Marathi govt jobs   »   Study Materials   »   Important Passes in Maharashtra

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते: घाटाचे नाव व जोडली जाणारी ठिकाणे | Important Passes in Maharashtra | Revision Material for MPSC Group B

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते | Revision Material for MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र 

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते (MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचे)

MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे; Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Important Passes in Maharashtra | घाटाचे नाव जोडली जाणारी शहरे

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याला घाट रस्त्याचे वरदान लाभले आहे. महाराष्ट्रातील हे घाट-रस्ते वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहेत त्यामुळे व्यापार, दळणवळण आणि पर्यटन या सारख्या आर्थिक क्रियांना हातभार लावला जातो. नाणे घाट सारखा घाट रस्ता अगदी सातवाहन काळापासून वापरात आहे तर माळशेज घाट हा कायमच पर्यटकांचे आवडीचे ठिकाण राहिलेला आहे. आयोगाने सुद्धा घाट रस्त्यांवर अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत. प्रश्नांचे स्वरूप मुख्यत: घाटाचे नाव आणि जोडली जाणारी शहरे आणि सह्याद्रीतील घाटांचा उत्तर-दक्षिण / दक्षिणोत्तर क्रम असेच राहिले आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट रस्ते बघणार आहोत. जेणेकरून परीक्षेच्या उजळणीसाठी तुम्हाला मदत होईल.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे: स्थापना वर्ष, स्थळ आणि संस्थापक

Passes in Maharashtra (In Detail) | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट-रस्ते (संक्षिप्त रुपात)

Important Passes in Maharashtra: महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट-रस्ते, त्यांना जोडणारी शहरे आणि सह्याद्रीतील घाटांचा दक्षिणोत्तर क्रम पाहणार आहोत.

अनु.क्र.

घाटाचे नाव जोडली जाणारी ठिकाणे
01 शिरघाट किंवा शिरसाट घाट

नाशिक-जव्हार

02

माळशेज घाट मुंबई-नाशिक (ठाणे-नगर)
03 भीमाशंकर घाट

पनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे) / पुणे-महाड

04

बोर घाट मुंबई-पुणे
05 वरंधा घाट

पुणे-महाड

06

कशेडी घाट महाड-खेड-दापोली
07 कात्रज / खंबाटकी घाट

पुणे- सातारा

08

परसणी घाट पाचगणी(सातारा)-वाई
09 फोंडा घाट

सावंतवाडी-कोल्हापूर (कोल्हापूर -पणजी )

10

चंदनापुरी घाट पुणे-नाशिक
11 आंबोली घाट

सावंतवाडी – बेळगाव (कोल्हापूर-सावंतवाडी)

12

ताम्हणी घाट पुणे – माणगाव
13 पार घाट / रणतुंडी घाट

महाड- महाबळेश्वर (सातारा-रत्नागिरी)

14

थळ घाट /कसारा घाट मुंबई – नाशिक
15 नाणेघाट

अहमदनगर-मुंबई (कल्याण-जुन्नर)

16

लळिंग घाट नाशिक – धुळे

17

हनुमंते घाट कोल्हापूर – कुडाळ (कोल्हापूर – कणकवली)
18 करूळ घाट

कोल्हापूर – विजयदुर्ग (कोल्हापूर – राजापूर)

19

कुंभार्ली घाट सातारा – रत्नागिरी   (चिपळूण -कराड)
20 आंबा घाट

कोल्हापूर – रत्नागिरी

21

अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर
22 औट्रम / कन्नड घाट

धुळे – औरंगाबाद

23

दिवेघाट पुणे – बारामती
24 आंबनेळी घाट

महाबळेश्वर – पोलादपूर

25

रामघाट कोल्हापूर – सावंतवाडी
26 बावडा घाट

कोल्हापूर – खारेपाटण

27

उत्तर तिवरा घाट सातारा-रत्नागिरी
28 हातलाटे घाट

सातारा-रत्नागिरी

29

केळघर घाट सातारा-रत्नागिरी
30 फिट्स जीराल्डा घाट

महाबळेश्वर – अलिबाग

31

कुसूर घाट पुणे -पनवेल
32 रूपत्या घाट

पुणे -महाड

33

सारसा

सिरोंचा-चंद्रपूर

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

सह्याद्रीतील घाटांचा दक्षिणोत्तर क्रम खालीलप्रमाणे: 

आयोगाने अनेकदा हा क्रम दक्षिणोत्तर किंवा उत्तर-दक्षिण विचारला आहे. त्यामुळे नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अधिक फायदेशीर ठरेल.

सह्याद्रीतील घाट रस्ते
सह्याद्रीतील घाट रस्ते

उत्तरे कडून दक्षिणेकडे घाटांचा क्रम खालीलप्रमाणे: 

थळ→माळशेज→बोर→वरंधा→रणतुंडी→कुंभार्ली→आंबा→फोंडा→आंबोली  

तुम्ही खालील ब्लॉग चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते | Important Passes in Maharashtra_5.1