Marathi govt jobs   »   Study Materials   »   मानवी रोग | Human Diseases

मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases: Classification of Diseases and Causes of Diseases

Table of Contents

मानवी रोग: वर्गीकरण आणि माहिती | Human Diseases: Classification and Information |  Revision Material for MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. या लेखात आपण पाहुयात; Human Diseases: Classification and Information | मानवी रोग: वर्गीकरण आणि माहिती

संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र

Human Diseases

Human Diseases: Classification and Information | मानवी रोग: वर्गीकरण आणि माहिती: MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे;Human Diseases | मानवी रोग

सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती

Classification of Human Diseases | मानवी रोगांचे वर्गीकरण

मानवी रोग: वर्गीकरण आणि माहिती | Human Diseases: Classification and Information सध्याच्या कोव्हीड-19 च्या काळात मानवी रोग आणि त्याचे उपाय हा अतिशय कळीचा मुद्दा बनला आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोरोना सारख्या विषाणूजन्य आजार असोत की कर्करोगा सारखे रोग असोत, मानवी रोगांचा अभ्यास हा मानवाच्या विकासातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परीक्षेचा विचार केल्यास कमीत कमी एक प्रश्न तरी मानवी रोग या घटकावर राज्यासेवेच्या प्रत्येक परीक्षेत विचारला जातो. या लेखात आपण Human Diseases: Classification and Information | मानवी रोग: वर्गीकरण आणि माहिती याचा अभ्यास करणार आहोत. मानवी रोगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे;

रोगांच्या कालावधी नुसार वर्गीकरण | Based on Duration of Disease

1. तीव्र आजार | Acute Diseases 

  • आजाराचा कालावधी कमी असतो
  • लवकर उपचार न केल्यास मृत्यू उद्भवू शकतो
  • उदा. इबोला, स्वाईन फ्लू, कोरोना इत्यादी

2. दीर्घकालीन आजार | Chronic Diseases 

  • हे आजार दीर्घकाळ कधीकधी आयुष्यभर टिकतात
  • रोग बराच काळ शरीराच्या आत राहतो आणि या रोगामुळे रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
  • उदा. मधुमेह, क्षयरोग, कर्करोग इत्यादी

रोगांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार वर्गीकरण | Based on Transmission of Diseases

रोगांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार वर्गीकरण | Based on Transmission of Diseases: रोगांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार वर्गीकरण खाली सविस्तर दिले आहे.

1. स्थाननिष्ठ/प्रदेशनिष्ठ रोग | Endemic Diseases

  • काही रोग फक्त विशिष्ट भागात आढळतात व काही विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्येच आढळता.
  • उदा. हत्तीपाय रोग (फीलॅरेसिस )- हा रोग केरळच्या तीन जिल्ह्यांमध्ये स्थानिक आहे (अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, कोट्टायम)

2. व्यापक रोग | Epidemic Diseases

  • मोठ्या प्रदेशावर पसरतात आणि जास्त लोकांना प्रादुर्भाव होतो
  • उदा. टायफॉइड, कॉलरा, क्षयरोग, स्वाइन फ्लू इत्यादी

3. महामारी | Pandemic Diseases

  • जगाच्या काही भागात किंवा जगभर प्रादुर्भाव होतो
  • उदा. एड्स, इबोला कोरोना इत्यादी

रोगकाराकावर आधारित वर्गीकरण | Based on Cause of Disease

रोगकाराकावर आधारित वर्गीकरण | Based on Cause of Disease: रोगकाराकावर आधारित वर्गीकरण खाली सविस्तर दिले आहे.

1. संसर्गजन्य रोग | Infectious Diseases

  • व्हायरस, बॅक्टेरिया, प्रोटोझोअन्स, हेल्मिन्थ्स (वर्म्स) इत्यादीसारख्या काही जैविक एजंट्स किंवा रोगजनकांमुळे होते.
  • संपर्क, पाणी, हवा, अन्न इत्यादीद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणे
  • उदा. कॉलरा, क्षयरोग, स्वाइन फ्लू, कोरोना इत्यादी

2. असंसर्गजन्य रोग | Non-infectious Diseases

  • काही विशिष्ट घटकांमुळे, जसे की काही महत्वाच्या अवयवांची खराबी, पोषक घटकांची कमतरता इ.
  •  संपर्काद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही.
  • उदा. आनुवंशिक रोग, रातांधळेपणा, कर्करोग, मधुमेह, जननेंद्रियाचे रोग इत्यादी

रोगकाराकाच्या प्रकारावर आधारित | Based on Type of Pathogens

रोगकाराकावर आधारित वर्गीकरण | Based on Cause of Disease: रोगकाराकावर आधारित वर्गीकरण खाली सविस्तर दिले आहे.

1. विषाणू | Bacterial Diseases

कांजिण्या (Chicken Pox)

  • विषाणू – व्हेरिसेला झूस्टर
  • संसर्ग – थेंबावाटे किंवा थेट संपर्क
  • अवयव – त्वचा
  • लक्षणे – अति जास्त ताप, डोकेदुखी, (पांढरे) पाण्याने भरलेले त्वचेवर फोड
  • उपाय – अँटी व्हेरीसेला लस. रोगप्रतिकारक शक्ती आयुष्यभर टिकून राहते.
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_3.1
Chickenpox

देवी (Small Pox)

  • विषाणू – वरिओला
  • संसर्ग – थेंबावाटे
  • अवयव – त्वचा
  • लक्षणे – अति जास्त ताप, अंधत्व, संपूर्ण शरीरात पुरळ
  • उपाय – देवीची लस. या रोगाचे भारतातून पूर्णपणे निर्मुलन झाले आहे
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_4.1
Small Pox

गोवर (Measles)

  • विषाणू – मायक्सोव्हायरस
  • संसर्ग – थेंबांद्वारे आणि हवेद्वारे
  • अवयव – त्वचा
  • लक्षणे – ताप, त्वचेवर लाल रंगाचे पुरळ
  • उपाय – एमएमआर तिहेरी लस. एमएमआर- गोवर, गालगुंड आणि रुबेला
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_5.1
Measles

गलगंड (Mumps)

  • विषाणू – पॅरामीक्सो व्हायरस
  • संसर्ग – थेट संपर्क
  • अवयव – लाळ ग्रंथी
  • लक्षणे – गालावर सूज येणे, वेदना, ताप, अन्न-पाणी गिळण्यात अडचण
  • उपाय – एमएमआर तिहेरी लस. एमएमआर- गोवर, गालगुंड आणि रुबेला
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_6.1
Mumps

रुबेला/ जर्मन गोवर (Rubella)

  • विषाणू – मायक्सोव्हायरस
  • संसर्ग – थेट संपर्क
  • अवयव – गळ्यातील लिम्फ नोड्स आणि ग्रंथी
  • लक्षणे – ग्रंथींची वाढ, शरीरभर चट्टे
  • उपाय – एमएमआर तिहेरी लस. एमएमआर- गोवर, गालगुंड आणि रुबेला
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_7.1
rubella

पोलिओ (Polio)

  • विषाणू – एन्टेरो व्हायरस
  • संसर्ग – दूषित अन्न आणि पाणी
  • अवयव – मध्यवर्ती मज्जासंस्था
  • लक्षणे -ताप, घसा खवखवणे, लठ्ठपणा आणि हातात आणि पाय तसेच  संपूर्ण शरीरात कमजोरी
  • उपाय – साल्क ल्स आणि सबीन लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_8.1
Polio

कावीळ (हिपॅटायटीस – Hepatitis)

  • विषाणू – पाच प्रकारचे विषाणू आहेत A, B, C, D आणि E
  • संसर्ग – हिपॅटायटीस ए आणि डी दूषित अन्न आणि पाण्याद्वारे प्रसारित होतो तर हेपेटाइट्स बी, सी, ई रक्त, लैंगिक संबंधद्वारे प्रसारित होतो
  • अवयव – यकृत
  • लक्षणे -त्वचा आणि डोळ्यांवर पिवळसर डाग. गडद पिवळे मूत्र, मळमळ, भूक न लागणे, पोटदुखी इत्यादी
  • उपाय – हिपॅटायटीस ए, बी आणि डी साठी लस उपलब्ध पण सी आणि ई साठी कोणतीही लस उपलब्ध नाही.
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_9.1
Hepatitis

स्वाईन फ्लू (Swine flu)

  • विषाणू – एच 1 एन 1 विषाणू (H-Haemaglutinin; N-Neuroaminidase)
  • संसर्ग – हवेद्वारे
  • अवयव -श्वसन संस्था
  • लक्षणे -ताप, खोकला, छातीत अस्वस्थता, घसा खवखवणे, अशक्तपणा, थकवा
  • उपाय – औषध = Tamiflu किंवा fluviar.       लस – व्हॅक्सीग्रिप (तिहेरी लस)
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_10.1
Swine flu

रेबीज / हायड्रोफोबिया (Rabies / Hydrophobia)

  • विषाणू – रॅब्डोव्हायरस
  • संसर्ग – रेबीजने ग्रस्त कुत्रा, मांजर, ससा यासारख्या प्राण्यांचा चावा
  • अवयव – मध्यवर्ती मज्जासंस्था
  • लक्षणे -हायड्रोफोबिया (पाण्याची भीती), ताप, पायांवर सूज, अशक्तपणा.
  • उपाय – नेक्स्लाइन अँटी रेबीज लसीकरण
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_11.1
Rabies

एड्स (एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम) (AIDS)

  • विषाणू – एचआयव्ही (ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस)
  • संसर्ग – प्रभावित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संपर्क.रक्तासह थेट संपर्क, प्रभावित आईपासून तिच्या बाळापर्यंत, तसेच ड्रग वापरकर्त्यांमध्ये
  • अवयव – कोणत्याही विशिष्ट अवयवावर हल्ला करत नाही. तर टी -4 लिम्फोसाइट्स प्रामुख्याने, सर्व पांढऱ्या रक्तपेशीं हल्ला
  • लक्षणे – एड्स’ हा कोणत्याही विशिष्ट अवयवाचा रोग नाही, तर तो एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम हा अनेक रोगांचा समूह आहे. यात इतर आजार सहज होऊ शकतात जसे क्षयरोग,बुरशीजन्य संसर्ग, मेंदूचा कर्करोग इत्यादी
  • उपाय – कोणतीही लस उपलब्ध नाही. एलिसा चाचणी निदानासाठी वापरली जाते. औषधे – ATZ (Azido Thymidine), Ritonavir, Lamivudine, DDC (Dide Oxycytidine), Tenofovir, zidovudine इत्यादी.
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_12.1
AIDS

2.जीवाणू | Viral Diseases

टायफॉइड (Typhoid)

  • जीवाणू- साल्मोनेला टायफी
  • संसर्ग – प्रदूषित (अस्वच्छ) अन्न, पाणी आणि हाऊसफ्लाय (घरमाशी)
  • अवयव – साधारणपणे आतडे
  • लक्षणे -भूक न लागणे, अतिजास्त ताप, छाती आणि पाठ (गुलाबी ठिपके), अतिसार, मळमळ, डोकेदुखी इत्यादी
  • उपाय – विडाल टेस्टस (निदान करण्यासाठी), औषध-क्लोरोमायसेटिन आणि TAB लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_13.1
Typhoid

क्षयरोग (Tuberculosis)

  • जीवाणू- मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युली
  • संसर्ग – थुंकीच्या स्वरूपात, थेंबांच्या स्वरूपात
  • अवयव – मूत्राशय, हाडे, पाठीचा कणा, मेंदू इत्यादी अवयव बाधीत होतात परंतु सामान्यतः फुफ्फुसांवर हल्ला
  • लक्षणे – खोकला (2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ), ताप, छातीत वेदना, थुंकीतून रक्तस्त्राव वजन कमी होणे.
  • उपाय – क्ष-किरण किंवा क्षयरोग चाचणी (निदान करण्यासाठी), औषध-स्ट्रेप्टोमाइसिन रिफाम्पिसिन,आइसोनियाझाइड, पायरीझिनामाइड, एथाम्बुटोल इत्यादी. लस – बीसीजी लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_14.1
Tuberculosis

कॉलरा (Cholera)

  • जीवाणू- विब्रियो कॉलरे
  • संसर्ग – दूषित अन्न आणि पाणी
  • अवयव – मोठे आतडे
  • लक्षणे – उलट्या होणे, गंभीर अतिसार, निर्जलीकरण, कोरडी त्वचा, पायात पेटके, पोटदुखी, डोळे खोल होणे.
  • उपाय – औषध – ओआरएस,  लस- हाफिकाइन्सची लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_15.1
Cholera

डिप्थेरिया (Diphtheria)

  • जीवाणू- हिमोफिलस पेर्ट्युसिस
  • संसर्ग – हवेद्वारे
  • अवयव -श्वसन प्रणाली
  • लक्षणे – श्वास घेण्यात अडचण/ घसा लाल होणे
  • उपाय – औषध – पेनिसिलिन ,  लस- डीपीटी लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_16.1
Diphtheria

डांग्या खोकला (Pertussis)

  • जीवाणू- कॉर्नीबॅक्टीरियम डिप्थेरिका
  • संसर्ग – हवेद्वारे, थेंबांच्या स्वरूपात
  • अवयव -श्वसन प्रणाली
  • लक्षणे – गंभीर खोकला, छातीत दुखणे
  • उपाय – लस – डीपीटी लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_17.1
Pertussis

धनुर्वात (Tetanus)

  • जीवाणू- क्लोस्ट्रीडियम टेटॅनी
  • संसर्ग – ताज्या, ओल्या जखमेद्वारे.
  • अवयव -मध्यवर्ती मज्जासंस्था
  • लक्षणे – गंभीर खोकला, छातीत दुखणे
  • उपाय – लस – डीपीटी लस
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_18.1
Tetanus

न्यूमोनिया (Pneumonia)

  • जीवाणू- डिप्लोकोकस न्यूमोने
  • संसर्ग – हवेद्वारे
  • अवयव -फुफ्फुस
  • लक्षणे – छातीत दुखणे, श्वसनामध्ये अडचण
  • उपाय – औषध – पेनिसिलिन
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_19.1
Pneumonia

कुष्ठरोग/हॅन्सनचा रोग (Leprosy)

  • जीवाणू- मायकोबॅक्टेरियम लेप्रे
  • संसर्ग – थेट संपर्क, रक्त, थेंब
  • अवयव -परिधीय मज्जासंस्था
  • लक्षणे – बोटे झडणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, फिकट पट्टी, कोरडी त्वचा
  • उपाय – लस उपलब्ध नाही. औषध- डॅप्सोन, क्विनोलोन्स, रिफाम्पिसिन.
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_20.1
Leprosy

3. काही बुरशीजन्य रोग | Some Fungal Diseases

अनु. क्र.

रोगाचे नाव कारक बुरशी
01 मायसेटोमा/मदुरा फूट (Mycetoma/Madura Foot)

अ‍ॅक्टिनोमायसेटोमा (Actinomycetoma)

02

स्पोरोट्रिकोसिस (Sporotrichosis) स्पोरोथिक्स शेंकी (Sporothix schenckii)
03 ऱ्हायनोस्पोरीडोसिस (Rhinosporidosis)

ऱ्हायनोस्पोरीडीअम (Rhinosporidium)

04

ब्लास्टोमायकोसिस (Blastomycosis) ब्लास्टोमायसिस (Blastomyces)
05 एस्परगिलोसिस (अस्थमा / दमा )  (Aspergilosis)

एस्परजिलीअस फुमिंगीटस (Aspargillus Fumigatus)

06

कॅन्डिडिओसिस (Candidiosis) कॅन्डिडा अल्बीकन्स (Candida Albicans)
07 अ‍ॅथलेटीक्स फूट (खरुज) (Athlete’s foot)

टेनिया पेड्स (Tenia Pedes)

08

स्कॅबीज (scabies) अ‍ॅकॅरस स्कॅबीज (Acarus scabies)
09 टक्कल पडणे (Baldness)

टॅनिया कॅपिटस (Taenia capitis)

10

दाद / डाग (Ringworm)

ट्रायकोफायटन ल्युरेकॉसम (Trycophyton Lerucosum)

4. आदिजीवांमुळे होणारे रोग | Diseases Caused by Protozoa

हिवताप (Malaria)

  • आदिजीव – प्लास्मोडियम वायवॅक्स
  • संसर्ग – एनोफिलीज डासाच्या मादीद्वारे
  • अवयव -यकृत (हेपेटोमेगाली) आणि प्लीहा (स्प्लेनोमेगाली) , लाल पेशींवर हल्ला
  • लक्षणे – ताप, खोकला आणि थंडी भरून येणे
  • उपाय – लस उपलब्ध नाही. औषध- क्लोरोक्वीन, क्विनिन
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_21.1
Malaria

स्लीपिंग सिकनेस (Sleeping Sickness)

  • आदिजीव – ट्रायपॅनोसोमा
  • संसर्ग – त्से त्से नावाची माशी
  • आफ्रिकेत जास्त प्रमाणात
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_22.1
Sleeping Sickness

काला आजार (Kala Azar)

  • आदिजीव – लेश्मीनिया डोनोवानी
  • संसर्ग – सँड फ्लाय
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_23.1
Kala Azar

अमीबियासिस / डिसेंट्री (Amoebiasis)

  • आदिजीव – अमिबा
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_24.1
Amoebiasis

5. कृमीमुळे होणारे रोग | Diseases Caused by Worms

अ‍ॅस्केरियासिस / पोटातील जंत (Ascariasis)

  • कृमी – अ‍ॅस्केरिस लुम्ब्रीकॉईडस
  • संसर्ग- दूषित अन्न आणि पाणी
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_25.1
Ascariasis

फीलॅरेसिस (हत्तीपाय रोग) (Filariasis)

  • कृमी – वुचेरिया बॅनक्रॉफी
  • संसर्ग- क्युलेक्स डासाची मादी द्वारे
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_26.1
Filariasis

आनुवंशिक विकृती | Genetic Disorders

1. गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग | Diseases Due to Genetic Changes

डाउस सिंडोम किंवा मंगोलिकता (Down’s Syndrome) 

  • गुणसूत्ररचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे
  • ट्रायसोनी 21 एकाधिक दिवगुणितता असे म्हणतात
  • 21 गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते
  • अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_27.1
Down’s Syndrome

टर्नर सिंड्रोम / संलक्षण (Turner’s Syndrome) 

  • याला 44+ X असेही म्हणतात
  • यात एका X गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित एक भाग निकामी झालेला असतो
  • महिलांमध्ये प्रजनेन्द्रीयाची वाढ पूर्ण होत नाही
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_28.1
Turner’s Syndrome

क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम / संलक्षण (Klinefelter’s syndrome) 

  • पुरुषांमधील लिंग गुणसूत्रामध्ये अपसामान्यता
  • 44 + XY ऐवजी 44+ XXY अशी गुणसूत्रे तयार होतात
  • पुरुष अल्पविकसित असतात व प्रजननक्षम नसतात
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_29.1
Klinefelter’s syndrome

जनुकीय उत्परीवर्तानामुळे होणारे रोग | Diseases due to Genetic Mutations

वर्णकहीनता (Albinism)

  • शरीर मेलॅनिन हे वर्णक (रंगद्रव्य) तयार करू शकत नाही
  • त्वचा निस्तेज आणि केस पांढरे असतात
  • डोळे सामान्यपणे गुलाबी असतात कारण परितारिका आणि दृष्टिपटल यांमध्ये वर्णक नसते.
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_30.1
Albinism

दात्रपेशी पांडूरोग (Sickle Cell Anemia)

  • हिमोग्लोबीन रेणूच्या रचनेतील सहावे अमिनो आम्लो म्हणजे ग्लूटामिक आम्लाच्या जागी वॅलीन आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबीनच्या रेणूंची रचना / आकार बदलतो.
  • त्यामुळे लोहित रक्तकणिकांचा विकृती असलेला सामान्य आकार विळ्याच्या आकाराचा बनतो
  • बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबीनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते
  • गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
  • आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_31.1
Sickle Cell Anemia

रंगांधळेपणा (Color Blindness)

  • लाल आणि हिरव्या रंगात फरक करता येत नाही
  • सेक्स क्रोमोझोम वरील गुणसूत्राच्या उत्परीवर्तानामुळे हा रोग होतो
मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_32.1
Color Blindness

 

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण मानवी रोग या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

तुम्ही खालील ब्लॉग्स चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Classification of Diseases and Causes of Diseases_34.1