Marathi govt jobs   »   Study Materials   »   क्रम व स्थान

क्रम व स्थान | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

क्रम व स्थान (Order and Ranking)

क्रम व स्थान: बुद्धिमत्ता चाचणी विभागात क्रम व स्थान (ऑर्डर आणि रँकिंग) विषय हा सर्वात महत्त्वाचा आणि गुण मिळवणारा विषय आहे. रांग किंवा पंक्ती किंवा ओळीच्या दोन्ही टोकांना, उजवीकडे आणि डावीकडे, वरच्या आणि खालच्या बाजूने व्यक्तीच्या रँक (स्थान) बद्दल विचारलेल्या क्रम व स्थान प्रश्नांचा उल्लेख केला जातो आणि या माहितीवर प्रश्न विचारले जातात. काही प्रश्न पदांच्या अदलाबदलीवर आधारित आहेत. या लेखात, आम्ही सोल्यूशन फॉर्म्युला आणि प्रश्नांच्या नवीनतम पॅटर्नच्या मदतीने क्रम व स्थान (Order and Ranking) प्रश्नांच्या महत्त्वाच्या संकल्पना, युक्त्या, टिपा, प्रश्न आणि उत्तरे यावर चर्चा करू.

क्रम व स्थान (Order and Ranking): विहंगावलोकन

आगामी स्पर्धा परीक्षांसाठी क्रम व स्थान (Order and Ranking) वर आधारित प्रश्न कसे सोडवायचे, याबद्दल संपूर्ण चर्चा खाली केली आहे खालील तक्त्यात आपण क्रम व स्थान बद्दल विहंगावलोकन पाहू शकता.

क्रम व स्थान (Order and Ranking): विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता स्पर्धा परीक्षांसाठी
विषय बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिकचे नाव क्रम व स्थान (Order and Ranking)
लेखातील प्रमुख मुद्दे
  • क्रम व स्थान (Order and Ranking) म्हणजे काय
  • क्रम व स्थान (Order and Ranking) प्रश्नांचे प्रकार
  • टिपा, युक्त्या आणि संकल्पना
  • काही महत्वाचे सोडवलेली उदाहरणे

क्रम व स्थान (ऑर्डर आणि रँकिंग) म्हणजे काय?

एखाद्या ओळीत किंवा रांगेत एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची क्रम किंवा स्थान काय आहे हे प्रश्नात दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे होय. क्रम आणि स्थान प्रश्नांमध्ये, उजवीकडून, डावीकडून वरून किंवा खालून पंक्ती मध्ये किंवा वर्गामध्ये व्यक्तीचे स्थान निश्चित करायचे असते किंवा श्रेणी/स्थान दिले आहे आणि एकूण व्यक्तींची संख्या मोजायची असते. तुम्हाला दिलेल्या माहितीचा वापर करून, कोणती व्यक्ती कोणत्या मजल्यावर राहते हे निर्धारित करण्यास देखील सांगितले जाऊ शकते. या विषयातील कोणत्याही परीक्षेत साधारणपणे 2-3 प्रश्न असतात. काही सोप्या शॉर्टकट युक्त्या अनुसरण करून तुम्ही काही सेकंदात प्रश्न सहजपणे सोडवू शकता. हे तुमच्या तर्कशक्तीला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे परीक्षेतील तुमचे गुण.

क्रम व स्थान प्रश्नांचे प्रकार

उमेदवार येथे ऑर्डर आणि रँकिंग प्रश्नांचे प्रकार तपासू शकतात.

तुलना आधारित: या प्रकारच्या क्रम आणि स्थान प्रश्नांमध्ये उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रमाणांची तुलना करणे आणि योग्य उत्तर शोधणे आवश्यक आहे.

रँकिंग आधारित: या प्रकारच्या क्रम आणि स्थान प्रश्नामध्ये, उमेदवारांना एखाद्या व्यक्तीचे रँक (स्थान) शोधणे आवश्यक आहे, जसे की वरून, खालून, डावीकडून, उजवीकडून स्थान इ.

पंक्ती आधारित: या प्रकारच्या क्रम आणि स्थान प्रश्नांमध्ये पंक्तीवर आधारित प्रश्न दिले जातात

क्रम आणि स्थान प्रश्न सोडवण्यासाठी टिपा, युक्त्या आणि संकल्पना

या स्पर्धा परीक्षांमधून पात्रता मिळवण्यासाठी वेळ हा महत्त्वाचा घटक आहे आणि तर्कशास्त्र विभागातून जाण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स हा एकमेव मार्ग आहे. उमेदवार येथे ऑर्डर आणि रँकिंग प्रश्न सोडवण्यासाठी टिपा, युक्त्या आणि संकल्पना तपासू शकतात.

  • कोणत्याही बाजूने वेगवेगळ्या व्यक्तींचे स्थान दिले असेल आणि एकूण लोकसंख्येची गणना करायची असेल तर ते नेहमीच CND (निश्चित करू शकत नाही) चे प्रकरण असते किंवा डेटा अपुरा आहे. याचे कारण असे की ओव्हरलॅपिंग (आच्छादित) आहे की नाही हे आपल्याला माहित नाही.
  • जेव्हा एका ओळीत, दोन व्यक्तींचे स्थान दिले जाते आणि त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली जाते तेव्हा 1ल्या व्यक्तीचे स्थान अदलाबदल करण्यापूर्वी त्याच बाजूने दिले जाते.
  • ज्या प्रश्नांमध्ये एका ओळीत व्यक्तींची किमान संख्या शोधण्यास सांगितले जाते, तेव्हा दोन्ही बाजूंच्या व्यक्तींची दिलेल्या पोझिशन्स एकमेकांना ओव्हरलॅप केल्याचे नेहमीच घडते.
  • काही वेळा एकूण व्यक्तींचा उल्लेख केला जातो आणि उजवीकडून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे स्थान दिली जाते, मग डावीकडून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे स्थान विचारली जाते. एकूण व्यक्तींची संख्या = [(डावीकडून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे स्थान + उजवीकडून त्याच विशिष्ट व्यक्तीचे स्थान)-1]
  • काही वेळा डाव्या आणि उजव्या बाजूने दोन व्यक्तींचे स्थान आणि त्यांच्यामध्ये किती व्यक्ती बसतात ते दिले जातात आणि रांगेत कमीत कमी व्यक्ती किंवा जास्तीत जास्त व्यक्ती किती आहेत यावर प्रश्न विचारले जातात.

उदाहरण: A डावीकडून 5व्या क्रमांकावर बसतो. B उजवीकडे 6 वा बसतो. त्यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसतात. रांगेत जास्तीत जास्त आणि कमीत कमी व्यक्ती किती बसू शकतात ते शोधा.

उत्तर. येथे, आपल्याकडे दोन स्तिथी आहेत उदा., स्तिथी -1 आणि स्तिथी -2

स्तिथी -1: जास्तीत जास्त व्यक्तींसाठी

क्रम व स्थान | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_3.1

= L + R + च्या मध्ये

= 5 + 6 + 2 = 13

एकूण व्यक्ती= 13

स्तिथी -2: कमीतकमी व्यक्तींसाठी

क्रम व स्थान | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_4.1

= (L + R) – (च्या मध्ये + 2)

= (5 + 6) – (2 + 2) = 7

 = एकूण व्यक्ती = 7

[टीप: L=डावीकडून स्थिती, R=उजव्या टोकापासून स्थिती, A आणि B च्या मध्ये बसलेल्या व्यक्तींची संख्या]

* ‘डाव्या’ला ‘ वरून’ आणि ‘उजव्या’ला ‘ खालून’ असेही म्हणतात, हे लक्षात ठेवावे.

क्रम व स्थान प्रश्न, उत्तरे आणि स्पष्टीकरण

दिशानिर्देश (1-3): खालील माहितीचा अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या:

एका वर्गात सहा विद्यार्थी आहेत- P, Q, R, S, T आणि U. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कॅंडीज आहेत. S कडे फक्त दोन विद्यार्थ्यांपेक्षा कॅंडीची संख्या कमी आहे. P कडे R पेक्षा जास्त कॅंडीज आहेत पण U पेक्षा कमी. R कडे कमीत कमी कॅंडीज नाहीत. S कडे कॅंडीजची विषम संख्या नाही. U कडे Q पेक्षा कमी कँडीज आहेत. ज्याच्याकडे तिसर्‍या-कमी कँडीज आहेत त्याच्याकडे 21 कँडीज आहेत.

Q1. खालीलपैकी कोणाकडे सर्वाधिक कॅंडीज आहेत?
(a) Q
(b) U
(c) R
(d) S
(e) यापैकी नाही

Q2. जर U कडे 48 कँडीज असतील तर S कडे कँडीजची संभाव्य संख्या किती आहे?
(a) 45
(b) 19
(c) 38
(d) 25
(e) यापैकी नाही

Q3. खालीलपैकी कोणाकडे तिसर्‍या क्रमांकावर सर्वात कमी कँडी आहेत?
(a) U
(b) R
(c) S
(d) P
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण (1-3):

Q > U > S > P (21) > R > T

S1. उत्तर (a)

S2. उत्तर (c)

S3. उत्तर (d)

Q4. समीर एका ओळीच्या डाव्या टोकापासून 20 व्या आणि अरुण हा पंक्तीच्या उजव्या टोकापासून 12 व्या स्थानावर आहे. जर त्यांनी त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर अरुण उजव्या टोकापासून 10 होईल. रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या शोधा?
(a) 30
(b) 39
(c) 28
(d) 31
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण :

S4. उत्तर (b)

पंक्तीतील एकूण व्यक्तींची संख्या = (20+10-1) = 29

Q5. J, K, L, M आणि N मध्ये, प्रत्येकाची उंची भिन्न आहे, K फक्त एका व्यक्तीपेक्षा उंच आहे. M फक्त L पेक्षा लहान आहे. M, J आणि N (दोन्ही) पेक्षा उंच आहे. त्यापैकी तिसरा सर्वात उंच कोण आहे? 
(a) J
(b) K
(c) L
(d) N
(e) एकतर (a) किंवा (d)

स्पष्टीकरण:

S5. उत्तर. (E)

L> M > J/N > K > J/N

Q6. दिनेश 30 विद्यार्थ्यांच्या एका ओळीच्या डाव्या टोकापासून 15व्या आणि मोनिका त्याच रांगेतील उजव्या टोकापासून 20व्या क्रमांकावर आहे. त्यांच्यामध्ये रांगेत किती विद्यार्थी आहेत?
(a) 3
(b) 2

(c) 1
(d) 5
(e) 4

स्पष्टीकरण:

S6. उत्तर (a)

उजव्या टोकापासून दिनेशची स्थिती = (30+1-15) = 16

त्यांच्यामधील विद्यार्थी = (20-16-1) = 3

Q7. A, B, C, D आणि E मध्ये, त्या प्रत्येकाचे वजन वेगळे आहे. D चे वजन फक्त तीन व्यक्तींपेक्षा जास्त आहे. B चे वजन E पेक्षा जास्त आणि C पेक्षा कमी आहे. A हा सर्वात हलका व्यक्ती नाही. C, D पेक्षा हलका नाही. A, B पेक्षा जड आहे. त्यापैकी तिसरा सर्वात जड कोण आहे? 
(a) B
(b) D
(c) E
(d) A
(e) C

स्पष्टीकरण:

S7. उत्तर (d)

C > D > A > B > E

Q8. विद्यार्थ्यांच्या एका ओळीत, आशिष उजव्या टोकापासून 15 वा आणि नेहा डावीकडून 10 वी आहे. जर या रांगेत नेहा उजवीकडून 12वी आहे, तर आशिषचे डावीकडून स्थान काय आहे?
(a) 8 वा
(b) 7 वा
(c) 10 वा
(d) 12 वा
(e) वरीलपैकी नाही

स्पष्टीकरण:

S8. उत्तर (b)

स्पष्टपणे, आशिष उजवीकडून 15 वा आहे आणि

नेहा उजव्या टोकापासून 12 वी आणि रांगेच्या डाव्या टोकापासून 10वी आहे

तर, पंक्तीतील विद्यार्थ्यांची संख्या = (12 – 1 + 10) = 21

आता, आशिष उजवीकडून 15 व्या क्रमांकावर आहे

आशिषच्या डावीकडील मुलांची संख्या = (21+1-15)

त्यामुळे, आशिष हा पंक्तीच्या डाव्या टोकापासून 7 वा आहे.

Q9. 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात, रोहनची रँक खालून 21 आहे आणि अरुणची रँक रोहनपेक्षा 2 खाली आहे, तर अरुणची रँक वरून किती आहे?
(a) 21
(b) 22
(c) 25
(d) 24
(e) 20

स्पष्टीकरण:

S9. उत्तर (b)

Q10. एका वर्गात 23 विद्यार्थी आहेत. वर्गातील मुलांमध्ये सुमितचा चौथा क्रमांक लागतो. वर्गातील मुलींमध्ये शिवानी पाचव्या क्रमांकावर आहे. सुमित वर्गात शिवानीपेक्षा एक रँक (क्रमांक) खाली आहे. वर्गात कोणतेही दोन विद्यार्थी समान श्रेणीत नाहीत. शिवानीची वर्गात काय रँक आहे?
(a) ठरवता येत नाही
(b) 5वी
(c) 8वी
(d) 7वी
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण

S10. उत्तर (c)

सोल. शिवानीच्या आधी 3 मुले आणि 4 मुली असल्याने शिवानीचा क्रमांक 8 वा आहे.

Q11. 55 विद्यार्थ्यांच्या ओळीत, करणचे स्थान डावीकडून 39 वे आहे आणि मयंकचे स्थान उजवीकडून 36 वे आहे, तर त्यांच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत?
(a) 19
(b) 17
(c) 16
(d) 20
(e) 18

स्पष्टीकरण:

S11. उत्तर (e)

करणचे स्थान डावीकडून 39 वे आहे

डावीकडून मयंकचे स्थान डावीकडून (55-36+1=20 वे) आहे

त्यामुळे त्यांच्यामध्ये 18 विद्यार्थी आहेत.

Q12. राखी 36 विद्यार्थ्यांच्या एका ओळीच्या डाव्या टोकापासून 22वी आणि प्रीत त्याच रांगेतील उजव्या टोकापासून 24वी आहे. त्यांच्यामध्ये रांगेत किती विद्यार्थी आहेत?
(a) 9
(b) 7

(c) 8
(d) 5
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S12. उत्तर (c)

डाव्या टोकापासून प्रीत स्थिती = (36+1-24) =13

त्यांच्यामधील विद्यार्थी = (22-13-1) =8

Q13. डॉक्‍टर राहुल बॅचमधील एकूण डॉक्‍टरांच्या यादीत 14व्या आणि खालून 19व्या क्रमांकावर आहे. बॅचमध्ये किती डॉक्टर आहेत?
(a) 32
(b) 33
(c) 31
(d) 30
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S13. उत्तर (a)

वर्गातील डॉक्टरांची संख्या = 14+19-1=32

Q14. पाच व्यक्ती उदा. A, B, C, D आणि E चे वेगवेगळे वजन आहेत. A किमान दोन व्यक्तींपेक्षा जड आहे. D, B पेक्षा जड आहे. फक्त C आणि E, B पेक्षा हलके आहेत. त्यापैकी दुसरा सर्वात जड कोण आहे?
(a) A
(b) D
(c) B
(d) निश्चित करता येत नाही
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S14. उत्तर (d)

A/D > D/A > B > C/E > E/C

Q15. तिकीट वितरणाच्या एका ओळीत, अर्पित पंक्तीच्या सुरुवातीपासून 11 व्या स्थानावर आहे आणि मोनू पंक्तीच्या शेवटी 7 व्या स्थानावर आहे. जर अर्पित आणि मोनू मध्ये 5 लोक उभे असतील तर विक्रेत्याने किती तिकिटे विकली ते शोधा (प्रत्येक व्यक्तीने एकच तिकीट खरेदी केले असेल तर)?
(a) 21
(b) 24
(c) 22
(d) 23
(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S15. उत्तर (d)

Q16. 45 विद्यार्थ्याच्या वर्गात आदित्यची रँक वरपासून बारावी आहे आणि खालून त्याची रँक किती आहे.

(a) 33

(b) 34

(c) 35

(d) ठरवता येत नाही

(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S16. उत्तर (a)

Q17. 42 विद्यार्थ्यांच्या वर्गात नूतनची रँक खालून 22 आहे आणि वरच्या क्रमांकावरून तिची रँक किती आहे.

(a) 21

(b) 22

(c) 23

(d) ठरवता येत नाही

(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S17. उत्तर (a)

Q18. एका वर्गात, सोनल वरच्या क्रमांकावरून 10व्या क्रमांकावर आहे, तीची खालून रँक किती आहे.

(a) 24

(b) 25

(c) 26

(d) ठरवता येत नाही

(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S18. उत्तर (d)

Q19. एका वर्गात सोनू वरून 15 वा आणि खालून बारावा आहे त्या वर्गात किती विद्यार्थी आहेत.

(a) 21

(b) 25

(c) 26

(d) ठरवता येत नाही

(e) यापैकी नाही

स्पष्टीकरण:

S19. उत्तर (c)

Q20. 80 मुलांच्या वर्गातील एका मुलाची रँक वरपासून 48 वी आहे आणि खालून त्याची रँक किती आहे.

(a) 32

(b) 34

(c) 35

(d) ठरवता येत नाही

(e) यापैकी काहीही नाही

स्पष्टीकरण:

S20. उत्तर (e)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

क्रम व स्थान (ऑर्डर आणि रँकिंग) म्हणजे काय?

एखाद्या ओळीत किंवा रांगेत एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची क्रम किंवा स्थान काय आहे हे प्रश्नात दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे होय.

कोणत्या परीक्षांमध्ये क्रम व स्थान प्रश्न विचारले जातात?

बुद्धिमत्ता चाचणी विभागात क्रम व स्थान (ऑर्डर आणि रँकिंग) विषय हा सर्वात महत्त्वाचा आणि गुण मिळवणारा विषय आहे आणि तलाठी भरती, पोलीस भरती, महानगरपालिका भरती, नगर परिषद भरती, MPSC, बँकिंग क्षेत्र यासारख्या कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षांमधील सर्वात सामान्य विषयांपैकी एक आहे.