तव्ये: कलम 51A यावर चर्चा करणार आहोत.
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | भारतीय राज्यघटना |
लेखाचे नाव | मूलभूत कर्तव्ये: कलम 51A |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणेही अपेक्षित असते. लोकशाहीत लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये, तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे लागते. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976 मध्ये 42व्या घटनादुरूस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86व्या घटनादुरूस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम
मूलभूत कर्तव्ये कलम 51A: प्रस्तावना
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. मात्र, युएसए, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्ये आढळून येत नाही. केवळ जपानच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्ये आढळून येतात. याउलट समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे.
मूलभूत कर्तव्ये कलम 51A: घटनादुरूस्ती
आणिबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्यांबाबत सरदार स्वर्ण सिंह समिती स्थापन केली. या समितीने मूलभूत कर्तव्यांचे(Fundamental Duties of India) एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. सरकारने ही शिफारस स्विकारून 42व्या घटनादुरूस्ती(1976) अन्वये घटनेत भाग IV A समाविष्ट करण्यात आला. या नवीन भागात कलम 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले. या कलमात 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली.
10 मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने केली होती. तसेच, समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला नाही.
11 वे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट करण्यात आले आहे.
मूलभूत कर्तव्यांची यादी
कलम 51A मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
- ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे.
- भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
- देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
- धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
- आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
- वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.
- विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
- सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
- राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी (en-devour and achievements) यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
- जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट केले.)
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य
सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
भारतीय संविधानाची उद्देशिका | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील कृषी अर्थव्यवस्था | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
कार्य आणि उर्जा | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023 | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
रोग व रोगांचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील लोकजीवन | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
वनस्पतीची रचना आणि कार्ये | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
लोकपाल आणि लोकायुक्त | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
पृथ्वीवरील महासागर | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारताची क्षेपणास्त्रे | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील शहरांची यादी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
ढग व ढगांचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
.Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |