Table of Contents
कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024
कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024: कृषी सेवक 2023 भरती अंतर्गत दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये कृषी सेवक पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार कृषी सेवक पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 16 जानेवारी 2024 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन
कृषी सेवक परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | कृषी विभाग |
भरतीचे नाव | कृषी सेवक भरती 2023 |
पदाचे नाव | कृषी सेवक |
लेखाचे नाव | कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024 |
कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024 | शिफ्ट 1, 16 जानेवारी 2024 |
एकूण गुण | 200 |
कृषी सेवक परीक्षेचे स्वरूप 2023
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 20 याप्रमाणे 80 प्रश्न व तांत्रिक विषयातील 60 प्रश्न असे मिळून 140 प्रश्न विचारण्यात आले होते.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 20 | 20 |
2 | इंग्रजी भाषा | 20 | 20 |
3 | सामान्य ज्ञान | 20 | 20 |
4 | बौद्धिक चाचणी | 20 | 20 |
5 | तांत्रिक प्रश्न | 60 | 120 |
एकूण | 140 | 200 |
कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 15-17 | सोपी |
2 | इंग्रजी भाषा | 14-16 | मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 13-15 | मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 14-16 | मध्यम |
5 | तांत्रिक प्रश्न | 52-55 | मध्यम |
एकूण | 108-119 | मध्यम |
विषयानुरूप कृषी सेवक परीक्षा विश्लेषण 2024 (शिफ्ट 1)
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 20 याप्रमाणे 80 प्रश्न व तांत्रिक विषयातील 60 प्रश्न असे मिळून 140 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, रिकाम्या जागा भरा, समानार्थी शब्द इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात General Vocabulary, Fill in the blanks, Synonyms, Antonyms, Comprehension इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक मधील पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात अंक मालिका, अक्षर मालिका, बैठक व्यवस्था इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
तांत्रिक विषयाचे विश्लेषण
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत कृषी सेवक मधील पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषयात एकूण 60 प्रश्न विचारण्यात आले होते. तांत्रिक विषयात अभ्यासक्रमाशी निगडीत प्रश्न विचारण्यात आले होते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख |
|
कृषी सेवक भरती 2023 | |
कृषी विभाग वेतन 2023 | कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
कृषी विभाग भरती 2023 | कृषी विभाग रिक्त पदे 2023 |
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 | कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |