Table of Contents
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?
सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे. पाठ्यपुस्तक अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.
Title | अँप लिंक | वेब लिंक |
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | लिंक | लिंक |
हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा
हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ
हरितगृह परिणाम
- पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणाऱ्या तापमानवाढीस जागतिक तापमान वाढ म्हणतात.
- सामान्यतः पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याची काही किरणे शोषून घेतो त्यामुळे तो उबदार होतो, तर काही उष्णता वातावरणात पसरते.
- नैसर्गिकरीत्या उद्भवणारे वायू, वातावरणामध्ये अस्तित्वात असणारे वायू या उष्णतेचा काही भाग अडवतात आणि त्यास पुन्हा अवकाशात जाण्यापासून रोखतात.
- यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता वाढते आणि तपांबराच्या तापमानात भरीव वाढ होते.
- ही प्रक्रिया पृथ्वीला पुरेसे उबदार ठेवते आणि पृथ्वीवरील जीवन या तापमानात टिकून राहते.
- कार्बनडॉयऑक्साइड (CO2), मिथेन (CH), नायट्रस ऑक्साइड (NO), सल्फर ऑक्साइड (SO) या वायूंना हरितगृह वायू (GHG) म्हणतात. कारण ते हरितगृहाच्या काचेसारखे कार्य करतात ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते.
- तपांबरामध्ये उष्णता अडवल्या जाण्याच्या हया प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणतात.
जागतिक तापमान वाढ
- जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असते.
- वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे CO2, SO2, NO आणि CO अशा वायूंची वाढ होत आहे.
- क्लोरोफ्लुरोकार्बनसारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमान वाढीस जबाबदार ठरतात.
- पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या या तापमान वाढीस जागतिक तापमान वाढ असे म्हणतात.
हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series
टॉपिक | संदर्भ | अँप लिंक | वेब लिंक |
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
राजकीय पक्ष | 10 वी इतिहास व राज्यशास्त्र | लिंक | लिंक |
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
वनस्पतींचे वर्गीकरण | 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान | लिंक | लिंक |
भारतातील नद्या | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | 8 वी इतिहास | लिंक | लिंक |
परिचय शास्त्रज्ञांचा | 9 वी व 10 वी विज्ञान | लिंक | लिंक |
स्त्रीवादी इतिहास लेखन | 10 वी इतिहास व राज्यशास्त्र | लिंक | लिंक |