Marathi govt jobs   »   Study Materials   »   परिचय शास्त्रज्ञांचा
Top Performing

परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?

सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे.  पाठ्यपुस्तक  अभ्यास प्रक्रियेत  एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे.  ज्याद्वारे  तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.

Title  अँप लिंक वेब लिंक
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज लिंक लिंक

 

परिचय शास्त्रज्ञांचा | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा

परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists

शास्त्रज्ञ फोटो  शोध 
मायकेल फॅरेडे (1791-1867) परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_3.1
  1. त्यांनी विद्युतचुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले.
  2. तसेच विद्युतअपघटनाचेही नियम शोधून काढले.
जेम्स प्रेस्कॉट ज्यूल (1818-1889) परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_4.1
  1. ‘पदार्थाच्या सूक्ष्म कणांची गतिज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते, तसेच निरनिराळ्या ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रुपांतरण होते हे त्यांनी प्रथम दाखवून दिले.
  2. उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रुपांतरणातूनच पुढे थर्मोडायनॅमिक्स या विज्ञानशाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होतो.
  3. ऊर्जेच्या मोजमापासाठीच्या एककाला ज्यूल (J) ही संज्ञा देण्यात आली आहे.
ओरस्टेड (1777-1851) परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_5.1
  1. हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी ‘विद्युतचुंबकत्व’ समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली.
  2. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळची चुंबकसूची काही कोनातून वळते.
  3. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला.  त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ‘ओरस्टेड’ (Oersted) संबोधले जाते. 
दिमित्री मेंडेलीव्ह (1834-1907) परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_6.1
  1. त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एकेक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जी जुळणी केली त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचा शोध लागला.
विक्रम साराभाई परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_7.1
  1. यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक म्हटले जाते.
  2. त्यांच्या प्रयत्नांतून फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
  3. 1962 साली भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय अंतराळ संशोधन समिती’ ची स्थापना करून 1963 साली देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केले गेले.
  4. त्यांच्या प्रयत्नांतूनच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला होता.
  5. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
अँम्पिअर परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_8.1
  1. यांनी विद्युत धारेवर आधारित प्रयोग केले, त्यांच्या कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो.
  2. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ विद्युतधारेच्या एककास ‘अँम्पिअर’ हे नाव दिले.
जॉर्ज सायमन ओहम परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_9.1
  1. जर्मन भौतिक शास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केला.
  2. त्यांच्या सन्मानार्थ रोधाच्या एककास ‘ओहम’ हे नाव देण्यात आले आहे.
फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट (J. L. Proust) परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_10.1
  1. यांनी सन 1794 मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला, “संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण नेहमी स्थिर असते.
  2. ” उदा, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण 1:8 असते; म्हणजेच 1 ग्रॅम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होते.
आनत्वान लॅव्हाझिए (1743 ते 1794) परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_11.1
  1. त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणतात.
  2. ऑक्सिजन व हायड्रोजनचे नामकरण केले
  3. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध केले.
  4. रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारके व उत्पादितांचे अचूकपणे वस्तुमान मोजण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर केला.
  5. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले आहे याचा शोध.
  6. रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचे पहिले लेखन.
  7. संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली उदा, सल्फ्यूरिक आम्ल, कॉपर सल्फेट इत्यादी.
  8. 1789 मध्ये Elementary Treatise on Chemistry हा आधुनिक रसायनशास्त्रातील पहिला ग्रंथ लिहिला.
अलेक्झांडर फ्लेमिंग परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_12.1
  1. जगातील पहिले प्रतिजैविक (Antibiotic) – पेनिसिलीन चा शोध.
 जस्टस् वॉन लिबिग परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_13.1
  1. यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला. यालाच रजतकाच परावर्तक असे म्हणतात.
 वोहलर परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_14.1
  1. यांनी अमोनिअम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरीआ संश्लेषित केला.

 


अर्नेस्ट रूदरफोर्ड (1871-1937)
परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_15.1
  1. या ब्रिटिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने जे.जे. थॉमसन यांच्या मार्गदर्शनाखाली कॅव्हेंडीश यांच्या प्रयोगशाळेत आणि कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात किरणोत्सारावर संशोधन केले.
  2. अल्फा कणांचा मारा करून त्यांनी नायट्रोजन अणू विभागून दाखवले.
जॉलिओ क्यूरी व आयरीन जॉलिओ क्यूरी परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_16.1
  1. फ्रेडरिक जॉलिओ क्यूरी व आयरीन जॉलिओ क्यूरी या दांपत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सर्गाचा शोध लावला.
  2. या शोधाबद्द्ल त्यांना 1935 साली नोबल पुरस्कार देण्यात आला.

ग्रेगर जोहान्स मेंडेल 
परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_17.1 वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून त्यांतील काही लक्षणांच्या आनुवंशिकतेचा त्याने अभ्यास केला. 

 

हान्स लिपर्शे परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_18.1
  1. चश्मा तयार करणाऱ्या हान्स लिपर्शे या संशोधकाने 1608 मध्ये दोन भिंगे एकमेकांसमोर धरून पाहिल्यास दुरची वस्तू जवळ दिसते याचा शोध लावला व पहिली दुर्बीण तयार केली.

 

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

टॉपिक  संदर्भ  अँप लिंक वेब लिंक
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव 11 वी इतिहास (जुने) लिंक लिंक
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग 10 वी भूगोल लिंक लिंक
राजकीय पक्ष 10 वी इतिहास व राज्यशास्त्र लिंक लिंक
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ 11 वी इतिहास (जुने) लिंक  लिंक 
वनस्पतींचे वर्गीकरण 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान लिंक  लिंक 
भारतातील नद्या 10 वी भूगोल  लिंक  लिंक 
भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना 8 वी इतिहास लिंक  लिंक 

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

परिचय शास्त्रज्ञांचा | Introduction to scientists : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_20.1

FAQs

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज ही कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे ?

महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज उपयुक्त आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये कोणते विषय कवर होतील ?

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे इतिहास,भूगोल,पर्यावरण,अर्थशास्त्र,सामान्य विज्ञान तसेच पंचायत राज व राज्यशास्त्र हे सर्वच विषय दररोज कवर होणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज चा परीक्षांसाठी काय फायदा आहे ?

पाठ्यपुस्तके स्पर्धापरीक्षा अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात. जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्याचसाठी आम्ही ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज घेऊन आलो आहोत.