Table of Contents
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023: महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत दिनांक 23 जून 2023 रोजी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली. एकूण 4644 पदांसाठी तलाठी भरती 2023 जाहीर झाली. या तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 26 जून 2023 पासून सुरु होणार आहे. तलाठी भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या प्रत्येकाजवळ सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे आपल्याजवळ असल्यास वेळेवर आपली तारांबळ होणार नाही. या लेखात आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 पाहणार आहोत.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023: विहंगावलोकन
तलाठी भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्राची यादी या लेखात प्रदान करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 च्या प्रारूप अधिसूचनेमध्ये एकूण 18 कगदपत्रांची यादी देण्यात आली आहे. तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | तलाठी भरती 2023 |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण रिक्त पदे | 4644 |
लेखाचे नाव | तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 |
एकूण कागदपत्रे | 18 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
तलाठी भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्राच्या महसूल विभागाने जेव्हा तलाठी भरती 2023 ची प्रारुप अधिसूचना जाहीर केली तेव्हा त्या अधिसूचनेमध्ये तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी जाहीर केली. त्यामुळे सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपल्याजवळ तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 आहे कि नाही याबद्दल खात्री करून घ्यावी. या लेखात तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023
तलाठी भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज करतेवेळी आपणाजवळ कोणते कागदपत्रे लागणार आहे. ही यादी जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
अ. क्र. | कागदपत्रे / प्रमाणपत्रे | फाईल फॉरमॅट |
1 | अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता) | पी. डी. एफ |
2 | वयाचा पुरावा (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, जन्म प्रमाणपत्र) | पी. डी. एफ |
3 | शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा | पी. डी. एफ |
4 | सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा | पी. डी. एफ |
5 | आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा | पी. डी. एफ |
6 | अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र | पी. डी. एफ |
7 | पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
8 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
9 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
10 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
11 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
12 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
13 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. | पी. डी. एफ |
14 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र | पी. डी. एफ |
15 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
16 | मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा | पी. डी. एफ |
17 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र | पी. डी. एफ |
18 | MS-CIT प्रमाणपत्र | पी. डी. एफ |
नोट:
- प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणान्य उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- विविध सामाजकि व समांतर आरक्षणचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राच्या यादीची PDF
तलाठी भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज करतेवेळी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राच्या यादीची PDF खाली प्रदान करण्यात आली आहे.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राच्या यादीची PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |