Marathi govt jobs   »   Study Materials   »   टक्केवारी

टक्केवारी: सूत्र, युक्त्या आणि नमुना प्रश्न, अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

टक्केवारी सूत्र

टक्केवारी सूत्र: टक्केवारीचा वापर 100 च्या संदर्भात एखाद्या गोष्टीचा वाटा किंवा रक्कम शोधण्यासाठी केला जातो. सर्वात सोप्या स्वरूपात, टक्के म्हणजे प्रति शंभर. टक्केवारी हा 100 चा एक भाग किंवा अपूर्णांक असतो आणि तो ‘%’ या चिन्हाने दर्शविला जातो, टक्केवारी मुख्यतः गुणोत्तरांची तुलना शोधण्यासाठी वापरली जाते. टक्केवारी हा एक मनोरंजक विषय आहे जो तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील व्याज मोजण्यात मदत करतो. विविध स्पर्धा परीक्षा जसे की अन्न व नागरी पुरवठा इत्यादी परीक्षेत संख्यात्मक अभियोग्यता विभागात टक्केवारीचे प्रश्न विचारले जातात.

टक्केवारी सूत्र
श्रेणी अभ्यास साहित्य
साठी उपयुक्त अन्न व नागरी पुरवठा परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा
विषय संख्यात्मक अभियोग्यता
लेखाचे नाव टक्केवारी सूत्र

टक्केवारी कशी काढायची

या लेखात, आम्ही टक्केवारी आणि टक्केवारीच्या प्रश्नांच्या सूत्रासह टक्केवारीची मूलभूत व्याख्या देत आहोत जे तुम्हाला टक्केवारी काढायला मदत करातात आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचे गुण वाढवतात. या विषयावरील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही शॉर्टकट टक्केवारी पद्धती आणि सूत्रे शिकू शकता. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी महत्त्वाच्या विषयांचे ज्ञान असणे आणि मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक आहे.

टक्केवारीचा अर्थ/ टक्केवारी व्याख्या

टक्के म्हणजे “प्रत्येक 100 साठी” किंवा “100 पैकी.” (%) चिन्ह 100 च्या छेदासह अपूर्णांक लिहिण्याचा एक द्रुत मार्ग आहे. उदाहरणार्थ, “रामने 100 पैकी 70 गुण मिळवले” असे म्हणण्याऐवजी आपण “रामने 70% गुण मिळवले” असे म्हणू. टक्केवारी दशांश स्वरूपात जसे की 67.9% किंवा 0.72% लिहिली जाऊ शकते.

टक्केवारीचे सूत्र

टक्केवारी काढण्याचे सूत्र अगदी सोपे आहे.

टक्केवारी = (मूल्य ⁄ एकूण मूल्य) × 100
आता हे सूत्र वापरून काही उदाहरणे पाहू.

टक्केवारी कशी काढायची?

टक्केवारी सूत्र वापरून टक्केवारी कशी काढायची हे समजून घेण्यासाठी आम्ही येथे काही उदाहरणे देत आहोत. हे प्रश्न तुम्हाला टक्केवारी कॅल्क्युलेटर वापरून टक्केवारी आणि टक्केवारीचे सूत्र समजून घेण्यास मदत करतील.

टक्केवारी: नमुना प्रश्न 

Q1. विद्यार्थ्यांच्या वर्गात, शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थाचे गुणोत्तर 5:3 आहे. एका परीक्षेत, ग्रामीण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत 40% जास्त आहेत. जर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 92 असतील, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती असतील?

(a) 122

(b) 102

(c) 92

(d) 112

उत्तर (d)

स्पष्टीकरण:

टक्केवारी: सूत्र, युक्त्या आणि नमुना प्रश्न, अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_3.1

Q2. शहरातील 40% लोक निरक्षर आहेत आणि 60% गरीब आहेत. श्रीमंतांमध्ये, 10% निरक्षर आहेत. अशिक्षित गरीब लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?

(a) 36

(b) 60

(c) 40

(d) 50

उत्तर (b)

स्पष्टीकरण:

टक्केवारी: सूत्र, युक्त्या आणि नमुना प्रश्न, अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_4.1

Q3. 1500 चे M% = 360 तर M = किती ? 

(a) 24%

(b) 30%

(c) 33%

(d) 29%

उत्तर (a)

स्पष्टीकरण:

टक्केवारी: सूत्र, युक्त्या आणि नमुना प्रश्न, अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_5.1

Q4. ताज्या फळांमध्ये 68% आणि सुक्या फळामध्ये 20% पाणी असते. 100 किलो ताज्या फळांपासून किती किलो सुके फळ मिळेल?

 (a) 80

(b) 60

(c) 40

(d) 20

उत्तर (c)

स्पष्टीकरण:

टक्केवारी: सूत्र, युक्त्या आणि नमुना प्रश्न, अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_6.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

'टक्केवारी' दर्शविण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते?

टक्केवारी दर्शविण्यासाठी '%' चिन्ह वापरले जाते.

टक्केवारी या शब्दाचा अर्थ काय?

टक्के म्हणजे "प्रत्येक 100 साठी" किंवा "100 पैकी."

जर सुखबीरने 12 पेन एका रुपयात विकले आणि त्याचे 20% नुकसान झाले. जर त्याला 20% नफा मिळवायचा असेल तर तो एका रुपयाला किती पेन विकतो?

जर त्याला 20% नफा मिळवायचा असेल तर त्याला आठ पेन एका रुपयात विकावे लागतील.