Marathi govt jobs   »   Study Materials   »   ग्रामपंचायत
Top Performing

ग्रामपंचायत : MAHA TET अभ्यास साहित्य

ग्रामपंचायत : MAHA TET अभ्यास साहित्य

ग्रामपंचायत 

  • छोट्या गावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. 
  • सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. 
  • पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. 
  • ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 च्या कलम 5 अन्वये चालतो. 
  • ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
  • ग्रामपंचायतीची मुदत 5 वर्षांसाठी आहे. 

सरपंच व उपसरपंच

  • ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो.
  • ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.
  • निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलाविण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतो. 
  • सरपंचावर व उपसरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी तो मांडावा लागतो. जर हा ठराव 2/3 बहुमताने पारित झाला, तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. 
  • महिला सरपंचावरील अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यास 3/4 बहुमत लागते.
  • सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे तर उपसरपंच सरपंचांकडे देतात. 

अधिकार व कार्ये

  • मासिक सभा बोलावणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.
  • गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे
  • ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
  • योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे.
  • ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे.

आरक्षण 

  • ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव आहेत.
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव आहेत.
  • इतर मागासवर्गीयांसाठी 27 % जागा आरक्षित आहेत.

सदस्याची पात्रता 

1. तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा.
2. त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
3. त्याने वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावी.

ग्रामसेवक

  • ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ओळखतात. 
  • ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते. 
  • हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. 
  • त्याचे वेतन जिल्हा निधीतून दिले जाते.

ग्रामसेवकाचे काम

  • ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
  • ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
  • गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
  • लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
  • करवसुल करणे.

ग्रामसभा

  • ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारिणी असल्याने ती ग्रामसभेला जबाबदार असते.
  • ग्रामसभेच्या वर्षातून चार बैठका होतात. 
  • ग्रामपंचायतीचा सरपंच ग्रामसभेच्या बैठकीचा अध्यक्ष असतो. 

ग्रामपंचायतीची कामे

  • गावात रस्ते बांधणे.
  • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
  • दिवाबत्तीची सोय करणे.
  • जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
  • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
  • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
  • शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
  • शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
  • गावचा बाजार, जत्रा, उत्सव, संदल,उरुस यांची व्यवस्था ठेवणे.

परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण काही निवडक प्रश्न-उत्तरे –

Q1.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी…… व जास्तीत जास्त ………..इतकी असते. 

Ans – 7 व 17

Q2. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

Ans – सरपंच

Q3. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

Ans – राज्य सरकार

Q4. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते ?

Ans – जिल्हा निवड मंडळ

Q5. ग्राम पंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकते ?

Ans – जिल्हा परिषद

Q6. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?

Ans – ग्रामसभा

Q7. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार……..पाहतात.

Ans – ग्रामसेवक

Q8. सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यानंतर त्या दिवसापासून……….कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

Ans – 12 महिने

Q9. दोन व अधिक गावांसाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत म्हणतात, त्याकरिता प्रत्येक गावाची लोकसंख्या किती असावी लागते?

Ans – 600 पेक्षा कमी

Q10. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ?

Ans – ग्रामसभा

Q11. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?

Ans – 18 वर्ष

Q12. भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?

Ans – ग्रामपंचायत

Q13. गावातुन गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती हिस्सा ग्रामपंचायतीला मिळतो?

Ans – 30%

Q14. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या “व्हीलेज फंडाची” संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ?

Ans – ग्रामपंचायत सचिव

Q15. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते ?

Ans – पंचायत समिती

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024

ग्रामपंचायत : MAHA TET अभ्यास साहित्य_3.1   ग्रामपंचायत : MAHA TET अभ्यास साहित्य_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

ग्रामपंचायत : MAHA TET अभ्यास साहित्य_6.1

FAQs

या लेखात आपण ग्रामपंचायत विषयी माहिती पाहणार आहोत का ?

होय,या लेखात आपण ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या लेखात आपण ग्रामपंचायती विषयी अत्यंत महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत का ?

होय, या लेखात आपण ग्रामपंचायती विषयी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत.

TOPICS: