Marathi govt jobs   »   Study Materials   »   विधानसभा
Top Performing

विधानसभा: रचना, कार्यकाल व इतर माहिती | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

विधानसभा: रचना, कार्यकाल व इतर माहिती

विधानसभा: रचना, कार्यकाल व इतर माहिती: विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांचा समावेश घटक राज्यांच्या कायदेमंडळात होतो. आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये राज्यशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. राज्याच्या दृष्टीने विधानसभा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. या वर हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण विधानसभा: रचना, कार्यकाल व इतर माहिती या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

विधानसभा: विहंगावलोकन

विधानसभा: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय राज्यशास्त्र
उपयोगिता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा
लेखाचे नाव विधानसभा: रचना, कार्यकाल व इतर माहिती
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • विधानसभा
  • रचना
  • कार्यकाल
  • अधिवेशन

विधानसभा

विधानसभा: विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. प्रत्येक घटक राज्यात विधानसभा असावी याची तत्रुड कलम 170 द्वारे करण्यात आली आहे. विधानसभेची रचना, कार्यकाल, अधिवेशन, पदाधिकारी या बाबतची सविस्तर माहिती या लेखात खाली देण्यात आली आहे.

विधानसभा: रचना

  • कलम 170 (1) हे विधानसभेच्या रचनेशी निगडीत आहे.
  • घटक राज्यांच्या विधानसभेत कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500 सदस्य असू शकतात.
  • संसदेच्या विशेष कायद्याने विधानसभा सदस्यांची संख्या 60 पेक्षा कमी देखील असू शकते. उदा. गोवा(40), मिझोराम(40), सिक्कीम (32).

विधानसभा: कार्यकाल

विधानसभेचा कार्यकाल सर्वसामान्य परिस्थितीत 5 वर्ष इतका असतो. परंतु आणीबाणीच्या कालावधीत संसद हा कार्यकाल एकावेळेस जास्तीत जास्त एक वर्ष इतका वाढवू शकते. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर मात्र 6 महिन्यांच्या आत विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात.

विधानसभा: सदस्यत्वासाठी पात्रता निकष

कलम 173 विधानसभा सदस्यांच्या पात्रतेशी संबंधित आहे. विधानसभा सदस्यत्वासाठी पात्रता निकष खाली दिलेला आहे.

  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
  • त्याने वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावी.
  • संसदेने विहित केलेल्या अटींची पूर्तता केलेली असावी.

विधानसभा: अधिवेशन

विधानसभा अधिवेशन बोलाविण्याचे अधिकार कलम 174 नुसार राज्यपालांना आहेत. विधानसभेचे सभापती हे या अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. राज्यपाल कलम 175 नुसार अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण किंवा संदेश पाठवू शकतात. सदस्य संख्येच्या 1/10 किंवा 10 यापैकी जी संख्या मोठी असेल एवढी गणसंख्या (कोरम) नसेल तर अध्यक्ष विधानसभा तहकूब करतात.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

विधानसभा: रचना, कार्यकाल व इतर माहिती | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कसले सभागृह आहे?

विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे.

विधानसभा अधिवेशन बोलाविण्याचे अधिकार कलम 174 नुसार कोणाला आहेत?

विधानसभा अधिवेशन बोलाविण्याचे अधिकार कलम 174 नुसार राज्यपालांना आहेत

विधानसभा बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

विधानसभा बद्दल सविस्तर माहिती या लेखात आहे.