Marathi govt jobs   »   Study Materials   »   गुरुत्वाकर्षण (Gravitation): मुलभूत संज्ञा आणि सिद्धांत

गुरुत्वाकर्षण (Gravitation): जिल्हा परिषद परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण: गुरुत्वाकर्षण हे भौतिक शास्त्रातील एक महत्वपूर्ण बल आहे. गुरुत्वाकर्षणचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. महाराष्ट्रातील आगामी काळातील  जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. गुरुत्वाकर्षण या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आज या लेखात आपण गुरुत्वाकर्षण त्याचे मुलभूत नियम व सूत्रे इ. गोष्टी पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

गुरुत्वाकर्षण: विहंगावलोकन

गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. गुरुत्वाकर्षणचे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

गुरुत्वाकर्षण: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती 2023 व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय भौतिकशास्त्र
लेखाचे नाव गुरुत्वाकर्षण
लेखात काय दिले आहे?
  • गुरुत्वाकर्षणाचा शोध
  • केप्लरचे नियम
  • न्युटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

गुरुत्वाकर्षण: शोध 

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला, हे आपणा सर्वांना माहितच असेल. पण गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला? या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

असे म्हटले जाते कि सर आयझॅक न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाली खाली झोपले होते व तेवढ्यात त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद पडते. मग त्यांच्या मनात विचार येतो कि सफरचंद सरळ रेषेत खालीच का पडले असेल? तिरके किंवा वरच्या दिशेला का गेले नसेल? या वरून न्यूटनने निष्कर्ष काढला कि नक्कीच कोणते तरी बल आहे, ज्या द्वारे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व ज्याची दिशा पृथ्वीच्या केंद्र कडे असेल.

गुरुत्वाकर्षण (Gravitation): मुलभूत संज्ञा आणि सिद्धांत_3.1
गुरुत्वाकर्षण शोध

केप्लरचे नियम 

योहानास केप्लर या शास्त्रज्ञाने सोळाव्या शतकात ग्रहांच्या स्थिती व गती विषयी खूप अभ्यास करून बरीच माहिती मिळवली. त्याने केलेल्या संशोधनाद्वारे त्याला समजले कि ग्रह आपल्या गती विषयी काही विशिष्ट नियम पाळतात. ते नियम खाली सविस्तर पणे दिले आहेत.

केप्लरचा पहिला नियम:

ग्रहाची सुर्याभोवतीच्या परीभ्रमनाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या दोन पैकी एका नाभीवर असतो.

खालील आकृती पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल कि ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्याची स्थिती ही  बिंदू S ने दाखविली आहे.

गुरुत्वाकर्षण (Gravitation): मुलभूत संज्ञा आणि सिद्धांत_4.1
ग्रहांचे सूर्याभोवती परिभ्रमण

केप्लरचा दुसरा नियम:

ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही, सारखे क्षेत्रफळ सारख्याच वेळेत पूर्ण करते.

वर दिलेल्या आकृतीमध्ये AB, CD व EF ही एका ग्रहाने समान वेळेत पूर्ण केलेले अंतर आहे. या नियमानुसार क्षेत्रफळ ASB, CSD आणि ESF ही सामान क्षेत्रफळे आहेत.

केप्लरचा तिसरा नियम:

ग्रहाच्या अवर्तनकालचा वर्ग हा सूर्य आणि ग्रहामधल्या अंतराचा घन हे एकमेकांशी समानुपाती असतात. जर ग्रहाचा आवर्तनकाल T असेल आणि सूर्य आणि ग्रहामधील आंतर r असेल तर

T2 ∝ r3    म्हणजेच  T2/r3  = k = स्थिर

केप्लरने ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करून हे नियम मांडले. परंतु ग्रह ह्या नियमांचे पालन का करतात हे तो सिद्ध करू शकला नाही.

न्युटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत 

न्युटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत : या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने खेचत असते. उदा. आपण जेव्हा पृथ्वीवर उभे असतो तेव्हा आपण आणि पृथ्वी एकमेकांना एका विशिष्ट बलाने खेचत असतो. परंतु पृथ्वीचे बल अधिक असल्याने आपल्या बलाचा पृथ्वीवर परिणाम होत नाही. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वास्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती तर त्यांच्या मध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते.

म्हणजेच   F ∝ m1.m2 / d2   किंवा F = G. m1.m2 / d2. G हा स्थिरांक असून यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात.

गुरुत्वाकर्षण (Gravitation): मुलभूत संज्ञा आणि सिद्धांत_5.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
भौतिक राशी आणि त्यांचे एकके
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP)
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला.

गुरुत्वाकर्षण हा विषय कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे?

गुरुत्वाकर्षण हा विषय सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे.