Marathi govt jobs   »   Maharashtra Gramsevak Bharti 2023   »   ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
Top Performing

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद भरती एकूण 1621 पदांसाठी राबविल्या जाणार आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय गट क संवर्गातील पद म्हणजे ग्रामसेवक होय. नुकताच ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. खूप विद्यार्थी या ग्रामसेवक भरती ची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच जिल्हा परिषद विभागाने जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम जाहीर केला आहे. ग्रामसेवक हे ग्राम पातळीवरील तलाठी एवढेच महत्वाचे पद आहे. ज्या उमेदवारांना ग्रामसेवक होण्याची इच्छा आहे त्यांनी ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम माहिती हवा तरच परीक्षेत चागले यश प्राप्त करता येईल. आज या लेखात ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपात दिला आहे.

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम : विहंगावलोकन

ग्रामसेवक परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम : विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव ग्रामसेवक भरती 
पदाचे नाव

ग्रामसेवक

लेखाचे नाव ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप 

ग्रामसेवक भरतीच्या परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर आपल्याला ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. तरच कोणत्या विषयाला किती गुण आहेत, कोणत्या विषयावर भर द्यायचा याबाबत माहिती मिळते. ग्रामसेवक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असते. प्रत्येक प्रश्न 02 गुणांचा याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारल्या जातात. तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी (बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न) या विषयात प्रत्येकी 15 प्रश्न विचारल्या जाणार आहेत तर तांत्रिक (कृषी) विषयावर एकूण 40 प्रश्न विचारल्या जाणार आहे. ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 02 तास
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
एकूण 100 200  

ठळक मुद्दे

  • ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
  • तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 

ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत एकूण 05 विषय आहेत. ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक (कृषी) विषय आहे. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम सविस्तरपणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे. ज्यात विषयानुसार महत्वाचे टॉपिक देण्यात आले आहे.

विषय अभ्यासक्रम तपशील
मराठी भाषा
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
  • वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
  • व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी भाषा
  • General Vocabulary (Synonyms and Antonyms)
  • Sentence structure (Types or Sentence, Error Detection)
  • Grammar (Parts of Speech, Subject Verb Agreement, Tense, Direct Indirect Speech, Voice)
  • Use of Idioms and Phrases and their meaning
  • Comprehension of passage
सामान्य ज्ञान
  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्ये
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास,
  • हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
बौद्धिक चाचणी
  • सामान्य बुद्धीमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न
तांत्रिक विषय (कृषी)

अ. समाजशास्त्र विषयक ज्ञान

  • समाज मानसशास्त्र
  • समुदाय संस्था
  • समाजसुधारकांचे योगदान
  • सामाजिक समस्या सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे

ब. पंचायतराज व्यवस्था

  • 73 वी घटनादुरुस्ती
  • महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण)

क. कृषी विषयक ज्ञान

  • कृषी मुलतत्वे
  • पीक उत्पादन तंत्रज्ञान
  • फलोत्पादन
  • पीक संरक्षण
  • कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
  • कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान
  • सहकार पतपुरवठा
  • पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
  • सेंद्रिय शेती
  • कृषी आधारित उद्योग
  • मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन
  • पर्यावरणीय बदल

ड. इतर

  • आपत्ती व्यवस्थापन
  • महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना
  • मुलभूत संगणक ज्ञान
  • माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000
  • जैव विविधता
  • सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा_4.1

FAQs

मी ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप कोठे पाहू शकतो?

आपण ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम या लेखात पाहू शकता.

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.