Table of Contents
गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे
MPSC साठी इतिहासाचा अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. आधीच्या लेखात आपण भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेट यांचा अभ्यास केलेलाच आहे. आता आपण गोपाळ हरी देशमुख आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांचा अभ्यास करणार आहोत. आगामी काळातील MPSC Gazetted Civil Services Exam 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे: विहंगावलोकन
MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो.
गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC Gazetted Civil Services Exam 2024 व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | महाराष्ट्राचा इतिहास |
लेखाचे नाव | गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
MPSC Social Reformers of Maharashtra- गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – Gopal Hari Deshmukh – Lokahitavadi
- MPSC Social Reformers of Maharashtra – गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२) : अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक म्हणजे गोपाळ हरी देशमुख.
- त्यांचे जुने आडनाव सिद्धये. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे.
- गोविंदरावांचे पुत्र आणि गोपाळरावांचे वडिल हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले ह्यांच्याकडे फडणीस होते.
- वयाच्या सातव्या वर्षी गोपाळरावांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई.
- गोपाळराव तेरा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले.
- त्या काळी पुण्यातील बुधवारच्या वाड्यात भरणाऱ्या सरकारी मराठी शाळेत गोपाळरावांचे शिक्षण झाले असावे.
- इंग्रजी भाषेचा अभ्यास त्यांनी खाजगी रीत्या सुरु केला होता.
- कोर्टात काही दिवस उमेदवारीही केली.
- पुढे, वयाच्या अठराव्या वर्षी, ते पुण्यातील सरकारी इंग्रजी शाळेत जाऊ लागले.
- १८४४ साली त्यांनी ही शाळा सोडली. त्याच वर्षी दक्षिणेकडील सरदारांच्या एजंटच्या कार्यालयात त्यांना अनुवादकाची नोकरी मिळाली.
- १८४६ साली ते मुन्सफीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८५२ मध्ये वाई (जि. सातारा) येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून त्यांची नेमणूक झाली.
- १८५३ मध्ये ‘ॲक्टिंग प्रिन्सिपल सदर अमीन’ आणि सातारा येथील अदालतीचे प्रमुख म्हणून काही महिने त्यांनी काम पाहिले. १८५५ मध्ये पुणे येथे उत्तर विभागाचे ‘सब-असिस्टंट इनाम कमिशनर’ म्हणून ते नेमले गेले.
- पुढे १८६१ साली हिंदू व इस्लामी कायद्यांचा गोषवारा तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले गेले.
- त्यानंतर सातारा, अहमदाबाद, सुरत, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक अशी विविध ठिकाणी न्यायखात्यात मोलाची सेवा बजावून १८७९ साली ते सेवानिवृत्त झाले.
- १८८४ मध्ये रतलाम संस्थानचे दिवाणपद त्यांनी स्वीकारले. तेथे ते वर्षभर होते.
- ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली.
- भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर नामक पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली.
- ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या निबंधांतून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.
- इंग्रजी राज्य ह्या देशावर आले, ते ईश्वरी योजनेचा एक भाग म्हणून असे आपल्या ‘शतपत्रां’ तून अनेकदा स्पष्टपणे लिहिणाऱ्या लोकहितवादींना असा विश्वास वाटत होता, की इंग्रजांच्या सहवासामुळे आपला समाज विविधविद्यासंपन्न होऊन त्याचे आधुनिकीकरण होईल.
- तथापि इंग्रजांची सत्ता ह्या देशावर कायम राहावी, असे मात्र त्यांना वाटत नव्हते. येथील सर्व गरीब-श्रीमंतांनी एकत्र होऊन विलायतेतील राणीसाहेबांस अर्ज करावा आणि ह्या देशांसाठी ‘पार्लमेंट’ मागून घ्यावे, असेही त्यांनी त्यांच्या एका पत्रात म्हटले आहे. नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापार-उद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.
- आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
- स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो.
- एक जित, पराभूत समाजाच्या दारूण पराजयाची अत्यंत कठोर, चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे ठाकले होते.त्यामुळेच ह्या पराभवाचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी तो केला.
- विद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही.
- विद्या वाढविलीही गेली नाही. परदेशगमन निषिद्ध मानल्यामुळे भूगोलाबद्दल व जगातील विविध स्थळांबद्दल अज्ञान निर्माण झाले.
- विद्यावृद्धी आणि ग्रंथनिर्मिती ह्यांच्यातील नाते अतूट आहे. म्हणूनच उत्तम शिक्षक आणि दर्जेदार ग्रंथ निर्माण व्हायला पाहिजेत, हे सांगून भारतासारख्या बहुभाषी देशात सर्वत्र विद्याप्रसार व्हावयाचा असेल, तर विविध प्रादेशिक भाषांतून ग्रंथनिर्मिती होणे आवश्यक आहे असे त्यांनी सुचवले.
- आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नांचाही लोकहितवादी खोलवर जाऊन विचार करीत होते.
- १८४९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे (हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा ‘अर्थशास्त्र’ हा शब्द रुढ झालेला नव्हता).
- ‘क्लिफ्टसाहेबाच्या इंग्रजी ग्रंथाचे आधाराने’ हा ग्रंथ केल्याचे लोकहितवादींनी म्हटले आहे.
- इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखही महत्त्वाचे आहेत.
- भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे.
त्यांचे अन्य काही ग्रंथ :
- महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९)
- यंत्रज्ञान (१८५०)
- खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१)
- निगमप्रकाश (गुजराती, १८७४)
- जातिभेद (१८७७)
- गीतातत्त्व (१८७८)
- सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०)
- ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३)
- स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३)
- पंडितस्वामी श्रीमद्द्यानंद सरस्वती (१८८३)
- ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५)
- गुजराथचा इतिहास (१८८५)
- वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून काम करीत असताना त्यांनी एक वाचनालय स्थापन केले होते.
- पुण्याच्या ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
- पुण्यात तेलुगू वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते.
- ज्ञानप्रकाश ह्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
- मुंबईहून निघणाऱ्या इंदुप्रकाश ह्या पत्राच्या स्थापनेतही ते होतेच.
- लोकहितवादी ह्या नावाचे एक नियतकालिक ते स्वतःही काळ चालवीत होते.
- अहमदाबाद येथे असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाहमंडळ इत्यादींची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.
- हितेच्छू हे इंग्रजी पत्र काढण्यामागेही त्यांची प्रेरणा होती, असे म्हणतात.
MPSC Social Reformers of Maharashtra- न्या. महादेव गोविंद रानडे | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक- Justice Mahadev Govind Ranade :
MPSC Social Reformers of Maharashtra- न्या. महादेव गोविंद रानडे (१८ जानेवारी १८४२ – १६ जानेवारी १९०१) : भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नासिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले.
- इ. स. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.
- इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी. ए. परीक्षा दिली. इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, इंग्लिश, निबंधलेखन इ. विषयांचे ते एल्फिन्स्टनमध्ये अध्यापन करू लागले.
- १८६४ साली एम्. ए. ची परीक्षा दिली व १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये या तरुण पदवीधराचा समावेश झाला.
- इ. स. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली.
- १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली.
- पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी ॲडव्होकेटची परीक्षा दिली.
- न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ साली रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते.
- उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झाला, असे सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्राप यांनी उद्गार काढले.
- प्रथम पत्नी वारल्यावर वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांचा रमाबाईंबरोबर दुसरा विवाह झाला.
- वृद्ध वडिलांच्या अत्याग्रहामुळे अकरा वर्षांच्या कुमारिकेबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला.
- त्यामुळे त्यांच्या समाजसुधारक म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला. रमाबाईंसमवेत त्यांचा प्रपंच सुखासमाधानाचा झाला. रमाबाईंनी त्यांच्या उदात्त जीवनाशी समरसता प्राप्त करून घेतली.
- महादेवराव यांच्या काळात ‘लोकहितवादी’ देशमुख, विष्णुशास्त्री पंडित, जोतीराव फुले इ. समाजसुधारकांनी सुधारणेचे आंदोलन सुरू केले होते.
- त्यात रानडे सहभागी झाले. १८६२ मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाजसुधारणेची मीमांसा अनेक लेख लिहून केली.
- १८६५ साली विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने एक विधवाविवाह घडवून आणला. परंपरानिष्ठ सनातन धर्मीयांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा-विवाहाच्या पुरस्कर्त्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागला.
- राजा राममोहन रॉय यांनी हिंदु धर्मामध्ये मौलिक, तात्त्विक परिवर्तनास प्रारंभ केला. या मौलिक हिंदू धर्मसुधारणेच्या आंदोलनात न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतःच्या धर्मचिंतनाची भर घातली.
- समाजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस व सामाजिक परिषद या दोन संस्था निर्मिल्या.
- समाजसुधारणेच्या विचारांचा आधार म्हणून निश्चित असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.
- राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्मसुधारणा व समाजसुधारणा ही भिन्नभिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध आहेत,
- मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेकबुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत स्थापना त्यांनी व त्यांच्या अनेक मित्रांनी केली.
- त्या पंथाची तत्त्वे, उपासनापद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये ‘एकेश्वरनिष्ठाची कैफियत’ अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला.
- एकनाथांच्या भागवतधर्माचाम्हणजे वारकरी संप्रदायाचा महादेवरावांच्या मनावर प्रभाव खोल उमटला होता.
- न्या. रानडे १८७१ मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली.
- सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले.
- भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी केली.
- इ. स. १८९० मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले.
- रानडे यांनी १८७० मध्ये स्थापलेल्या पुण्यातील ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेमध्ये फाटाफूट झाली, दोन तट पडले.
- लो. बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानड्यांच्या अनुयायांना दूर सारले. तेव्हा रानड्यांनी १८९३ साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही नवी संस्था काढली.
- स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले.
- रानडे यांनी भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा दोन व्याख्याने देऊन केली.
- रानड्यांनी आपल्या देशात औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून संरक्षक जकातीचे तत्त्व पुरस्कारिले.
- इंग्रज सरकार भारताच्या आर्थिक विकासाच्या विरूद्ध कसे आहे, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला.
- रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठविण्याचाही उद्देश असावा, अशी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली.
- रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे १८८५ साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले.
- गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले.
- रानड्यांनी १८९० साली औद्योगिक परिषद स्थापली. त्यावेळच्या प्रास्ताविक भाषणात आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्बोधक व्याख्याने दिली.
- कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, असे त्यांनी प्रतिपादिले.
- मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.
- साधारणपणे १८९४ पासून पुढील पाच-सहा वर्षे न्या. रानड्यांनी विविध संस्था आणि सभांतून मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (१९६४) या पुस्तकात संग्रहित करण्यात आले.
- स्वकीयांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाची वैशिष्ट्ये निःपक्षपातीपणे सादर करणे व यूरोपीय इतिहासकारांच्या लेखनामुळे त्यासंबंधी निर्माण झालेले अपसमज दूर करणे, हा या लेखनामागील मुख्य हेतू होता.
- दीर्घ आजाराने त्यांचा मुंबई येथे देहान्त झाला.
- भारताच्या नवयुगाचा अग्रदूत गेला, म्हणून देशातील सुशिक्षित वर्ग शोकाकूल झाला. तेव्हा भारतातील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याविषयी आलेल्या मृत्युलेखांत त्यांची थोरवी गायली गेली.
- लो. टिळकांनी लिहिलेल्या मृत्युलेखांत लिहिले आहे, की ‘थंड गोळा झालेला महाराष्ट्र जिवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम प्रथम महादेवरावांनीच केले’.
MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS) | ||
तारीख | वेब लिंक | अँप लिंक |
1 मार्च 2024 | केंद्र – राज्य संबंध | केंद्र – राज्य संबंध |
2 मार्च 2024 | दिल्ली सल्तनत | दिल्ली सल्तनत |
3 मार्च 2024 | राष्ट्रीय उत्पन्न | राष्ट्रीय उत्पन्न |
4 मार्च 2024 |
भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर | भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर |
5 मार्च 2024 |
भारतातील सहकारी संस्था | भारतातील सहकारी संस्था |
6 मार्च 2024 | बंगालची फाळणी | बंगालची फाळणी |
7 मार्च 2024 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
8 मार्च 2024 | मोपला बंड | मोपला बंड |
9 मार्च 2024 | 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 | 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 |
10 मार्च 2024 |
भारतातील खनिज संसाधने | भारतातील खनिज संसाधने |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.