Marathi govt jobs   »   Job Notification   »   केंद्रप्रमुख भरती 2023
Top Performing

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु, एकूण 2384 केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज करा

केंद्रप्रमुख भरती 2023

केंद्रप्रमुख भरती 2023: केंद्रप्रमुख भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु झालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 डिसेंबर 2023 ते 08 डिसेंबर 2023 या कालावधीत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण 2384 केंद्रप्रमुख पदाच्या भरतीकरिता जून 2023 मध्ये केंद्रप्रमुख भरती 2023 जाहीर केली होती. या लेखात केंद्रप्रमुख भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023: विहंगावलोकन

केंद्रप्रमुख भरती 2023 अंतर्गत एकूण 2384 केंद्रप्रमुख पदाची भरती होणार आहे. केंद्रप्रमुख भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग शिक्षण परीक्षा परिषद पुणे
भरतीचे नाव केंद्रप्रमुख भरती 2023
पदाचे नाव

केंद्रप्रमुख

रिक्त पदांची संख्या 2384
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
नोकरीचे स्थान संपूर्ण महाराष्ट्र
MSCE चे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in

केंद्रप्रमुख भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

केंद्रप्रमुख भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023 – महत्वाच्या तारखा

कार्यक्रम जुन्या तारखा  नव्या तारखा 
केंद्रप्रमुख भरती 2023 अधिसूचना 05 जून 2023
केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 06 जून 2023 01 डिसेंबर 2023
केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 08 डिसेंबर 2023
केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023 जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात लवकरच जाहीर करण्यात येईल

केंद्रप्रमुख भरती 2023 अधिसूचना

महाराष्ट्र शिक्षण विभागाने दिनांक 05 जून 2023 रोजी केंद्रप्रमुख भरती 2023 जाहीर केली होती. सदर परीक्षा ही विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आहे. यासाठी आधी इच्छुक व पात्र उमेदवार केंद्रप्रमुख भरती 2023 साठी 15 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकत होते. परंतु मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद, नागपूर खंडपीठे येथे दाखल झालेल्या याचिकांमुळे केंद्रप्रमुख भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती तरी सदर भरती प्रक्रिय पुन्हा सुरु झाली असून दिनांक 08 डिसेंबर 2023 पर्यंत पात्र उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.  केंद्रप्रमुख भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

केंद्रप्रमुख भरती 2023 अधिसूचना PDF

केंद्रप्रमुख भरती 2023 प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी केंद्रप्रमुख भरती 2023 बद्दल दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे ज्यानुसार केंद्रप्रमुख भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन केंद्रप्रमुख भरती 2023 प्रसिद्धीपत्रक PDF डाउनलोड करू शकतात.

केंद्रप्रमुख भरती 2023 प्रसिद्धीपत्रक PDF

केंद्रप्रमुख भरती 2023: उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

केंद्रप्रमुख भरतीसाठी नवीन अर्ज करणाऱ्या व याआधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना पहाव्यात.

  1. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. 01/12/2023 ते दि. 08/12/2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी.
  2. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  3. तसेच मा. न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील.

केंद्रप्रमुख भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

केंद्रप्रमुख भरती 2023 अंतर्गत एकूण 2384 केंद्रप्रमुख पदांची भरती होणार आहे. जिल्हानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023
केंद्रप्रमुख भरती 2023 रिक्त पदांचा तपशील

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

केंद्रप्रमुख भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा
  • प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • अर्ज करायच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारचे वय 50 वर्षे असावे.

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी: रु. 950
  • मागास प्रवार्गासाठी: रु. 850

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 08 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

केंद्रप्रमुख भरती 2023 निवड प्रक्रिया

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा परीक्षेच्या आधारे केल्या जाणार आहे. केंद्रप्रमुख भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा (एकूण गुण 200)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक

महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

केंद्रप्रमुख भरती 20केंद्रप्रमुख भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु, एकूण 2384 केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज करा23, एकूण 2384 केंद्रप्रमुख पदासाठी अधिसूचना जाहीर_5.1

FAQs

केंद्रप्रमुख भरती 2023 कधी जाहीर झाली?

केंद्रप्रमुख भरती 2023 दिनांक 05 जून 2023 रोजी जाहीर झाली?

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

केंद्रप्रमुख भरती 2023 अंतर्गत एकूण 2384 पदांची भरती होणार आहे.

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष काय आहे?

केंद्रप्रमुख भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष या लेखात देण्यात आले आहे.