Table of Contents
महाराष्ट्राची भू-शास्त्रीय रचना | Geological structure of Maharashtra
Title | Link | Link |
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan | अँप लिंक | वेब लिंक |
1. आर्कियन कालखंडातील खडक: (बेसमेंट कॉम्पेक्स)
निर्मिती: प्री कॅम्ब्रीयन कालखंडातील वितळलेल्या मॅग्मापासून, जिवाश्म आढळत नाहीत.
आर्थिक महत्व: मँगनीज, तांबे, झिंक, शिसे साठे आढळतात.
प्रदेश: भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, सिंधुदुर्ग
2. धारवाड कालखंडातील खडक:
निर्मिती: प्राचिन अग्निजन्य खडकांपासून निर्मिती.
आर्थिक महत्व: या प्रणालीत मँगनीज, सोने, चांदी इ. साठे आढळतात.
प्रदेश: भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग
3. कडप्पा कालखंडातीलखडक:
निर्मिती: धारवाड प्रणालीतील खडकांचे अपक्षरण होऊन यांची निर्मिती, (लोअर पॅलिओझोईक) वाळू मिश्रीत खडक, अतिशय मजबूत
आर्थिक महत्व: डोलोमाईट, चुनखडकाचे साठे आढळतात.
प्रदेश: या खडक प्रणालीत यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
4. गोंडवाना कालखंडातील खडक: (द्रविडीयन प्रणाली)
निर्मिती: वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळून कार्बोनिफेरस कालखंडात.
आर्थिक महत्व: दगडी कोळशाचे साठे आढळतात.
प्रदेश: नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ
5. विंध्ययन कालखंडातील खडक:
निर्मिती: नदीखोऱ्यामध्ये गाळाच्या संचयनातून
आर्थिक महत्व: यामध्ये हिऱ्याच्या खाणी आढळतात.
प्रदेश: चंद्रपूर
अतिशय मजबूत असल्याने बांधकामासाठी वापर. उदा. लाल किल्ल्यासाठी वारलेला मकराना येथील खडक.
6. ज्वालामुखीखडकः (क्रेटॅशियस खडक प्रणाली)
निर्मिती: ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या तप्त लाव्हा पासून.
आर्थिक महत्व: यामध्ये बेसॉल्ट खडक प्रामुख्याने आढळतात.
प्रदेश: महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात
खडकाचा प्रकार | कालावधी | स्वरुप | आढळ | प्रमाण (%) |
आर्कियन | आर्कियन | अतिप्राचिन, अग्निजन्य, रुपांतरीत खडक | सिंधुदूर्ग, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली | 10.5 |
धारवाड | प्रोटेरोझोईक | पुरातन स्तरीत खडक | पूर्व नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर | |
कडप्पा | प्रोटेरोझोईक व लोअर पॅलीओझोईक | कलादगी व पैनगंगा श्रेणी | सिंधुदूर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर व यवतमाळ | 2 |
विध्ययन | प्रोटेरोझोईक व लोअर पॅलीओझोईक | वालुकाश्मय कठीण खडक | चंद्रपूर | |
गोंडवाना | मध्यमजीव | शेल व सँडस्टोन कोळशाचे खडक | कन्हान खोरे,चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती | 1.5 |
डेक्कन ट्रॅप | मध्यमजीव | भ्रंशमुलक ज्वालामुखी स्वरुपाचा अग्निजन्य खडक | चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग,मराठवाडा बहुतांश भाग | 81.3 |
गाळाचे खडक / चतुर्थकालीन खडक | नवजीव कालीन | जुना व नवा गाळ | गोदावरी, कृष्णा, भिमा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता इत्यादी नद्यांचे खोरे | 4.7 |
7.जलजन्य/गाळाचे खडक:
निर्मिती: प्लिस्टोसिन कालखंडात नद्यांच्या गाळाच्या संचयनाने निर्मिती.
आर्थिक महत्व: सिमेंट व विटा तयार करण्यासाठी हे खडक वापरतात.
प्रदेश: मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.