Marathi govt jobs   »   Study Materials   »   वित्तीय आणीबाणी

वित्तीय आणीबाणी (Financial Emergency), कलम 360, व्याख्या, घोषणेचे आधार, आणि परिणाम

वित्तीय आणीबाणी (Financial Emergency)

Financial Emergency- Article 360: भारतात, आर्थिक आणीबाणी ही भारतीय संविधानाच्या कलम 360 मध्ये नमूद केलेली तरतूद आहे जी भारताच्या राष्ट्रपतींना भारताची आर्थिक स्थिरता किंवा पत किंवा कोणत्याही भागाची आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आला असेल तर ते देशामध्ये आर्थिक आणीबाणीची स्थिती घोषित करण्यास परवानगी देते. ही तरतूद केंद्र सरकारला देशाच्या आर्थिक व्यवस्थेची स्थिरता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी राज्यांच्या आर्थिक आणि आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देते.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

Financial Emergency: Article 360 | वित्तीय आणीबाणी: कलम 360

Financial Emergency- Article 360: भारतीय संविधानातील 18 व्या भागात कलम 352 ते 360 या कलमान्वये आणीबाणीविषयक तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे कोणतीही अनियमित अथवा आणीबाणी सदृश्य परिस्थिती हाताळण्यास केंद्र सरकार सक्षम झाले आहे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षा तसेच लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था आणि राज्यघटनेचे संरक्षण करता यावे, या उद्देशाने आणीबाणीविषयक तरतुदी केलेल्या आहेत.

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार

Types of Emergency In India | भारतातील आणीबाणीचे प्रकार 

Financial Emergency- Article 360: आणीबाणी दरम्यान, केंद्र शासन पूर्ण शक्तीशाली बनते आणि घटकराज्ये केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. सामान्य काळातील संघराज्यीय राजकीय व्यवस्थेचे रूपांतर आणीबाणीदरम्यान एकात्मक व्यवस्थेत होणे, हे भारताच्या घटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे.

आणीबाणीचे प्रकार (Types of Emergency): घटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी व वित्तीय आणीबाणी.

  1. राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) – युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यांमुळे आणीबाणी (कलम 352): या आणीबाणीला ‘राष्ट्रीय आणीबाणी’ (National Emergency) म्हणून ओळखले जाते. मात्र, घटनेत या प्रकारच्या आणीबाणीला ‘आणीबाणीची उद्घोषणा’ असे संबोधले आहे.
  2. राज्य आणीबाणी (President’s Rule) – राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने आणीबाणी (कलम 356): या आणीबाणीला ‘राष्ट्रपती राजवट’ (President’s Rule) म्हणून ओळखले जाते. तिला ‘राज्य आणीबाणी’ किंवा ‘घटनात्मक आणीबाणी’ म्हणूनही ओळखले जाते. मात्र, परिस्थितीला ‘आणीबाणी’ असे संबोधलेले नाही.
  3. वित्तीय आणीबाणी (Financial Emergency) – भारताचे वित्तीय स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्याने वित्तीय आणीबाणी (Financial Emergency) घोषित केली जाते.

सर्वोच्च न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार 

Financial Emergency: Article 360 – Basis of Declaration | वित्तीय आणीबाणी: कलम 360 – घोषणेचे आधार

Financial Emergency- Article 360: कलम 360 मध्ये वित्तीय आणीबाणीविषयक तरतुदी आहेत. त्याद्वारे राष्ट्रपतींना वित्तीय आणीबाणीची (Financial Emergency) उद्घोषणा करण्याचा अधिकार देण्यात आली आहे. जर भारताचे किंवा एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आली आहे अशी परिस्थिती उद्भवली आहे, अशी राष्ट्रपतींची खात्री झाल्यास ते वित्तीय आणीबाणीची (Financial Emergency) घोषणा करू शकतात.

38व्या घटनादुरूस्ती कायद्याद्वारे (1975) राष्ट्रपतींची खात्री अंतिम व निर्णायक असून तिला कोणत्याही न्यायालयात कोणत्याही आधारावर आव्हान देता येणार नाही, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने (1978) ही तरतूद वगळण्यात आली. त्यामुळे सध्या राष्ट्रपतींच्या खात्रीला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते.

राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

Financial Emergency In India- Parliamentary Approval and Duration | भारतातील वित्तीय आणीबाणी- संसदेची संमती व आणीबाणीचा कालावधी

Financial Emergency- Article 360: राष्ट्रपतींनी केलेल्या वित्तीय आणीबाणीच्या(Financial Emergency) घोषणेला संसदेची संमती घ्यावी लागते. त्याबाबतच्या तरतुदी पुढीलप्रमाणे:

  • राष्ट्रपतींनी वित्तीय आणीबाणीची (Financial Emergency) घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते. अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो.
  • मात्र, जर वित्तीय आणीबाणीची घोषणा लोकसभा विसर्जित केलेली असतांना करण्यात आलेली असेल किंवा उपरोक्त दोन महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर, नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत लोकसभेने वित्तीय आणीबाणीस (Financial Emergency) मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो. अर्थात, राज्यसभेने तत्पुर्वी अशा आणीबाणीस मान्यता दिलेली असावी.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वित्तीय आणीबाणीस (Financial Emergency) मान्यता दिल्यास तिचा अंमल ती आणीबाणी समाप्त करण्याच्या घोषणेपर्यंत राहतो. यावरून दोन बाबी स्पष्ट होतात:
  1. आणीबाणीचा अंमल चालू राहण्यासाठी कोणताही महत्तम कालावधी सांगण्यात आलेला नाही.
  2. तिचा अंमल चालू ठेवण्यासाठी ठराविक कालांतराने संसदेची संमती घेण्याची गरज नसते.
  • वित्तीय आणीबाणीच्या (Financial Emergency) घोषणेचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमार्फत साध्या बहुमताने (म्हणजेच हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या निम्म्या बहुमताने) पारित होणे गरजेचे असते.

वित्तीय आणीबाणी समाप्त करणे (Revocation of Financial Emergency): राष्ट्रपती केव्हाही वित्तीय आणीबाणीची उद्घोषणा दुसऱ्या उद्घोषणेद्वारे समाप्त करू शकतात. अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

Financial Emergency: Article 360- Effects of Financial Emergency | वित्तीय आणीबाणी: कलम 360- वित्तीय आणीबाणीचे परिणाम

Financial Emergency- Article 360: वित्तीय आणीबाणी (Financial Emergency) घोषित केल्याने पुढील परिणाम होतात:

  • केंद्राच्या कार्यकारी प्राधिकाराची कक्षा व्यापक होऊन केंद्रशासन कोणत्याही राज्याला वित्तीय शिस्तीच्या तत्वांचे (canons of financial propriety) पालन करण्याबाबत निर्देश देऊ शकते, आणि त्या प्रयोजनार्थ राष्ट्रपतींना आवश्यक व पर्याप्त वाटतील असे अन्य निर्देश देऊ शकेल. अशा कोणत्याही निर्देशांमध्ये पुढील बाबींचा समावेश असू शकेल:
  1. एखाद्या राज्याच्या सेवेतील सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींच्या वेतनात व भत्त्यात घट करणारी तरतूद.
  2. सर्व धन विधेयके किंवा कलम 207 च्या तरतुदी लागू असलेली अन्य विधेयके राज्य विधानमंडळाने पारित केल्यानंतर ती राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे आवश्यक करणारी तरतूद.
  • राष्ट्रपती पुढील व्यक्तींच्या पगार व भत्त्यांमध्ये घट घडवून आणण्यासाठी निर्देश देऊ शकतात:
  1. केंद्र शासनाच्या सेवेतील सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्ती, आणि
  2. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे न्यायाधीश.

स्वातंत्र्यानंतर भारतावर बऱ्याचदा वित्तीय संकटे आलेली असतांनाही आतापर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही.

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

लेखाचे नाव लिंक
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

FAQs Financial Emergency: Article 360

Q.1 घटनेमध्ये आणीबाणीचे किती प्रकार दिलेले आहेत?

Ans. घटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत.

Q.2 राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 वित्तीय आणीबाणीसाठी कोणते कलम वापरले जाते ?

Ans: कलम 360 वित्तीय आणीबाणीसाठी कलम वापरले जाते.

Q.4  वित्तीय आणीबाणी याची माहिती कुठे मिळेल?

Ans. वित्तीय आणीबाणी याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

वित्तीय आणीबाणी (Financial Emergency), कलम 360, व्याख्या, घोषणेचे आधार, आणि परिणाम_5.1

FAQs

Which article is used for Financial Emergency?

Article 360 is used for Financial Emergency

Where can I find information on political science?

Information on the topic of political science can be found on Adda247 Marathi's app and website.

Where can I find information on Financial Emergency?

Information on the topic of Financial Emergency can be found on Adda247 Marathi's app and website.

What are the three types of Emergencies in India ?

The President can declare three types of emergencies — national, state and financial emergency