Marathi govt jobs   »   Study Materials   »   घड्याळ
Top Performing

घड्याळ:संकल्पना, महत्वाची सूत्रे | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

घड्याळ (Clock)

संकल्पना योग्यरित्या माहित असल्यास घड्याळ (क्लॉक) बुद्धिमत्ता चाचणी विभागातील प्रश्न हा स्कोअरिंग विषयांपैकी एक आहे. सहसा, या विभागात येणारे प्रश्न अतिशय सोपे असतात परंतु कधीकधी ते अवघड पद्धतीने तयार केलेले असतात. अन्न व नागरी पुरवठा भरती इत्यादी सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार घड्याळाचे तर्कविषयक प्रश्न विचारले जातात.

घड्याळ (Clock): विहंगावलोकन

खालील तक्त्यात आपण घड्याळ (Clock) बद्दल विहंगावलोकन पाहू शकता.

घड्याळ (Clock): विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता स्पर्धा परीक्षांसाठी
विषय बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिकचे नाव घड्याळ (Clock)
घड्याळावर आधारित प्रश्नांचे प्रकार
  • मूलभूत संकल्पनांवर प्रश्न.
  • घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोन शोधा
  • दिलेल्या कोनासाठी अचूक वेळ शोधा

घड्याळ संकल्पना

घड्याळाला तीन प्रकारचे काटे असतात. मिनिट काटा, तास काटा आणि सेकंद काटा. मिनिट काट्याला लांब काटा असेही म्हणतात आणि तास काट्याला लहान काटा असेही म्हणतात. या दोन काट्यांपैकी तिसरा काटा देखील असतो तो म्हणजे सेकंद काटा परंतु सहजा या काट्याच्या आधारावर प्रश्न विचारले जात नाहीत. तर चला या लेखात आपण घड्याळ (Clock) बद्दल शिकुयात.

संकल्पना: घड्याळ वर्तुळाप्रमाणे कार्य करते, जसे की त्याचा पूर्ण 360° कोन आहे.

(1) एका तासात, मिनिट काटा संपूर्ण वर्तुळ पार करते म्हणजेच 360° कोन किंवा आपण 12 ब्लॉक म्हणू शकतो.

12 ब्लॉक = 360°
1 ब्लॉक = 30°
[ 1 ब्लॉक 5 मिनिट]
1 मिनिट= 6°
टीप: मिनिट काटा एक मिनिटात 6° कोण सरकतो.

(2) एका तासात, तास काटा 1 ब्लॉक व्यापतो. उदाहरणार्थ. जर घडाळ्यात 4’0 वाजले असतील तर एका तासानंतर त्यात 5’0 वाजतील.
1 तास = 1 ब्लॉक
60 मिनिट = 5 मिनिट ∵ [1 ब्लॉक = 5 मिनिट]
60 मिनिट = 30°, .. 1 मिनिट = 1/2°
टीप: एका मिनिटात एक तास काटा 1/2° कोन सरकतो

घड्याळाच्या काट्यांमधील कोन शोधण्याचे सूत्र:-

घड्याळाच्या काट्यांमधील कोन शोधण्याचे सूत्र खालील प्रमाणे आहे,

घड्याळ:संकल्पना, महत्वाची सूत्रे | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_3.1

  • जेव्हा घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात, जेव्हा ते 30 मिनिटे अंतरावर असून त्यांच्यातील कोण 180° असतो. ही परिस्थिती एका तासात एकदा, 12 तासांत 11 वेळा आणि एका दिवसात 22 वेळा (24 तास) येते कारण 5 ते 6 आणि 6 ते 7 दरम्यान, ते विरुद्ध दिशेने नसतात.
  • जेव्हा घड्याळाचे काटे 0° असतात तेव्हा ते एकमेकांच्या वर किंवा आच्छादित असतात. ही परिस्थिती एका तासात एकदा येते. 12 तासांमध्ये 11 वेळा आणि दिवसातून 22 वेळा (24 तास) कारण 12 आणि 1 दरम्यान, आच्छादित करणे शक्य नाही.
  • जेव्हा घड्याळाचे दोन्ही काटे काटकोनात असतात (जेव्हा दोन काट्यांमधील अंतर 90° असते). यावेळी, ते 15 मिनिटांच्या अंतरावर असतात. ही परिस्थिती एका तासात दोनदा, 12 तासांत 22 वेळा आणि दिवसातून 44 वेळा येते. 2 आणि 3, 3 आणि 4 मध्ये, एक काटकोन सामान्य आहे आणि 8 ते 9 फक्त एक वेळा काटकोन शक्य होईल.

घड्याळ: नमुना प्रश्न

प्रश्न 1. एका घड्याळात 2 वाजून 30 मिनीटे झाली आहेत. तर तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?

(a)110°

(b)125°

(c)105°

(d)115°

उत्तर (c)

स्पष्टीकरण : तासांना 30 ने गुणावे = 2 x 30 = 60

मिनिटांना 5.5 ने गुणावे = 5.5 x 40 =165

165-60 = 105° (105 हा फरक 180 पेक्षा कमी असल्याने 105° चा कोन होईल.)

प्रश्न 2. दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या घड्याळात नेहमी 10 वाजून 20 मिनीटांचा वेळ दर्शविला जातो. येथे तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन असतो ?

(a)110°

(b)125°

(c)105°

(d)115°

उत्तर (c)

स्पष्टीकरण :10 x 30=300 व 20 x 5.5= 110

फरक = 300 – 110 = 190

कोन = 360 -190 = 170°

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

घड्याळ:संकल्पना, महत्वाची सूत्रे | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_5.1

FAQs

एका तासात, मिनिट काटा कितीचा कोन तयार करतो?

एका तासात, मिनिट काटा संपूर्ण वर्तुळ पार करते म्हणजेच 360° कोन तयार करतो?

घड्याळाला किती प्रकारचे काटे असतात?

घड्याळाला तीन प्रकारचे काटे असतात.