Table of Contents
Hill Stations in Maharashtra
Hill Stations in Maharashtra: The hill stations are high-altitude towns for recreation and enjoyment. Hill Stations in Maharashtra are attractive places for tourists and nature lovers. Hill Stations in Maharashtra boost tourism in Maharashtra. Employment opportunities are available in various fields because of Hill Stations in Maharashtra. In this article, you will get detailed information about Hill Stations in Maharashtra.
Last Minute Tips For MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023
Hill Stations in Maharashtra: Overview
There are many Hill Stations located in the Sanhyadri mountain range. Hill Stations in Maharashtra are famous for their natural formations and scenic spots. Get an overview of Hill Stations in Maharashtra in the table below.
Hill Stations in Maharashtra | |
Category | Study Material |
Useful for | All Competitive Exam |
Subject | Maharashtra Geography |
Article Name | Hill Stations in Maharashtra |
Hill Stations in Maharashtra
Hill Stations in Maharashtra: महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला असता आपल्याला विविधता आढळून येते. कुठे सपाट मैदानी प्रदेश तर कुठे डोंगररांगा. महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग म्हणजे संह्याद्री पर्वतरांग. याच संह्याद्रीच्या शिखरावर अनेक थंड हवेची ठिकाणे (Hill Stations in Maharashtra) आहेत. तसेच इतर ठिकाणी पण थंड हवेची ठिकाणे आहे. Hill Stations in Maharashtra मुळे महाराष्ट्रातल्या पर्यटनाला चालना मिळते. विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. MPSC नागरी सेवा परीक्षा 2023 (MPSC Civil Services 2023), MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Non Gazetted Services Exam 2023) तसेच महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, तलाठी भरती (Talathi Bharti 2023), कृषी विभाग भरती (Krushi Vibhag Bharti 2023) व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत कोणते थंड हवेचे ठिकाण (Hill Stations in Maharashtra) कोणत्या जिल्हात आहे किंवा त्याची उंची किती आहे यावर प्रश्न विचारल्या जातात त्यामुळे याची माहिती असणे आवश्यक आहे. आज या लेखात आपण Hill Stations in Maharashtra बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
List of Hill Stations in Maharashtra | महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणांची यादी
List of Hill Stations in Maharashtra: खालील तक्त्यात महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणांची (Hill Stations in Maharashtra) यादी दिली आहे.
महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे | जिल्हा | उंची (मी.) |
चिखलदरा | अमरावती | 1188 |
महाबळेश्वर | सातारा | 1438 |
आंबोली | सिंधुदुर्ग | 690 |
म्हैसमाळ | औरंगाबाद | 1067 |
लोणावळा | पुणे | 624 |
माथेरान | रायगड | 800 |
खंडाळा | पुणे | 550 |
भंडारदरा | अहमदनगर | |
तोरणमाळ | नंदुरबार | 1150 |
पन्हाळा | कोल्हापूर | 754 |
पाचगणी | सातारा | 1293 |
Hill Stations in Maharashtra: Mahabaleshwar (महाबळेश्वर)
Hill Stations in Maharashtra: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण (Hill Stations in Maharashtra) आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. सातार्याचे महाराज प्रतापसिंह यांनी 1818 ते 1830 दरम्यान महाबळेश्र्वर हे आरोग्यवृद्धीसाठी विकसित करण्याचे ठरवले. जॉन माल्कम हे तेव्हाचे गव्हर्नर 1828 मध्ये महाबळेश्वरला भेट देऊन गेले. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून नियोजित विकास केला.
महाबळेश्वर पाहताना बॉम्बे पॉइंट, ऑर्थर सीट, केटस् पॉईंट, लॉडविक – विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची! श्री क्षेत्र महाबळेश्वर येथूनच कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या उगम पावतात. या स्थानाला पंचगंगा असेही म्हटले जाते.
उत्तम रस्ते, दाट झाडी, बागा, फुला-फळांच्या रोपवाटिका यामुळे महाबळेश्र्वर अनेकांचे आवडीचे थंड हवेचे ठिकाण आहे. जॅम-जेली, सरबते, मध, चणे, स्ट्रॉबेरी यांसाठीही महाबळेश्र्वर प्रसिद्ध आहे.
उंच कडे, खोल दर्या, दाट जंगले, थंड-स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा सुंदर अनुभव सह्याद्रीच्या रांगेतील या स्थानामध्ये मिळतो. परिसरातल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादवकाळात यादव राजांनी बांधले.
Hill Stations in Maharashtra: Panchgani (पाचगणी)
Hill Stations in Maharashtra: Pachgani: पाच डोंगरांवर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण (Hill Stations in Maharashtra) सातारा जिल्ह्यात आहे. हे ठिकाण सुमारे 1372 मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
स्ट्रॉबेरी, तुती, केशरी गाजरे, मध, या सोबतच जॅम – जेली, सरबते तयार करणार्या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे. रोपवाटिकांमधून मिळणार्या विविध फुला-फळांच्या रोपांची रेलचेल, यामुळे पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात भर पडली आहे.
Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015
Hill Stations in Maharashtra: Lonavala (लोणावळा)
Hill Stations in Maharashtra: Lonavala: महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांत विशेष प्रसिद्ध असलेले लोणावळा हे एक ठिकाण आहे. लोणावळा हे पुणे जिल्ह्यात आहे. सुमारे 624 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण पावसाळ्यात धबधब्यांमुळे अधिकच आकर्षक दिसते. पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये ही ठिकाणे आहेत. पुणे-मुंबई महामार्ग (रस्ता) व पुणे-मुंबई लोहमार्ग या दोन्ही मार्गांवर ही ठिकाणे आहेत. संपूर्ण भारतातील पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात
Hill Stations in Maharashtra: Matheran (माथेरान)
Hill Stations in Maharashtra: Matheran: रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात 800 मी. उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. दाट जंगले, डोंगर-दर्या, वळणा-वळणांचे घाटांचे रस्ते यांबरोबरच येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. वाहनांना प्रवेश नसल्यामुळे माथेरानमध्ये चालत, घोड्यावरून किंवा डोलीतून भटकंती करावी लागते. येथे एकूण 25 ठिकाणे (पाईंट्स) पाहण्यासारखी आहेत.
Hill Stations in Maharashtra: Toranmal (तोरणमाळ)
Hill Stations in Maharashtra: Toranmal: नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात सातपुडा पर्वताच्या रांगांत सुमारे 1143 मीटर उंचीवर थंड हवेचे ठिकाण आहे. आदिवासी लोक बहुसंख्येने राहत असलेल्या अक्राणी तालुक्यात हे हिरवेगार असे ठिकाण आहे. पूर्वीच्या मांडू घराण्याच्या राजांचे हे राजधानीचे ठिकाण होते.
Important Rivers In Maharashtra
Hill Stations in Maharashtra: Chikhaldara (चिखलदरा)
Hill Stations in Maharashtra: Chikhaldara: सातपुडा पर्वतराजीतील अमरावती जिल्ह्यातील हे एक सुमारे 1118 मीटर उंचीवरचे थंड हवेचे ठिकाण (Hill Stations in Maharashtra) आहे. महाराष्ट्रात चिखलदर्याच्या आसपास कॉफीचे उत्पादन घेतले जाते. येथून जवळच मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असलेले अभयारण्य व गाविलगडचा किल्ला आहे. साग, बांबू, मोह यासारखी भरपूर झाडे असलेले दाट जंगल आणि घाटांच्या नागमोडी वळणांचा रस्ता असलेले हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेलगतच आहे.
Hill Stations in Maharashtra: Amboli (आंबोली)
Hill Stations in Maharashtra: Amboli: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आंबोली हे स्थान सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. डोंगर-दर्या, जंगल, धबधबे, समुद्र दिसण्याचे उंच ठिकाण यांचा आनंद आपण येथे घेऊ शकतो. आंबोली येथे महादेवगड पॉईंट, मलईचे जंगल, सनसेट पॉईंट, शिरगावकर – परीक्षित पॉईंट्स, कावळे प्रसादचा कडा, नारायण गड, महादेव गड, नांगरकासा धबधबा – अशी अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exam | Click Here |