Table of Contents
लोकमान्य टिळक |Lokmanya Tilak : आदिवासी विकास विभाग भरतीसाठी इतिहासाचा अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. आजच्या लेखात आपण लोकमान्य टिळक यांचा अभ्यास करणार आहोत.
लोकमान्य टिळक |Lokmanya Tilak : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
साठी उपयुक्त | आदिवासी विकास विभाग भरती 2023 |
विषय | आधुनिक भारताचा इतिहास |
लेखाचे नाव | लोकमान्य टिळक |Lokmanya Tilak |
महाराष्ट्रातील समाजसुधारक- लोकमान्य टिळक
Lokmanya Tilak- Background | लोकमान्य टिळक – पार्श्वभूमी
लोकमान्य टिळक (1856-1920)
- मूळ नाव: केशव
- जन्म: चिखलगाव ता. दापोली, रत्नागिरी
- आई – पार्वतीबाई
- वडील- गंगाधरपंत
- पत्नी: सत्यभामाबाई यांच्याशी विवाह (1871)
Lokmanya Tilak- Education | लोकमान्य टिळक – शिक्षण
- 1872: MATRIC
- 1876: B. A.
- 1879: L.L.B.
- प्रभाव: जेम्स मील, हर्बर्ट स्पेन्सर
Lokmanya Tilak- Establishment of Educational Institutions | लोकमान्य टिळक – शैक्षणिक संस्थांची स्थापना
- 1 जाने 1880: NEW ENGLISH SCHOOL: गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत मिळून स्थापना.
- 1884: DECCAN EDUCATION SOCIETY ची स्थापना.
- 1885: फर्ग्यूसन विद्यालय.
- 1890: संचालक मंडळाशी मतभेदांमुळे संस्थेचा राजीनामा.
Lokmanya Tilak- Newspapers | लोकमान्य टिळक – वर्तमानपत्रे
- 1881: आर्यभूषण छापखाना
- 2 जानेवारी 1881: मराठा (इंग्रजीत)
- 4 जानेवारी 1881: केसरी (मराठीत)
Lokmanya Tilak- Important event | लोकमान्य टिळक – महत्वपूर्ण घटना
- संमतीवय कायद्याला विरोध:
- 11 वर्षीय बंगाली मुलगी फुलमणी दासी प्रकरण: तिचा 35 वर्षाचा थेरडा नवरा याने तिच्यावर बलात्कार केला.
- त्यामुळे फुलमणी दासी या मुलीचा मृत्यु झाला.
- सर्व बाजूंनी विवाहाच्या कायद्यात बदलाची मागणी झाल्यावर इंग्रज सरकारने संमतीवय कायदा करून मुलींचे विवाहाचे वय 10 वरून 12 वर आणले. (Governor General: Lord Lansdowne)
- टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन संमतीवय कायद्याला विरोध केला.
- पंडिता रमाबाईंच्या “शारदा सदन” संस्थेला विरोध:
- टिळक व त्यांच्या अनुयायांनी या संस्थेचा उद्देश धर्मांतर असल्याची आवई उठवली.
- परीणामी पुण्याहून संस्था केडगांवला हलवावी लागली.
- 1893: हिंदू-मुसलमान दंगे:
- टिळकांचे मत हा दोन धर्मीयांमधील विवाद नसून सरकार हा तिसरा पक्ष विवादाचे मूळ आहे.
- ताई महाराज प्रकरण:
- टिळकांवर बलात्काराचा आरोप.
- टिळकांचे वकिल- दादासाहेब करंदीकर
- सेशन कोर्टात टिळकांना शिक्षा: 1½ वर्षमजूरी आणि 1000/- रुपये दंड.
- परंतू अपीलात टिळकांची निर्दोष सुटका झाली.
- कॉंग्रेस अधिवेशनातील कार्य:
- 1896: टिळक व त्यांच्या अनुयायांनी सार्वजनिक सभेवर ताबा प्रस्थापित केला.
- 1906: टिळकांच्या प्रयत्नाने कॉंग्रेस अधिवेशनात चतुःसूत्री संमत.
- 1907: सूरत अधिवेशनात जहाल आणि मवाळ विवाद. टिळकांनी अध्यक्ष निवडीलाच हरकत घेतली.
- 1915: कॉंग्रेसच्या मुंबई अधिवेशनामध्ये मध्ये टिळक व इतर जहालांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली. (अध्यक्ष– सत्येंद्रनाथ सिन्हा)
- 1916: कॉंग्रेसचे लखनौ अधिवेशन – टिळकांचा मानाने कॉंग्रेसमध्ये पुन:प्रवेश (अध्यक्ष- अंबिका चरण मुजुमदार)
- 1916: होमरूल लीग (टिळकांचा पुढाकार)
- अध्यक्ष: जोसेफ बाप्टिस्ता
- सचिव: न. चि. केळकर
- मुंबई शाखा जय-विजय: डॉ. मोतीराम वेलकर आणि विजय दिनकर साठ्ये
- डिसेंबर 1919: पुणे महानगरपालिकेकडून टिळकांना मानपत्र अर्पण.
- या गोष्टीला कवी माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) यांचा सक्त विरोध.
- 1919-20: मॉण्ट-फोर्ड सुधारणा → अग्रलेख: जनाब दिल्ली बहुत दूर है.
- टिळकांनी निवडणुका लढवण्यासाठी “कॉंग्रेस लोकशाही पक्ष” स्थापन केला.
Lokmanya Tilak- Public Celebrations | लोकमान्य टिळक – सार्वजनिक उत्सव
- 1893: सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात.
- पहिला सार्वजनिक गणेशोत्सव विंचुरकर यांच्या वाडयात.
- सुधारणावादी रानडे, गोखले तसेच सनातनी वासुदेव व बाळकृष्ण चाफेकर यांचा विरोध.
2. 1895: शिवजयंतीला सुरुवात.
- 1896 मध्ये कलकत्ता मध्ये सुद्धा शिवजयंती साजरी झाली.
- त्यात टिळक तसेच काही मुसलमान नेत्यांची भाषणे झाली.
Lokmanya Tilak- Imprisonment | लोकमान्य टिळक – तुरुंगवास
- कोल्हापूर संस्थानाचे प्रकरण:
- कोल्हापूर संस्थानाचा दिवाण माधवराव बर्वे याने इंग्रजांशी संगनमत करून कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा छळ करून त्यांना ठार मारले.
- त्यावर केसरी व मराठा मध्ये जोरदार टिका.
- संपादक टिळक व आगरकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला: चार महिने शिक्षा.
- महात्मा फुले यांच्या विनंतीवरून रामशेठ उरवणे यांनी जामिनासाठी 10,000 रुपये भरले.
- गोपाळ गणेश आगरकर यांनी टिळकांसोबत तुरुंगात घालवलेले ते दिवस “डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस” या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
- 1897: रॅडचा खून प्रकरण:
- टिळकांचे अग्रलेख: राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
- टिळकांना 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा.
- Max Muller यांच्या विनंतीवरून सरकारने शिक्षा 6 महिने कमी केली.
- खुदिराम बोस बॉम्बहल्ला प्रकरण:
- टिळकांचे अग्रलेख: हे उपाय टिकाऊ नाहित, देशाचे दुर्दैव.
- टिळकांकडे सेनापती बापट यांची बॉम्ब बनवण्यावर चिठ्ठी सापडली.
- शिक्षा: 6 वर्ष काळे पाणी आणि 1000 रुपये दंड.
- मराठाचे संपादक न. चि. केळकर आणि ज्ञानप्रकाश कर्ते नरेश अप्पा द्रविड यांच्यावर सुद्धा खटला.
- 1914: टिळक कैदेतून मुक्त झाले.
Lokmanya Tilak- Books | लोकमान्य टिळक – पुस्तके
- 1892: ओरायन – वेदांचा काल निर्णय हा BC 4500 ठरवला.
- 1898: ARCTIC HOME IN THE VEDAS – येरवड्याच्या तुरुंगात लिखाण.
- 1910-11: गीतारहस्य – मंडाले तुरुंगात लिखाण. गीतेची कर्मपर शिकवण.
Lokmanya Tilak- Death | लोकमान्य टिळक – निधन
- 1920: कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे टिळक असावेत, असे पं मालवीय यांनी सूचवले.
- तत्पूर्वी 1 ऑगस्ट 1920: टिळकांचे निधन.
- टिळकांना खांदा देणारे: मौलाना शौकत अली, मोहम्मद ली जीना
- 1 ऑगस्ट 1920: हा दिवस गांधींनी असहकाराचा शुभारंभ म्हणून निश्चित केला.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.