Table of Contents
महापारेषण पुणे भरती 2023
महापारेषण पुणे भरती 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, मंचर येथील एकूण 19 शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या भरतीसाठी महापारेषण पुणे भरती 2023 जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अप्रेंटीस इंडियाच्या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. आज या लेखात आपण महापारेषण पुणे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती दिली आहे.
महापारेषण पुणे भरती 2023: विहंगावलोकन
एकूण 19 शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी महापारेषण पुणे भरती 2023 जाहीर झाली असून खालील तक्त्यात महापारेषण पुणे भरती 2023 चे विहंगावलोकन दिले आहे.
महापारेषण पुणे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | महापारेषण पुणे |
भरतीचे नाव | महापारेषण पुणे भरती 2023 |
पदाचे नाव |
शिकाऊ उमेदवार |
एकूण रिक्त पदे | 19 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | पुणे जिल्हा |
अधिकृत संकेतस्थळ |
www.mahatransco.in
|
महापारेषण पुणे भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
महापारेषण पुणे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.
महापारेषण पुणे भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
महापारेषण पुणे भरती 2023 ची अधिसूचना | 20 सप्टेंबर 2023 |
महापारेषण पुणे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 20 सप्टेंबर 2023 |
महापारेषण पुणे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2023 |
महापारेषण पुणे भरती 2023 अधिसूचना
म.रा.वि. पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु मंचर कार्यालयामार्फत शिकाऊ उमेदवार (Apprentice) संवर्गातील पदांच्या भरतीसाठी महापारेषण पुणे भरती 2023 जाहीर झाली आहे. महापारेषण पुणे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महापारेषण पुणे भरती 2023 अधिसूचना
महापारेषण पुणे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
महापारेषण पुणे भरती 2023 अंतर्गत एकूण 19 शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) पदाची भरती होणार आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) | 19 |
महापारेषण पुणे भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
महापारेषण पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
- उमेदवारानी आय.टी.आय (इलेक्ट्रिकल) कोर्स केलेला असावा
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे (मागासवर्गीय उमेदवारास 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.)
महापारेषण पुणे भरती 2023: ऑनलाईन अर्ज लिंक
महापारेषण पुणे भरती 2023 साठी उमेदवारांना अप्रेन्टिस इंडियाच्या संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.ina वर नोंदणी करणे आवश्यक आहे. अप्रेन्टिस इंडिया मधील आस्थापना क्रमांक E01212700050 वर उमेदवारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. महापारेषण पुणे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
महापारेषण पुणे भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
महापारेषण पुणे भरती 2023 मधील महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी इयत्ता 10वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
- आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र / आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र (EWS) (स्कॅन कॉपी) सादर करणे आवश्यक आहे.
- कामाचे ठिकाण:- अउदा संवसु विभाग, मंचर अंतर्गत 220 केव्ही उपकेंद्र ब्रिजस्टोन (चाकण)/आळेफाटा / रांजणगांव / काठापूर/ चाकण फेज-2 तसेच 132 केव्ही उपकेंद्र व्हर्लपूल (रांजणगांव)/एस.पी.एस.एल./पिंपळगांव/नारायणगांव/शिरुर / चाकण/ सणसवाडी / कुरुळी / कवठे यमाई.
- प्रशिक्षण कालावधीत कंपनी नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप