Table of Contents
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे. आधुनिक महाराष्ट्नाच्या इतिहासामध्ये समाजसुधारक हा अभ्यासघटक हा खुप महत्वाचा ठरतो. आगामी काळातील MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत समाजसुधारक या घटकावर प्रश्न विचारतांना समाजसुधारकांचे जन्म व मृत्यू दिनांक, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था, त्यांचे लेखन विषयक कार्य व त्यांचे वैचारिक विश्व यावर प्रश्न विचारले गेलेले दिसतात. उदा. “गुलामगिरी’ गंथ कोणी लिहिला? चवदार तळे येथे कोणी, कधी, सत्यागह केला? वेदोक्त प्रकरण कधी घडले होते? लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाचा उल्लेख केला जातो? इ. समाजसुधारकावरील प्रश्नांचे स्वरुप पूर्णत: वस्तूनिष्ठ असते. त्यामुळे समाजसुधारकाच्या घटकाचे एकदा, दोनदा सूक्ष्म वाचन झाले तर वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती एकत्रित करुन त्याची सतत रिव्हिजन करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जगन्नाथ शंकरशेठ: विहंगावलोकन
महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य ज्यांनी केले त्या समाजसुधारकांच्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.
महत्वाचे समाजसुधारक: जगन्नाथ (नाना) शंकरशेठ: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | महाराष्ट्राचा इतिहास |
लेखाचे नाव | महत्वाचे समाजसुधारक: जगन्नाथ (नाना) शंकरशेठ |
लेखातील मुख्य घटक |
जन्म व मृत्यू दिनांक, शैक्षणिक व सामाजिक सुधारणा, त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था. |
महत्वाचे समाजसुधारक: जगन्नाथ (नाना) शंकरशेठ
- जन्म: 10 फेब्रुवारी 1803, मुंबई
- जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरसेठ यांना ‘मुंबईचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते. दानशूर स्वभावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली.
नाना शंकरसेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा:
- बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, 1823: लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकायनि नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या. 1845 मध्ये स्टुडण्टस् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली. डॉ. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली.
- नाना शंकरसेठ यांचा 1834 मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार होता.
एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई
- मुंबई इलाख्यातील ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन- 1840’ चे ते सदस्य होते. या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात. या संस्थेचे 1856 मध्ये शिक्षण खात्यात रूपांतर झाले.
- जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते.
- त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.
- जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी बॉम्बे असोसिएशनची या संस्थेची स्थापना 1852 मध्ये केली.
- मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते.
- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले.
- मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते.
- त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला. जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता.
- 26 ऑगस्ट 1852 रोजी त्यांनी ‘बॉम्बे असोसिएशन’ या नावाने राजकीय पक्षाची स्थापनाही केली ज्यामध्ये तत्कालीन मुंबईतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता.
- त्याचे पहिले अध्यक्ष सर जमशेटजी जेजीभाई होते. पुढे दादाभी नौरोजी आणि इतर तरुणही त्यात सामील झाले.
- गिरगावातील नाना चौकाजवळील भवानी-शंकर मंदिर आणि राम मंदिर हेही जगन्नाथ सेठ यांचेच योगदान आहे.
- जगन्नाथ सेठ यांनी जुन्या मुंबईतील अनेक भागात केलेली कामे आजही मुंबईच्या विकासातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची साक्षीदार आहेत.
- मुंबईतील अनेक विकासकामांसाठी त्यांनी तत्कालीन ब्रिटिश राजवटीला आर्थिक मदत केली.
- शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एलफिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली.
- या सोसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या.
- ‘स्टुडंट लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटी’ च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली.
- स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती.
- स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली.
- पुढे त्यांनी एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले.
- सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ची स्थापना केली.त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले.त्याचेच रुपांतर पुढे शिक्षण खात्यात झाले.
- मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता.
- जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली.
- नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी सढळ हाताने वापर केला. नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते.
- त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली, ते दानशूर होते.
- सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिले.
- त्यामुळेच त्यांना मुंबईचे ‘शिल्पकार’ असे म्हणतात.
- ‘नाना ही मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते’ या शब्दांत आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
- निधन : 31 जुलै 1865.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
31 डिसेंबर 2023 | जालियनवाला बाग हत्याकांड |
1 जानेवारी 2024 | गांधी युग |
3 जानेवारी 2024 | रक्ताभिसरण संस्था |
5 जानेवारी 2024 | प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी |
7 जानेवारी 2024 | 1857 चा उठाव |
9 जानेवारी 2024 | प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी |
11 जानेवारी 2024 | राज्यघटना निर्मिती |
13 जानेवारी 2024 | अर्थसंकल्प |
15 जानेवारी 2024 | महाराष्ट्र – स्थान व विस्तार |
17 जानेवारी 2024 | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल |
19 जानेवारी 2024 | मूलभूत हक्क |
21 जानेवारी 2024 | वैदिक काळ |
23 जानेवारी 2024 | सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी |
25 जानेवारी 2024 | शाश्वत विकास |
27 जानेवारी 2024 | महर्षी कर्वे व त्यांचे कार्य |
29 जानेवारी 2024 | 1942 छोडो भारत चळवळ |
31 जानेवारी 2024 | भारतीय रिझर्व्ह बँक |
1 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे |
2 फेब्रुवारी 2024 | स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था |
3 फेब्रुवारी 2024 | रौलेट कायदा 1919 |
4 फेब्रुवारी 2024 | गारो जमाती |
5 फेब्रुवारी 2024 | लाला लजपत राय |
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
6 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेचे कलम 15 |
7 फेब्रुवारी 2024 | भारतातील हरित क्रांती |
8 फेब्रुवारी 2024 | मार्गदर्शक तत्वे |
9 फेब्रुवारी 2024 | गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण |
10 फेब्रुवारी 2024 | भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग |
11 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत |
12 फेब्रुवारी 2024 | महागाईचे प्रकार आणि कारणे |
13 फेब्रुवारी 2024 | श्वसन संस्था |
14 फेब्रुवारी 2024 | अलैंगिक प्रजनन |
15 फेब्रुवारी 2024 | सातवाहन कालखंड |
16 फेब्रुवारी 2024 | बिरसा मुंडा |
17 फेब्रुवारी 2024 | पंचायत राज समित्या |
18 फेब्रुवारी 2024 | कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड |
19 फेब्रुवारी 2024 | 1991 च्या आर्थिक सुधारणा |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.