पत्रकार पी साईनाथ यांना जपानचा फुकुओका ग्रँड प्राइज पुरस्कार जाहीर
पत्रकार पालागुम्मी साईनाथ यांना 2021 साठीचा जपानचा फुकुओका ग्रँड प्राइज पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानच्या फुकुओका शहर आणि फुकुओका सिटी इंटरनॅशनल फाऊंडेशनने स्थापित केलेला हा पुरस्कार आशियाई संस्कृती जपण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येतो. याव्यतिरिक्त इतर दोन पुरस्कार मिंग-किंग काळात चीनच्या सामाजिक-आर्थिक इतिहासामध्ये तज्ज्ञ असलेले जपानमधील इतिहासकार प्राध्यापक किशिमोतो मिओ यांना अकॅडमिक्स पुरस्कार देण्यात आला आणि थायलंडमधील लेखक आणि चित्रपट निर्माते प्रब्दा युन यांना कला व संस्कृती पुरस्कार देण्यात आला.
साईनाथ यांच्याविषयी:
- साईनाथ यांचा जन्म चेन्नई येथे झाला असून त्यांनी द हिंदूचे संपादक म्हणून आणि ब्लिट्ज या राजकीय मासिकाचे उपसंपादक म्हणून काम पहिले आहे.
- त्यांना 1995 मध्ये पत्रकारितेसाठी युरोपियन कमिशनचा लोरेन्झो नताली पुरस्कार आणि 2000 साली अॅम्नेस्टी आंतरराष्ट्रीय ग्लोबल ह्युमन राईट्स जर्नालिझम पुरस्कार देण्यात आला.
- 2001 साली युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनचा बोरमा पुरस्कार आणि 2007 साली आशियाई पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.
- “एव्हरीबडी लव्हस् गुड ड्रॉट” हे त्यांचे प्रमुख पुस्तक असून टाइम्स ऑफ इंडिया मधील ‘द फेस ऑफ पुअर इंडिया’ या स्तंभातील 85 लेखांचा संग्रह आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा