बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
दिलीप कुमार या व्यावसायिक नावाने ओळखले जाणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील महान अभिनेते मोहम्मद युसुफ खान यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. ते बॉलिवूडचे शोकांतिका सम्राट (ट्रॅजीडी किंग) म्हणून लोकप्रिय होते. त्यांचा शेवटचा चित्रपट 1998 सालचा ‘किला’ हा होता. 1954 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे ते पहिले अभिनेते होते. त्यांनी एकूण 8 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर (सध्याचा पाकिस्तानात) येथे झाला. 1944 सालचा ज्वार भाटा हा त्यांचा पहिला चित्रपट मात्र 1947 सालच्या जुगनू या चित्रपटाने ते लोकप्रिय झाले. त्यांना 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा