Marathi govt jobs   »   IBPS क्लार्क 2023 अधिसूचना   »   IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023
Top Performing

IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न

IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023

IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, उमेदवारांना आगामी IBPS क्लार्क परीक्षेसाठी चांगली तयारी करण्यास मदत करणार आहे. IBPS क्लार्क परीक्षा, दरवर्षी क्लार्क (लिपिक) पदासाठी पात्र उमेदवार निवडण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनद्वारे आयोजित केले जाते. IBPS क्लार्क 2023 या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी, अद्ययावत IBPS क्लार्क (लिपिक) परीक्षेचे स्वरूप ज्ञात असणे आवश्यक आहे. तर चला या लेखात आपण पाहुयात IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023. या लेखात आम्ही IBPS क्लार्क प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न दिला आहे.

IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023

IBPS क्लार्क प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचे स्वरूप 

IBPS त्याच्या अधिकृत अधिसूचनेसह IBPS लिपिक अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न जारी करते. तुम्ही खालील पोस्टमध्ये अद्ययावत IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023 तपासू शकता. IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023 इतर कोणत्याही बँक परीक्षेप्रमाणेच आहे.

IBPS क्लार्क 2023 ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. ज्या खाली दिल्या प्रमाणे आहेत

  • Online Prelims Exam (प्राथमिक परीक्षा),
  • Online Mains Exam (मुख्य परीक्षा).

गुणवत्तेच्या यादीत आपले नाव मिळविण्यासाठी उमेदवाराने Prelims Exam आणि Mains Exam या दोन्हींसाठी पात्र असणे आवश्यक आहे. Mains Exam नंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाते.

IBPS क्लार्क 2022 परीक्षेचे स्वरूप: महत्त्वाचे मुद्दे

IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023 इतर कोणत्याही बँक परीक्षेप्रमाणेच आहे. IBPS क्लार्क प्रीलिम्स (प्राथमिक) परीक्षेत तीन विभाग असतात ते म्हणजे,

  • तर्क क्षमता (Reasoning Ability)
  • संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)
  • इंग्रजी भाषा (English Language)

IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षेत 4 विभाग असतात ज्यांचा खाली उल्लेख केला आहे:

  • तर्क क्षमता आणि संगणक अभियोग्यता (Reasoning Ability & Computer Aptitude)
  • संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
  • इंग्रजी भाषा (English Language)
  • सामान्य/आर्थिक जागरूकता (General/ Financial Awareness)

IBPS क्लार्क 2023 ऑनलाईन अर्ज

IBPS क्लार्क प्रीलिम्स परीक्षेचे स्वरूप

हे लक्षात घ्या की, IBPS क्लार्क प्रीलिम्स (प्राथमिक) परीक्षेच्या तीन विभागांपैकी प्रत्येक विभागात उमेदवारांना IBPS ने वैयक्तिकरित्या निश्चित केलेले किमान कट-ऑफ गुण मिळवून पात्र व्हावे लागेल. आवश्यकतेनुसार IBPS ने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील पुरेशा संख्येने उमेदवारांची ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाईल. टॅब्युलर स्वरूपात IBPS क्लार्क प्रीलिम्स (प्राथमिक) परीक्षेचे स्वरूप खाली दिन्यात आले आहे:

विभाग

प्रश्नांची संख्या एकूण गुण

कालावधी

इंग्रजी भाषा (English Language)

30 30  20 मिनिटे

संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)

35 35 20 मिनिटे
तर्क क्षमता (Reasoning Ability) 35 35

20 मिनिटे

एकूण/Total

100 100

60 मिनिटे/ 1 तास

IBPS क्लार्क मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका PDFs सोल्यूशनसह

IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षेचे स्वरूप

विभागीय, तसेच एकूण कट ऑफ क्लिअर करून IBPS क्लार्क प्रीलिम्स (प्राथमिक) मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षेसाठी बोलावले जाते, ही पात्रता तसेच IBPS क्लार्क भरतीची स्कोअरिंग परीक्षा दोन्ही आहे. उमेदवार खालील तक्त्यामध्ये IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षेचे स्वरूप तपासू शकतात:

विभाग

प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त गुण

विभागीय कालावधी

सामान्य/आर्थिक जागरूकता (General/ Financial Awareness)

50 50 35 मिनिटे
सामान्य इंग्रजी (General English)

40

40

35 मिनिटे

तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता (Reasoning Ability and Computer Aptitude)

50 60 45 मिनिटे
क्वांटिटेटिव्ह अँप्टिट्यूड (Quantitative Aptitude) 50 50

45 मिनिटे

एकूण/Total
190 200 160 मिनिटे

टीप – चुकीच्या उत्तरांसाठी नेगेटिव्ह मार्किंग (प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षा या दोन्हींसाठी लागू). प्रत्येक चुकीच्या उत्तराला त्या प्रश्नाला असलेल्या गुणांचे एक चतुर्थांश किंवा 0.25 गुण वजा केले जातील. एखादा प्रश्न कोरा राहिला, म्हणजेच उमेदवाराने कोणतेही उत्तर चिन्हांकित केले नाही, तर त्या प्रश्नाचे कोणतेही गुण कमी केले जाणार नाही.

IBPS क्लार्क 2023 अभ्यासक्रम: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम

IBPS क्लार्क अंतिम निवड

IBPS क्लार्क च्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना IBPS क्लार्क च्या दोन्ही स्तरांना म्हणजेच Prelims आणि Mains साठी पात्र ठरणे आवश्यक आहे. तथापि, Prelims Exam केवळ पात्रता स्वरूपाची आहे, म्हणजे उमेदवारांच्या अंतिम गुणवत्तेमध्ये प्रीलिम्स गुणांचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांची अंतिम निवड मुख्य परीक्षेतील उमेदवाराच्या गुणांवर अवलंबून असते. अंतिम यादीत उमेदवारांना 100 पैकी गुण काढले जाते आणि त्यांची अंतिम निवड केली जाते.

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न_4.1

FAQs

IBPS क्लार्क परीक्षा 2023 किती टप्प्यात घेतली जाईल?

IBPS क्लार्क परीक्षा 2023 2 टप्प्यांत घेतली जाईल म्हणजे प्रिलिम्स आणि मुख्य

IBPS क्लार्क 2023 परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक मार्किंगचे 0.25 गुण असतील

IBPS क्लार्क 2023 परीक्षेत किती प्रश्न विचारले जातात?

IBPS क्लार्क 2023 मधील प्रिलिम्स परीक्षेत 100 प्रश्न आणि मुख्य परीक्षेत 190 प्रश्न असतात