Marathi govt jobs   »   IBPS RRB अधिसूचना 2023   »   IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023
Top Performing

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023, पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 16 ऑगस्ट 2023 रोजी पूर्व परीक्षेसाठी IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 जाहीर केल. उमेदवार 16 ऑगस्ट 2023 ते 2 सप्टेंबर 2023 पर्यंत IBPS लिपिक कॉल लेटर डाउनलोड करू शकतात. IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा 2023, 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन 

16 ऑगस्ट 2023 रोजी IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन 
श्रेणी प्रवेशपत्र
संस्थेचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)
पोस्टचे नाव क्लार्क
रिक्त पदांची संख्या 4545
सहभागी बँका 11
लेखाचे नाव IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 16 ऑगस्ट 2023
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा 2023 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023
भरती प्रक्रिया प्रिलिम्स + मुख्य परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in

IBPS क्लार्क प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाले असून IBPS क्लार्क 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

IBPS क्लार्क प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
IBPS क्लार्क अधिसूचना 2023 शॉर्ट नोटीस 27 जून 2023
IBPS क्लार्क अधिसूचना 2023 PDF 01 जुलै 2023
IBPS क्लार्क ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख 01 जुलै 2023
IBPS क्लार्क ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (प्रिलिम्स) 16 ऑगस्ट 2023
ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेचे आयोजन 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल 2023 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रिलिम्स स्कोअरकार्ड सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (मेन्स) सप्टेंबर 2023
ऑनलाइन मुख्य परीक्षेचे आयोजन 07 ऑक्टोबर 2023

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

IBPS ने 16 ऑगस्ट 2023 रोजी IBPS क्लार्क प्रिलिम्स प्रवेशपत्र कार्ड 2023 डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक सक्रिय केली आहे. ज्या उमेदवारांनी IBPS क्लार्क 2023 परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करून प्रिलिम्स परीक्षेसाठी त्यांचे IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (लिंक सक्रीय)

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात.

  1. IBPS च्या अधिकृत वेबसाइट @ibps.in ला भेट द्या
  2. वेबसाईटच्या= डाव्या बाजूला दिसणारे CRP क्लार्क वर क्लिक करा.
  3. “Common Recruitment Process for Clerical Cadre XIII यावर क्लिक करा.
  4. नवीन पृष्ठ उघडल्यावर, तुम्हाला तुमचा “Registration ID” आणि “Date of Birth/Password” प्रविष्ट करावा लागेल.
  5. कॅप्चा प्रविष्ट करा
  6. लॉगिन बटणावर क्लिक करा
  7. आता आपले IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

IBPS क्लार्क परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना

  • IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करताना उमेदवाराला त्याच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने परीक्षा हॉलमध्ये न चुकता त्याचे/तिचे IBPS लिपिक प्रिलिम्स प्रवेशपत्र आणि फोटो आयडी पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे.
  • तुमचे IBPS लिपिक 2023 प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, परीक्षेचा दिवस त्रासमुक्त करण्यासाठी तुमच्या परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्राची नोंद ठेवा.
  • iBPS ने स्पष्टपणे नमूद केले आहे की प्रवेशपत्राची हार्ड कॉपी उमेदवारांना पोस्टाद्वारे पाठवली जाणार नाही. उमेदवाराला त्याचे IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करणे आवश्यक आहे.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 वर नमून असलेला तपशील

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 मध्ये उमेदवारांशी संबंधित काही तपशील असतील. या तपशिलांमध्ये परीक्षा आणि तिच्या वेळेबद्दलची प्रमुख माहिती असते. सर्व उमेदवारांनी त्यांच्या हॉल तिकिटात नमूद केलेले खालील तपशील तपासावे.

  • Applicant’s Name
  • Gender (Male/ Female)
  • Applicant Roll Number
  • Applicant Photograph
  • Exam Date and Time
  • Candidate Date of Birth
  • Father’s/ Mother’s Name
  • Category (ST/ SC/ BC & Other)
  • Name of Exam Centre
  • Test Centre Address
  • Post Name
  • Examination Name
  • Time Duration of the Exam
  • Exam Centre Code
  • Essential instructions for the examination
  • Empty Box for Signature of Candidate
  • Empty Box for Signature of Invigilator

IBPS क्लार्क प्रीलिम्स परीक्षेचे स्वरूप 2023

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2023 मध्ये इंग्रजी भाषा (English Language), संख्यात्मक क्षमता (Numerical Ability) आणि तर्क क्षमता (Reasoning Ability) हे 03 विभाग आहेत. विभागानुसार प्रश्नांची संख्या, गुण व कालावधी खाली देण्यात आला आहे.

विभाग

प्रश्नांची संख्या एकूण गुण कालावधी
इंग्रजी भाषा (English Language) 30 30  20 मिनिटे

संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)

35 35 20 मिनिटे
तर्क क्षमता (Reasoning Ability) 35 35

20 मिनिटे

एकूण

100 100

60 मिनिटे/ 1 तास

IBPS क्लर्क प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

IBPS क्लार्क 2023 शी संबधी इतर लेख
IBPS क्लार्क 2023 अधिसूचना जाहीर
IBPS क्लार्क रिक्त जागा 2023, महाराष्ट्र राज्यात एकूण 527 रिक्त जागा
IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न
IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम
IBPS क्लार्क मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरासहित PDF मिळवा
IBPS क्लार्क कट ऑफ 2023, मागील वर्षाचे राज्यनिहाय गुणांची सीमारेषा तपासा
IBPS क्लार्क वेतन 2023, नोकरी प्रोफाइल आणि पदोन्नती
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

IBPS Clerk Test Series 2023
IBPS Clerk Test Series 2023

Sharing is caring!

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 जाहीर, पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा_5.1

FAQs

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे का?

होय, IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाले.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 मी कोठून डाउनलोड करू शकतो?

या लेखात दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे आपण IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकता.