Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे
Top Performing

Important Newspapers in Maharashtra|महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे :आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे : वृत्तपत्रांनी (Newspapers) महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या जडणघडणीत आणि राष्ट्रीय चळवळीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रात वृत्तपत्रांची (Newspapers in Maharashtra) सुरुवात 1780 च्या दशकात झाली आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारानंतर मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रे (Newspapers) निघू लागली. वृत्तपत्रांच्या (Newspapers) विकासामुळे खालील फायदे महाराष्ट्राला झाले.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
साठी उपयुक्त आदिवासी विकास विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा
विषय महाराष्ट्राचा इतिहास
लेखाचे नाव महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे

List of Important Newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे

वृत्तपत्रांनी (Newspapers) महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या जडणघडणीत आणि राष्ट्रीय चळवळीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रात वृत्तपत्रांची (Newspapers in Maharashtra) सुरुवात 1780 च्या दशकात झाली आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारानंतर मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रे (Newspapers) निघू लागली. वृत्तपत्रांच्या (Newspapers) विकासामुळे खालील फायदे महाराष्ट्राला झाले.

  1. आधुनिक शिक्षण, आधुनिक विचार, आधुनिक चालीरीती यांची ओळख सामान्य लोकांना झाली.
  2. वृत्तपत्रांतील (Newspapers) टीकेमुळे सामान्य लोकांना इंग्रजी राजवटीचे खरे रूप लक्षात आले.
  3. ब्रिटीशांकडे भारतीयांच्या मागण्या मांडण्यासाठी वृत्तपत्रे हक्काचे व्यासपीठ होते.
  4. समाज प्रबोधनाचे आणि सुधारणेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून वृत्तपत्रे महत्त्वाची ठरतात.
  5. राष्ट्रभावना आणि देशप्रेम वाढविण्यास वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका निभाविली.

Most Important Newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे (संक्षिप्त रुपात)

Most Important Newspapers in Maharashtra: महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे (Newspapers), त्यांचे स्थापना वर्ष (Establish Year), स्थळ (Place) आणि संस्थापक (Founder) खालील दिलेल्या तक्त्यात तुम्ही पाही शकता.

अनु.क्र.

वृत्तपत्राचे नाव (Newspaper) स्थापना वर्ष (Establish Year) स्थळ (Place) संस्थापक (Founder)
01 बॉम्बे हेराल्ड 1789 मुंबई

मॅक्लीन

02

बॉम्बे गॅझेट 1790 मॅक्लीन
03 बॉम्बे समाचार 1822 मुंबई

फर्दून मर्जबान

04

दर्पण 1832 मुंबई बाळशास्त्री जांभेकर
05 ज्ञानसिंधु 1842 मुंबई

वीरेश्वर छत्रे

06

ज्ञानोदय 1842 अहमदनगर हेन्री बॅलेन्टाईन

7

प्रभाकर 1841 गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन (कुंटे)
8 मित्रोदय 1844 पुणे

वीरेश्वर आणि तात्या छत्रे

9

ज्ञानप्रकाश 1849 पुणे कृष्णाजी रानडे
10 रास्त गोफ्तर 1851 मुंबई

दादाभाई नौरोजी

11

शुभसूचक 1859 सातारा रामचंद्र अप्पाजी
12 अरुणोदय 1862 ठाणे

काशिनाथ फडके

13

खानदेश वैभव 1867 धुळे बळवंत करंदीकर
14 दीनबंधू 1877 पुणे

कृष्णराव भालेकर

15

केसरी 1881 पुणे गोपाळ आगरकर
16 मराठा 1881 पुणे

लोकमान्य टिळक

17 सत्सार 1885 पुणे

महात्मा ज्योतिबा फुले

18

दीनमित्र 1888 पुणे मुकुंदराव पाटील
19 काळ 1806

शिवराम परांजपे

20

सत्योदय 1915 विदर्भ कृष्णाजी चौधरी

21

जागरूक 1917 पुणे वालचंद कोठारी

22

डेक्कन रयत 1918 पुणे अण्णासाहेब लठ्ठे व वालचंद कोठारी
23 मूकनायक 1920 मुंबई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

24

ब्राह्मणेतर 1926 वर्धा व्यंकटराव गोडे
25 सत्यवादी 1926 सातारा

बाळासाहेब पाटील

26

लोकहितवादी 1927 पुणे केशव ठाकरे
27 क्रांती 1927 मुंबई

जोगळेकर, मिरजकर

28 कैवारी 1928

दिनकरराव जवळकर

29

सकाळ 1932 पुणे नानासाहेब परुळेकर
30 दैनिक लोकशक्ती 1935 पुणे

जावडेकर

Additional information about Important Newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांविषयी अतिरिक्त माहिती

Additional information about important newspapers in Maharashtra: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांविषयी (newspapers) अतिरिक्त माहिती खाली दिली आहे.

1) मुंबई समाचार

स्थापना – 1822 (मुंबई)

  • समाचार प्रेस चे मालक फर्दुनजी मर्झबान यांनी सुरु केले.
  • गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र
  • मुंबई प्रांतातील भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र
  • 1855 ला दैनिक झाले आधी साप्ताहिक होते.

2) दर्पण

स्थापना – 6 जानेवारी 1832 (मुंबई)

  • संस्थापक – बाळशास्त्री जांभेकर
  • मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र
  • साप्ताहिक होते (दर शुक्रवारी)
  • मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये निघत असत
  • 6 जानेवारी – बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन – पत्रकार दिन म्हणून पाळला जातो.

3) प्रभाकर

स्थापना – 1841

  • संस्थापक – गोविंद कुंटे / भाऊ महाजन
  • गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात सुरुवात
  • लोकहितवादी यांनी शतपत्रे या वृत्तपत्रात लिहिली
  • प्रथमतः इंग्रजी राज्यपद्धतीवर टीका केली
  • इतर वृत्तपत्रातील मजकूर भाषांतरित करून छापला जाई.

4) ज्ञानोदय

स्थापना – 1842 (अहमदनगर)

  • संस्थापक – अमेरिकन मिशनरी (हेन्री बॅलेन्टाईन)
  • मराठी वर्तमान पत्रात पहिल्यांदा चित्रे काढली
  • आशियाचा व युरोपचा नकाशा दिला
  • रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा ‘चाक्या म्हसोबा’ या नावाचा लेख लिहिला

5) नेटिव्ह ओपिनियन

स्थापना – 1854

  • संस्थापक – विश्वनाथ मंडलिक
  • सुरुवातीला फक्त इंग्रजीत होते आणि नंतर मराठीत सुरु झाले
  • नारायण महादेव हे देखील महत्त्वाचे व्यक्ती होते
  • हायकोर्टाचे निकाल देण्याची पद्धत सुरु केली

6) इंदुप्रकाश

स्थापना – 1862 (मुंबई)

  • संस्थापक – विष्णू पंडित
  • इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांत
  • प्रामुख्याने विधवा विवाह पुरस्काराचे लेखन व स्त्रियांच्या प्रश्नांवर लेखन
  • नारायण चंदावरकर यात पॉलिटिकल ऋषि या नावाने लेखन करीत
  • या वृत्तपत्रात अरविंद घोष यांची न्यू लॅम्प फॉर ओल्ड ही लेखमाला प्रकाशित झाली

7) अरुणोदय

स्थापना – 1866 (ठाणे)

  • संस्थापक – काशिनाथ फडके
  • परकीय सत्तेच्या उच्चाटनासाठी मार्गदर्शन
  • बातमीदार नेमण्याची प्रथा सुरु केली

8) केसरी व मराठा 

स्थापना – 1881 (पुणे)

  • संस्थापक–  टिळक व आगरकर
  • या दोन्ही वृत्तपत्रात टिळक व आगरकर यांचा मोठा सहभाग होता.
  • मराठा हे दैनिक 2 जानेवारी 1881 मधे सुरू झाले.
  • केसरी काही काळ साप्ताहिक स्वरूपाचे होते.
  • टिळकांच्या निधनानंतर केसरी व मराठा ची जबाबदारी न. चि. केळकर यांच्याकडे आली.

9) मराठा दीनबंधू

स्थापना – 1900 (पुणे)

  • संस्थापक – भास्करराव जाधव
  • पहिल्या पानावर – विद्येत मागासलेल्या सर्व लोकांसाठी’ असे लिहिले जाई
  • शिवराम जनाबा कांबळे यात लेखन करी.

10)  बॉम्बे क्रोनिकल

स्थापना – 1910 (मुंबई)

  • संस्थापक- फिरोजशाह मेहता
  • यावेळी त्यांना जे. बी. पेटीट यांची मदत झाली. 1913 ते 1919 पर्यंत बी. जी हर्निमन हे बॉम्बे क्रोनिकल चे संपादक होते.
  • या हर्निमान यांनी रोलेट ॲक्ट चे नामकरण ब्लॅक बिल असे केले होते. या वृत्तपत्रात सय्यद अब्दुल्हा बरेलवी यांनी देखील लिखाण केले होते. 1924 ते 1948 या काळात ते संपादक होते.

11)  विजयी मराठा

स्थापना – डिसेंबर, 1919 (पुणे)

  • संस्थापक- श्रीपतराव शिंदे
  • मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक व शिक्षणादी विषयांवर लेख त्यात प्रसिद्ध होत.
  • शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे विजयी मराठाचे ब्रीद होते. विजयी मराठा हे ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र मानले जात असे. तसेच बहुजन समाजाचा केसरी म्हणून देखील तो ओळखला जात असे.
  • यात दिनकरराव जवळकर भवानी तलवार’ या टोपण नावाने ‘तलवारीचे वार’ हे सदर लिहीत.

12)  तरुण मराठा

स्थापना – 1920 (कोल्हापूर)

  • संस्थापक- सखाराम पांडुरंग सावंत
  • सखाराम पांडुरंग सावंत यांनी शाहू महाराजांच्या प्रेरणेने हे नियतकालिक कोल्हापूरवरून सुरू केले. नंतर शाहू महाराजांनी दिनकरराव जवळकर यांना कोल्हापूरला बोलावून त्यांच्या स्वाधीन केले

13) राष्ट्रवीर

स्थापना – 1921 (बेळगाव) – 2021 ला 100 वर्ष पूर्ण

  • संस्थापक – भुजंगराव दळवी, भोसले इत्यादी
  • शिवाजी प्रिंटींग प्रेस च्या सहाय्याने
  • शाहू महाराजांची प्रेरणा होती
  • सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी उपयोग

14) हंटर

स्थापना – मे 1925 (कोल्हापूर)

  • संस्थापक– हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण
  • सुरुवातीच्या 13 अंकांनंतर दत्तात्रय सखाराम जाधव व खांडेराव गोपाळराव बागल यांनी संपादनाची जबाबदारी सांभाळली.
  • हंटरच्या मुखपृष्ठावर ‘फणसा अंगी काटे । आत अमृताचे साठे । नारळ वरुता कठीण । परी अंतरी जीवन ।’ हा शेख महमदाचा प्रसिद्ध अभंग छापला जात असे.

15) ब्राह्मणेतर

स्थापना – 1926 (वर्धा)

  • संस्थापक – व्यंकटराव गोडे
  • मज म्हणती ब्राह्मणेतर | ध्येय माझे देशोद्धार | घेई दीनांचा कैवार | हेच ठरले ब्रीद सार – या ओळी पहिल्या पानावर होत्या
  • ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र होते.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप 

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

Important Newspapers in Maharashtra|महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे :आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

'मराठा दीनबंधू' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?

भास्करराव जाधव हे मराठा दीनबंधूचे संस्थापक आहेत.

मला इतिहासाशी संबंधित विषयांची माहिती कोठे मिळेल?

इतिहास विषयावरील माहिती Adda247 मराठीच्या ॲप आणि वेबसाइटवर मिळू शकते

काळ वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?

काळ वृत्तपत्राचे संस्थापक शिवराम परांजपे आहेत.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांची माहिती कुठे मिळेल?

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांची माहिती Adda247 मराठीच्या ॲप आणि वेबसाइटवर मिळू शकते.