Table of Contents
List of Countries and their National Sports: Study Material for MHADA Exam: General Awareness, General Knowledge आणि Maharashtra Static GK या सारख्या विषयांवर MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, MHADA भरती या सर्व परीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणूनच दररोज आम्ही तुमच्यासाठी महत्वाचे असणारे Study Material घेऊन येत असतो.
MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व क्लस्टर च्या परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. डिसेंबर मध्ये होणाऱ्या MHADA च्या परीक्षेत सामान्य ज्ञान यावर 50 प्रश्न विचारले जाणार आहे. पेपरमध्ये सामान्य ज्ञान या विषयात चांगले गुण मिळवायचे असेल तर Static Awareness चांगले पाहिजे. तरच आपण Static Awareness प्रश्न लवकर सोडवून बाकी प्रश्नांना वेळ देवू शकतो. List of Countries and their National Sports हा Static Awareness मध्ये येतो. तर चला रोज आपण आपल्या म्हाडा परीक्षांसाठी महत्वाचे असलेल्या विषयांचा अभ्यास करूयात. आज या लेखात आपण पाहुयात List of Countries and their National Sports | देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी.
List of Countries and their National Sports | देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ
देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ: एका देशाचा राष्ट्रीय खेळ हा त्या देशाची लोकप्रियता आणि सांस्कृतिक महत्त्व यावर आधारित खेळ आहे. राष्ट्रीय खेळ हा त्या विशिष्ट देशातील मूळ रहिवाशांसाठी एक महत्त्वाचा भाग मानला जातो. समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित सर्व देशांनी आपले राष्ट्रीय खेळ जाहीर केले आहेत. जगभरातील विविधतेबद्दल आपल्याला अंतर्दृष्टी देण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह प्रमुख देशांची यादी प्रदान केली गेली आहे. ज्ञान मिळवण्यासाठी आणि सर्व देशांच्या राष्ट्रीय खेळांची जाणीव होण्यासाठी खाली लिहिलेला लेख वाचा.
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ
देश | राष्ट्रीय खेळ |
अफगाणिस्तान | बुझ्काशी |
अँग्विला | यॉट रेसिंग |
अँटिग्वा आणि बार्बुडा | क्रिकेट |
अर्जेंटीना | पाटो |
ऑस्ट्रेलिया | क्रिकेट |
बांगलादेश | कबड्डी |
बार्बाडोस | क्रिकेट |
बर्म्युडा | क्रिकेट |
भूतान | धनुर्विद्या-तिरंदाजी |
ब्राझील | असोसिएशन फुटबॉल |
कॅनडा | लॅक्रोस (उन्हाळा), आइस हॉकी (हिवाळा) |
चिली | चिलीयन रोडिओ |
चीन | पिंग पाँग (टेबल टेनिस) |
कोलंबिया | तेजो |
क्यूबा | बेसबॉल |
डेन्मार्क | असोसिएशन फुटबॉल, हँडबॉल |
डोमिनिकन प्रजासत्ताक | बेसबॉल |
इंग्लंड | क्रिकेट |
एस्टोनिया | बास्केट-बॉल |
फिनलँड | Pesäpallo (फिनिश बेसबॉल) |
फ्रांस | फुटबॉल |
जॉर्जिया | रग्बी युनियन |
ग्रेनेडा | क्रिकेट |
गयाना | क्रिकेट, वॉटर पोलो |
हैती | फुटबॉल |
आईसलँड | हँडबॉल |
भारत | फील्ड हॉकी |
इंडोनेशिया | पेन्काक सिलात |
इराण | कुस्ती |
आयर्लंड | गेलिक फुटबॉल |
इस्रायल | फुटबॉल |
जमैका | क्रिकेट |
जपान | सुमो |
लिथुएनिया | बास्केट-बॉल |
मादागास्कर | रग्बी युनियन |
मलेशिया | सेपाक तकराव |
मॉरिशियस | फुटबॉल |
मेक्सिको | Charrería |
मंगोलिया | मंगोलियन कुस्ती, तिरंदाजी |
नेपाळ | व्हॉलीबॉल |
न्युझीलँड | रग्बी युनियन |
नॉर्वे | क्रॉस-कंट्री स्कीइंग (हिवाळा) |
पाकिस्तान | फील्ड हॉकी |
पापुआ न्यू गिनी | रग्बी लीग |
पेरू | पालेटा Frontón |
फिलिपाईन्स | अर्निस |
पोर्तो रिको | पासो फिनो |
रोमेनिया | ओइना |
रशिया | बँडी |
स्कॉटलंड | गोल्फ |
स्लोव्हेनिया | अल्पाइन स्कीइंग |
दक्षिण कोरिया | तायक्वांडो |
श्रीलंका | व्हॉलीबॉल |
ताजिकिस्तान | गुश्तीगिरी |
बहामास | क्रिकेट |
तुर्की | तेल कुस्ती |
तुर्क आणि कैकोस बेटे | क्रिकेट |
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका | बेसबॉल |
उरुग्वे | डेस्ट्रेझास क्रिओलास |
व्हेनेझुएला | बेसबॉल |
वेल्स | रग्बी युनियन |
भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
List of Countries and their National Sports FAQs:
Q1. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ काय आहे?
Ans. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ म्हणजे क्रिकेट.
Q2. फ्रान्सचा राष्ट्रीय खेळ काय आहे?
Ans. फ्रान्सचा राष्ट्रीय खेळ म्हणजे फुटबॉल
Q3. बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ काय आहे?
Ans. बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे
Q4. सुमो कुस्ती हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
Ans. सुमो कुस्ती हा जपानचा राष्ट्रीय खेळ आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो