Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली
Top Performing

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली

Title 

Link  Link 

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक

कृष्णा नदीचे खोरे:

दक्षिण भारतातील गोदावरी नदीनंतर दुसरी महत्त्वाची नदी म्हणजे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाराष्ट्रात उगम पावल्यानंतर, कृष्णा नदी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते आणि शेवटी त्रिभुज प्रदेश तयार करून मछलीपट्टणमजवळ बंगालच्या उपसागरात मिसळते.

एकूण लांबी = 1400 किमी

महाराष्ट्रातील लांबी = 282 किमी

एकूण क्षेत्रफळ = 2,58,948 चौ. किमी

महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 28,700 चौ. किमी.

नदी खोऱ्यातील जिल्हे: सातारा आणि सांगली (काही भाग वगळता), कोल्हापूर (संपूर्ण जिल्हा)

 कृष्णा नदीच्या उपनद्या:

उजव्या किनाऱ्यावरून डाव्या किनाऱ्यावरून
कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, ताम्रपर्णी येरळा, नांदला, अग्रणी

कृष्णा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या:

१) कोयना नदी : कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो.

२) पंचगंगा नदी : कोल्हापूर जिल्ह्याची जीवनरेखा मानली जाणारी पंचगंगा नदी पाच नद्यांच्या संगमातून तयार झाली आहे. या पाच नद्या पुढीलप्रमाणे आहेत- कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या चार उपनद्या आहेत आणि पाचवी सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते.

कृष्णा नदी खोऱ्यातील संगम शहरे:

1. माहुली- सातारा = कृष्णा आणि वेण्णा

2. कराड – सातारा = कृष्णा आणि कोयना

3. नृसिंहवाडी – कोल्हापूर = कृष्णा आणि पंचगंगा

4. हरिपूर-सांगली = कृष्णा आणि वारणा नदी

5. भिलवडी-सांगली = कृष्णा आणि येरळा

 नदीच्या काठावरील महत्त्वाची शहरे:

कृष्णा नदी – वाई, कराड, सांगली, औदुंबर, नृसिंहवाडी

पंचगंगा नदी – कोल्हापूर

भीमा नदीचे खोरे:

भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि महाराष्ट्राच्या सीमेबाहेर कृष्णा नदीला मिळते म्हणून ती महाराष्ट्रात वेगळी मानली जाते. भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे होतो. भीमा नदी महाराष्ट्रात उगम पावते आणि कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमा नदी खोऱ्यातील जिल्हे : पुणे आणि सोलापूर (संपूर्ण जिल्हा) आणि (काही भाग वगळता) सातारा, अहमदनगर, बीड, धाराशिव (उस्मानाबाद)

महाराष्ट्रातील लांबी = 451 किमी

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ = 46,184 चौ. किमी

भीमा नदीच्या उपनद्या:

उजव्या किनाऱ्यावरून डाव्या किनाऱ्यावरून
भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वेल, कर्हा, माण, बोर कुकडी, पुष्पावती, मीना, घोड

भीमा नदी खोऱ्याच्या संगमावर असलेली शहरे

· पुणे = मुळा-मुठा नदी

· शिरूर (पुणे) = कुकडी- घोड नद्या

· रांजणगाव (पुणे) = मुळा-मुठा आणि भीमा नदी

· नीरा-नरसिंगपूर = भीमा आणि नीरा नदी

नद्यांच्या काठावरील महत्त्वाची शहरे

· देहू-आळंदी = इंद्रायणी नदी

· जेजुरी = कर्हा नदी

· पंढरपूर = भीमा नदी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य_4.1