Marathi govt jobs   »   Job Notification   »   IDBI भरती 2023
Top Performing

IDBI भरती 2023 जाहीर, विविध संवर्गातील 2100 पदांसाठी अर्ज करा

IDBI भरती 2023 जाहीर

IDBI भरती 2023: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड ‘O’ आणि
कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO) संवर्गातील 2100 रिक्त जागांसाठी IDBI भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. IDBI भरती 2023 अधिसूचना PDF, पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील खालील लेखात सामायिक केले आहेत.

IDBI भरती 2023: विहंगावलोकन

IDBI भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 22 नोव्हेंबर 2023 पासून 2100 पदांसाठी सुरू होतील. उमेदवार खालील तक्त्यामध्ये IDBI भरती 2023 अधिसूचनेचे तपशील तपासू शकतात.

IDBI भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी बँकेची नोकरी
कार्यालय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
भरतीचे नाव IDBI भरती 2023
पदाचे नाव
  • कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड ‘O’
  • कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO) (कंत्राटी तत्वावर)
एकूण रिक्त पदे 2100
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://www.idbibank.in/

IDBI भरती 2023 अधिसुचना 

IDBI भरती 2023 भरतीसाठी अधिकृत अधिसूचना PDF अधिकृत वेबसाइट @idbibank.in वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन  तपशीलवार IDBI भरती 2023 अधिसूचना डाउनलोड करू शकतात. IDBI भरती 2023 अधिसूचनेत भरतीचे तपशील जसे पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न आणि इतर महत्त्वाचे तपशील असतात. IDBI भरती 2023 अधिसूचना PDF येथे डाउनलोड करा.

IDBI भरती 2023 अधिसूचना PDF डाउनलोड करा

IDBI भरती 2023: महत्वाच्या तारखा

IDBI भरती 2023: महत्वाच्या तारखा: IDBI भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमदेवार IDBI भरती 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

IDBI भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
IDBI भरती 2023 अधिसुचना 22 नोव्हेंबर 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023
कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO) (कंत्राटी तत्वावर) साठी परीक्षेची तारीख (तात्पुरती) 30 डिसेंबर 2023
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड ‘O’ साठी परीक्षेची तारीख (तात्पुरती) 31 डिसेंबर 2023

IDBI भरती 2023 रिक्त जागांचा तपशील

IDBI भरती 2023 रिक्त जागांचा तपशील: उमदेवारI IDBI भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

IDBI भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  एकूण जागा 
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड ‘O’ 800
कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO) (कंत्राटी तत्वावर) 1300
एकूण 2100

IDBI भरती 2023 पात्रता निकष

IDBI भरती 2023 साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी काही निकष पूर्ण केले पाहिजेत. ते खालील तक्त्यात दिले आहेत.

IDBI भरती 2023 पात्रता निकष
पदाचे नाव पात्रता निकष
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड ‘O’

शैक्षणिक अर्हता 

  • सरकार/शासनाद्वारे मान्यताप्राप्त/मान्यता मिळालेल्या संस्था उदा., AICTE, UGC, इ. विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान 60% सह बॅचलर पदवी (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 55%).
  • केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.

वयोमर्यादा 

  • किमान: 20 वर्षे
  • कमाल: 25 वर्षे
  • उमेदवाराचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 नोव्हेंबर 2003 नंतर झालेला नसावा
    (दोन्ही तारखांसह)
कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO) (कंत्राटी तत्वावर) शैक्षणिक अर्हता 

  • सरकार/सरकारी संस्था उदा., AICTE, UGC, इत्यादींद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.

वयोमर्यादा 

  • किमान: 20 वर्षे
  • कमाल: 25 वर्षे
  • उमेदवाराचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 नोव्हेंबर 2003 नंतर झालेला नसावा
    (दोन्ही तारखांसह)

IDBI भरती 2023 निवड प्रक्रिया

कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड ‘O’ पदासाठी निवड प्रक्रिया :

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (OT), कागदपत्र पडताळणी (DV), वैयक्तिक मुलाखत (PI) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT) यांचा समावेश असेल.

कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO) (कंत्राटी तत्वावर) पदासाठी निवड प्रक्रिया :

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (OT), कागदपत्र पडताळणी (DV) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT) यांचा समावेश असेल.

IDBI भरती 2023 परीक्षेचे स्वरूप 

IDBI भरती 2023 परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

IDBI भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 
अ.क्र. विषय/उपविषय  प्रश्न  गुण  कालावधी 
1. तार्किक तर्क, डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे 60 60 120 मिनिटे
2. इंग्रजी भाषा 40 40
3. संख्यात्मक अभियोग्यता 40 40
4. सामान्य/अर्थव्यवस्था/बँकिंग जागरूकता/संगणक/आयटी 60 60
एकूण  200 200
टीप: इंग्रजी भाषेच्या चाचण्या वगळता वरील चाचण्या द्विभाषिक, म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असतील.

IDBI भरती 2023 परीक्षा शुल्क 

IDBI भरती 2023 साठी परीक्षा शुल्क खालील तक्त्यात दिलेले आहे.

IDBI भरती 2023:परीक्षा शुल्क
प्रवर्ग  शुल्क  
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी (केवळ माहिती शुल्क) रु. 200/-
इतर सर्व उमेदवारांसाठी (अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क) रु.1000/-

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

IDBI भरती 2023 जाहीर, विविध संवर्गातील 2100 पदांसाठी अर्ज करा_4.1

FAQs

IDBI भरती 2023 कधी जाहीर झाली?

IDBI भरती 2023 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

IDBI भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती जाहीर झाली आहे?

IDBI भरती 2023 अंतर्गत एकूण 2541 पदांची भरती जाहीर झाली आहे.

IDBI भरती 2023 बद्दल अपडेट मला कोठे मिळू शकेल?

IDBI भरती 2023 बद्दल वेळोवेळी अपडेट आपण या लेखात तपासू शकता.