Marathi govt jobs   »   Latest Post   »   Last Minute Revision for MIDC Exam

Last Minute Revision for MIDC 2019 Exam | MIDC 2019 परीक्षेसाठी उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Industrial Development Corporation  Exam Last Minute Revision

Maharashtra Industrial Development Corporation Exam: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer-Civil], कनिष्ठ अभियंता (विवयां) [Junior Engineer-EM], लघुलेखक (निम्न श्रेणी) [Shorthand-junior grade], वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant), सहाय्यक(Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), भूमापक (Surveyor), तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) [Technical Assistant grade-2], जोडारी (श्रेणी-2) , पंपचालक (श्रेणी 2) [Pump operator grade 2] , विजतंत्री (श्रेणी-2) [Electrician grade -2], वाहनचालक (श्रेणी-2) [Motor driver grade 2] शिपाई (Peon) व मदतनीस (Helper) इत्यादी 865  रिक्त पदे भरण्यासाठी 2019 साली पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने रिक्त पदांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा 20 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर बाबतच्या सूचना उमेदवारानां ईमेल व एसएमएस द्वारे देण्यात येतील. अर्जदारांना त्यांचे प्रवेश पत्र महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र वेळेवर डाऊनलोड करून त्याची प्रत काढून घ्यावी.

 MIDC Exam details पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC परीक्षेचे प्रवेश्पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC Recruitment: Important points for revision

वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विविध जागांसाठी परीक्षा दिलेल्या कालावधीत घेत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम हा दोन भागात विभागण्यात आला आहे. एक सर्व पदांसाठी सामाईक आणि दोन पदाच्या आवश्यकतेनुसार तांत्रिक अभ्यासक्रम. प्रत्येक पदाकरिता असलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

प्रत्येक पदाकरिता असलेला सविस्तर अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आपण आपण या लेखात जो अभ्यासक्रम सामाईक आहे त्यातील परीक्षेला अत्यावश्यक असलेले मुद्दे पाहणार आहोत ते खालीलप्रमाणे;

  1. English व्याकरण – या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इंग्रजी व्याकरणातील Synonyms word, Antonyms word, common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning या गोष्टींवर भर देणे अपेक्षित आहे. याकरिता सर्वात चांगला स्त्रोत म्हणजे MPSC चे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका ठरू शकतील. तसेच या विभागात दिलेल्या उताऱ्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे.
  2. मराठी व्याकरण – या ठिकाणी विद्यार्थ्यांनी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ या गोष्टींवर भर देणे अपेक्षित आहे. याकरिता सर्वात चांगला स्त्रोत म्हणजे MPSC चे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका ठरू शकतील. तसेच या विभागात दिलेल्या उताऱ्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे.
  3. सामान्य ज्ञान – या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.
  • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
  • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
  • अर्थव्यवस्था – या विभागात MIDC ची परीक्षा असल्याने भारताचे आणि मुख्यत्वे महाराष्ट्राचे औद्योगिक क्षेत्र आणि महाराष्ट्रातील उद्योग विकासाच्या महत्त्वाच्या योजना आणि धोरणे हे घटक महत्त्वाचे ठरतात. तसेच 2020-21 च्या आर्थिक अहवालातील उद्योग क्षेत्र हे प्रकरण अभ्यासणे फायद्याचे ठरेल.
  • राज्यव्यवस्था – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
  • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

  4. बुध्दीमापन चाचणी – येथे विद्यार्थ्याची आकलन क्षमता आणि निर्णय क्षमता तपासण्यावर भर दिला जाईल यासाठी आयोगाचे मागील वर्षीच्या प्रश्नांची उजळणी करणे फायद्याचे ठरेल.

  5. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961: या आधारित 10 किंवा 20 प्रश्न विचारले जातील त्यामुळे हा अधिनियम पूर्णपणे अभ्यासणे महत्त्वाचे ठरेल. या अधिनियमातील खालील मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरू शकतात.

  • एकूण कलमे – 69 आणि प्रकरणे – 07 
  • राष्ट्रपतींची अनुमती दिनांक – 28 फेब्रुवारी 1962 
  • अधिनियमाचा उद्देश – महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत व औद्योगिक वसाहतीत उद्योगधंद्याची पध्दतशीर स्थापना करण्यासाठी विशेष तरतूद करणे, आणि सामान्यतः त्यांची पडण करण्यास सहाय्य देणे व त्या प्रयोजनांसाठी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करणं, आणि उपरोक्त  बाबींशी संबंधित असलेल्या प्रयोजनांसाठी तरतूद करणे यांबाबत अधिनियम.
  • महामंडळाची स्थापना – 01 ऑगस्ट 1962
  • महामंडळाचा इतिहास – 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर, महाराष्ट्र सरकारने 1 ऑक्टोबर 1960 रोजी “औद्योगिक विकास मंडळ” (बीआयडी) ची स्थापना एस जी बर्वे, आयसीएस यांच्या अध्यक्षतेखाली केली. बोरकर समितीच्या शिफारशींनुसार उल्हास व्हॅली पाणीपुरवठ्याचा विकास औद्योगिक विकास मंडळाकडे (बीआयडी) सोपवण्यात आला. बीआयडीने कायदा तयार करून राज्य स्कारला सादर केला आणि हा कायदा “महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा” च्या रूपाने मंजूर होऊन 1 ऑगस्ट 1962 रोजी MIDC ला स्वतंत्र महामंडळ म्हणून दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 डाऊनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा. या PDF मध्ये महत्वाचे मुद्धे Highlight सुद्धा केले आहेत, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961

वरील माहिती विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. 20 ऑगस्ट पासून होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि लवकरच परीक्षेबाबत इतर Updates तुम्हाला Adda 247 मराठी च्या संकेतस्थळावर वर उपलब्ध होतील.

Best of Luck for Your Exam…

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!