Marathi govt jobs   »   Study Materials   »   विंडोजची ओळख

विंडोजची ओळख | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

विंडोजची ओळख

विंडोजची ओळख: संगणकाच्या कार्यप्रणालीतील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी ऑपरेटिंग सिस्टम एक असते. ऑपरेटिंग सिस्टमच्या मदतीने संगणकाचे कार्य चालत असते. जगातली सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे “विंडोज.” आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती परीक्षेत संगणकावरील ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आज या लेखात आपण विंडोज बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

विंडोजची ओळख: विहंगावलोकन

विंडोजची ओळख: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय संगणक
उपयोगिता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा
लेखाचे नाव विंडोजची ओळख
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • विंडोजची ओळख
  • ऑपरेटिंग सिस्टमची कार्ये
  • विंडोजची वैशिष्ट्ये

विंडोजची ओळख

विंडोजची ओळख: या लेखात आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम विषयी माहिती पाहणार आहोत. विंडोजची निर्मिती मायक्रोसॉफ्ट या कंपनीने केली असून ही जगातील अतिशय लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे. Windows 11 हे तिचे अत्याधुनिक वर्जन आहे.

विंडोजचे वर्जन:

1. Microsoft Windows 3.1

2. Microsoft Windows 3.1.2

3. Microsoft Windows 95

4. Microsoft Windows 98 SE

5. Microsoft Windows NT

6. Microsoft Windows 2000

7. Microsoft Windows ME

8. Microsoft Windows XP

9. Microsoft Windows 2003

10. Microsoft Windows VISTA

11. Microsoft Windows 7

12. Microsoft Windows 8

13. Microsoft Windows 10

14. Microsoft Windows 11

विंडोज
विंडोज

ऑपरेटिंग सिस्टिम कार्ये 

संगणक आणि त्यावर काम करणारा व्यक्ती यांमध्ये सुसंवाद साधण्याचे महत्वाचे काम ऑपरेटिंग सिस्टम करते.

1.हार्डवेअर मॅनेजमेंट (Hardware Management): – संगणकाच्या वेगवेगळ्या भागांच्या, साधनांच्या कार्यांचे व्यवस्थापन करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य आहे..

2.मेमरी मॅनेजमेंट (Memory Management): – ऑपरेटिंग सिस्टिमच्या कार्यापैकी हे एक कार्य अतिशयमहत्त्वाचे आहे. माणसाप्रमाणेच एखादे काम करताना संगणक देखील त्याच्या संबंधित गोष्टींचा विचार करत असतो. म्हणजेच त्या कामाच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती कॉम्प्युटरच्या रॅन्डम ॲक्सेस मेमरी मध्ये त्यावेळी असते.

ही सर्व माहिती एका विशिष्ट पद्धतीने RAM मध्ये साठवून, संगणकाच्या मायक्रो-प्रोसेसरला ती हवी तेव्हा मिळवून देणे यालाच मेमरी मॅनेजमेंट असे म्हणतात.

3.फाईल मॅनेजमेंट (File Management): दैनंदिन जीवनात जसे आपण वेगवेगळी कागदपत्रे एका फालमध्ये एकत्र ठेवतो. तसेच कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही पुरविलेल्या माहितीच्या संचाला फाईल असे म्हणतात. ज्याप्रमाणे व्यवहारात प्रत्येक फाईलला नाव दिले जाते त्याप्रमाणे कॉम्प्युटरमध्येसुद्धा प्रत्येक माहितीच्या संचाला काहीतरी नाव द्यावे लागते. या नावालाच फाईल नेम असे म्हणतात.

संगणकावर फाईल वापरत असताना वेळोवेळी त्या पाहणे, कॉपी करणे, डिलीट करणे (म्हणजेच काढून टाकणे) अशी अनेक कार्य पार पाडावी लागतात. यासंदर्भातील माहिती संगणकाला ऑपरेटिंग सिस्टम कडून दिली जाते.

विंडोज ची वैशिष्ट्ये

1) मल्टीटास्क:- एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या संगणकाच्या क्षमतेला मल्टीटास्किंग असे म्हणतात. म्हणजेच आपण एकाच वेळी अनेक प्रोग्राम्स वापरू शकतो, चालू करू शकतो. आपण सहजरित्या एका एप्लिकेशन मधून दुसन्या एप्लिकेशन वर जाऊ शकतो. तसेच एका एप्लिकेशन मधील डेटा दुसन्या एप्लिकेशन मध्ये कट-कॉपी-पेस्ट करू शकतो.

2) माऊसचा वापर: विंडोजने mouse हे एक महत्वपूर्ण input device पुरविलेले आहे की जे प्रत्येक application मध्ये वापरले जाते. mouse मुळे आपण command type करण्यामध्ये जाणारा वेळ वाचवू शकतो. आपण रेखाचित्रांच्या स्वरूपातील image draw करू शकतो.

3) ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI): विंडोजने पुरविलेल्या या सुविधेद्वारे आपण कुठलेही एप्लिकेशन ग्राफिकल म्हणजेच आयकॉन स्वरूपात पाहू शकतो. तसेच विंडोज मध्येच मेन्यू व कमांड साठीही ग्राफिकल सपोर्ट आहे. GUI मुळे आपण विंडोज व्यवस्थितपणे व सहजरित्या हाताळू शकतो.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

विंडोज काय आहे?

विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे.

ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय?

संगणक आणि त्यावर काम करणारा व्यक्ती यांमध्ये सुसंवाद साधण्याचे महत्वाचे काम ऑपरेटिंग सिस्टम करते.

विंडोज बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

विंडोज बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.