Table of Contents
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023: जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एकूण 2266 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी लवकरच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 जाहीर होणार आहे. 2023 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये वित्त विभागाने ज्या विभागांचे आकृतिबंध तयार झाले आहे. त्या विभागातील सर्व पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 12 जुलै 2023 रोजी श्री. रा. म. गेंगजे, उपसचिव महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी लवकरात लवकर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 करावी असे निर्देश दिले आहे. आज या लेखात आपण ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023: विहंगावलोकन
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील एकूण 2266 पदांची भरती होणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन या लेखात देण्यात आले आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभागाचे नाव | ग्रामप्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 |
पदाचे नाव |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
एकूण रिक्त पदे | 2266 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://water.maharashtra.gov.in/ |
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे अद्ययावत परिपत्रक
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे अद्ययावत परिपत्रक: जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध दिनांक 28 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकरीता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गात 1094 नवीन पदे निर्माण केली आहेत. यापूर्वीची एकूण 1972 पदे व नवीन 1094 पदे याप्रमाणे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची एकूण 2266 पदे ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी मंजूर करण्यात आली आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये वित्त विभागाने नवीन पदभरतीवरील निर्बंध शिथिल केले असून ज्या विभाग / कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 100 टक्के रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये कनिष्ठ अभियंत्यांची पदे मोठया प्रमाणावर भरण्यात येतात. यातील एक भाग म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा सुधारित आकृतीबंध विचारात घेऊन जल जीवन मिशन अधिक गतिमान करण्यासाठी वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील सर्व रिक्त पदे विहित पद्धतीने भरण्याबाबत मा. प्रधान सचिव यांच्या स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. याच अनुषगाने महाराष्ट्राचे उपसचिव श्री. रा. म. गेंगजे यांनी लवकरात लवकर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 12 जुलै 2023 चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे अद्ययावत परिपत्रक
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 2266 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांची भरती होणार आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 2266 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |