Marathi govt jobs   »   Study Materials   »   राज्यपाल
Top Performing

राज्यपाल: तरतूद, पात्रता व इतर माहिती | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

राज्यपाल: तरतूद, पात्रता व इतर माहिती

राज्यपाल: गव्हर्नर हा देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत इ.) प्रमुख असतो. भारतात, राज्याचे प्रमुख हे सर्व राज्यांचे राज्यपाल आहेत. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारताचे राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याला घटनात्मक महत्त्व आहे. या लेखात आपण राज्यपाल: तरतूद, पात्रता यासारखे महत्त्वाचे मुद्दे पाहू.

महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी
श्रेणी अभ्यास साहित्य
साठी उपयुक्त जिल्हा न्यायालय आणि इतर स्पर्धा परीक्षा
विषय सामान्य जागरूकता
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री रमेश बैस
लेखाचे नाव राज्यपाल: तरतूद, पात्रता व इतर माहिती

राज्यपाल: तरतूद, पात्रता व इतर माहिती

  • भारतीय संविधानात भाग- 4, प्रकरण 2 आणि कलम 153 ते 167 अंतर्गत राज्यपाल पदाची तरतूद आहे.
  • भारतातील प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी तरतूद कलम 153 द्वारे संविधानात केलेली आहे.
  • तसेच एकच व्यक्ती दोन किंवा त्या पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारू शकते.
  • राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्र्पतीद्वारे केली जाते.
  • राज्यपाल हे जनतेचे नव्हे तर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत असतात.
  • राज्यपाल पद स्वीकारण्यासाठी संबंधित व्यक्तीला 1) भारतीय नागरिकत्व व 2) वयाची 35 वर्ष पूर्ण या दोन अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • राज्यपाल त्यांनी ज्या तारखेला पद ग्रहण केले आहे त्या तारखेपासून 5 वर्षांपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. तथापि राष्ट्रपती केव्हाही राज्यपालांना पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देखील देऊ शकतात.
  • राज्यपालांना काही कारणास्तव मुदती आधी आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांना राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो.
  • संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ देतात.

महाराष्ट्राच्या राज्यपालांची संपूर्णयादी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी संबधी बऱ्याचदा प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालांची संपूर्ण यादी आपण एकदा पाहूयात. खालील तक्त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी सोबत प्रत्येक राज्यपालांचे सेवेत असलेला कालावधी, देखील देण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालाचे नाव पासून पर्यंत कालावधी
रमेश बैस 18 फेब्रुवारी 2023 उपस्थित  
भगतसिंग कोश्यारी 5 सप्टेंबर 2019 17 फेब्रुवारी 2023 3 वर्षे, 165 दिवस
चेन्नमनेनी विद्यासागर राव 30 ऑगस्ट 2014 4 सप्टेंबर 2019 5 वर्षे, 5 दिवस
कातेकल शंकरनारायणन 22 जानेवारी 2010 24 ऑगस्ट 2014 4 वर्षे, 214 दिवस
एस.सी. जमीर 9 मार्च 2008 22 जानेवारी 2010 1 वर्ष, 319 दिवस
एस.एम. कृष्णा 12 डिसेंबर 2004 5 मार्च 2008 3 वर्षे, 84 दिवस
मोहम्मद फजल 10 ऑक्टोबर 2002 5 डिसेंबर 2004 2 वर्षे, 56 दिवस
डॉ.पी.सी. अलेक्झांडर 12 जानेवारी 1993 13 जुलै 2002 9 वर्षे, 182 दिवस
डॉ. सी. सुब्रमण्यम 15 फेब्रुवारी 1990 9 जानेवारी 1993 2 वर्षे, 329 दिवस
कासू ब्रह्मानंद रेड्डी 20 फेब्रुवारी 1988 18 जानेवारी 1990 1 वर्ष, 332 दिवस
डॉ. शंकरदयाल शर्मा 3 एप्रिल 1986 2 सप्टेंबर 1987 1 वर्ष, 152 दिवस
कोना प्रभाकर राव 31 मे 1985 2 एप्रिल 1986 306 दिवस
पीर मोहम्मद (अभिनय) 19 एप्रिल 1985 30 मे 1985 41 दिवस
इद्रिस हसन लतीफ 6 मार्च 1982 16 एप्रिल 1985 3 वर्षे, 41 दिवस
ओ. पी. मेहरा 3 नोव्हेंबर 1980 5 मार्च 1982 1 वर्ष, 122 दिवस
श्री सादिक अली 30 एप्रिल 1977 3 नोव्हेंबर 1980 3 वर्षे, 187 दिवस
अली यावर जंग 26 फेब्रुवारी 1970 11 डिसेंबर 1976 6 वर्षे, 289 दिवस
डॉ. पी व्ही. चेरियन 14 नोव्हेंबर 1964 8 नोव्हेंबर 1969 4 वर्षे, 359 दिवस
विजया लक्ष्मी पंडित 28 नोव्हेंबर 1962 18 ऑक्टोबर 1964 1 वर्ष, 325 दिवस
डॉ. पी. सुब्बारायन 17 एप्रिल 1962 6 ऑक्टोबर 1962 172 दिवस
श्री प्रकाश 10 डिसेंबर 1956 16 एप्रिल 1962 5 वर्षे, 127 दिवस
डॉ. हरेकृष्ण महाताब 2 मार्च 1955 14 ऑक्टोबर 1956 1 वर्ष, 226 दिवस
सर गिरिजा शंकर बाजपेयी, KCSI, KBE, CIE 30 मे 1952 5 डिसेंबर 1954 2 वर्षे, 189 दिवस
राजा सर महाराज सिंग, CIE 6 जानेवारी 1948 30 मे 1952 4 वर्षे, 145 दिवस

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री रमेश बैस आहेत. श्री रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली. ते त्यांच्यासोबत सार्वजनिक सेवेतील एक विशाल आणि वैविध्यपूर्ण अनुभव घेऊन येतात.

रमेश बैस (जन्म 2 ऑगस्ट 1947) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या 2023 पासून महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. बैस यांनी 2021 ते 2023 पर्यंत झारखंडचे राज्यपाल आणि 2019 ते 2023 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.[1] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले आहे. 9व्या लोकसभा (1989) आणि 11व्या ते 16व्या लोकसभेचे (1996-2019) सदस्य म्हणून काम करण्यासह, रायपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेवर बैस सात वेळा निवडून आले आहेत.

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?

भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. पूर्वीच्या बॉम्बे स्टेट मधून बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 ने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती केली. या कालावधीत श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. इ.स. 1956 ते इ.स. 1962 हे 6 वर्ष त्यांनी हे पद उपभोगले. याशिवाय श्री प्रकाश भारताचे पाकिस्तानातील सर्वप्रथम हाय कमिशनर (1947-1949), आसामचे राज्यपाल (1949-50), मद्रासचे गव्हर्नर (1952-1966) आणि बॉम्बे राज्याचे गव्हर्नर (1956-1960) या पदी होते.

महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिलेली व्यक्ती

डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिलेली व्यक्ती आहेत. यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद 12 जानेवारी 1993 रोजी हाती घेतले. महाराष्ट्राचे राज्यपाल पद त्यांनी 13 जुलै 2002 रोजी सोडले. अश्या रीतीने ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एकूण 9 वर्षे, 182 दिवस राहिले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

विजया लक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद 28 नोव्हेंबर 1962 ते 18 ऑक्टोबर 1964 सांभाळले.

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

राज्यपाल: तरतूद, पात्रता व इतर माहिती | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

कोणत्या कलमानांतर्गत राज्यपाल पदाची तरतूद आहे?

कलम 153 ते 167 अंतर्गत राज्यपाल पदाची तरतूद आहे.

राज्यपालांची नियुक्ती ही कोणाद्वारे केली जाते?

राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्र्पतीद्वारे केली जाते.

राज्यपाल पद स्वीकारण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे?

राज्यपाल पद स्वीकारण्यासाठी संबंधित व्यक्तीला 1) भारतीय नागरिकत्व व 2) वयाची 35 वर्ष पूर्ण या दोन अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.