Marathi govt jobs   »   Job Notification   »   महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023, अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023: इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर म्हणजेच महाज्योतीने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 जाहीर केली आहे. सदर योजनेचा लाभ हा हाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना होणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या लेखात महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 बद्दल सर्व सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अर्ज प्रक्रिया, योजनेचे स्वरूप, कागदपत्रे इ गोष्टींचा समावेश आहे.

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023: योजनेचे स्वरूप 

महाराष्ट्र अराजत्रित गट ‘ब’ पुर्व परीक्षा- 2023 उत्तीर्ण झालेल्या व महाराष्ट्र अराजत्रित गट ब मुख्य परिक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य महाज्योती मार्फत देण्यात येईल.

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023: पात्रता 

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023चा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती ती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
  • विद्यार्थी हा महाराष्ट्र अराजत्रित गट ‘ब’ पुर्व परीक्षा-2023 उत्तीर्ण झालेला असावा.
  • ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे. अश्या उमेदवारांना सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे :-

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 साठी अर्ज करताना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.

1. आधार कार्ड

2. जातीचा प्रमाणपत्र

3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

4. पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र

5. बॅकेचे तपशील (बॅक पासबुक किंवा रद्द चेक)

6. महाराष्ट्र अराजत्रित गट ‘ब’ पुर्व परीक्षा-2023 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.

अर्ज कसा करावा?

1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Maharashtra Non-Gazetted Group B (ASO, PSI, STI) Services – 2023″ Main exam यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023: अर्ज लिंक 

उमेदवार खाली दिलील्या लिंक वर जाऊन महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 साठी अर्ज करू शकतात.

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 अर्ज लिंक

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023: अटी व शर्ती

1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 15/11/2023 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही,

3. जाहिरात रह करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार है व्यवस्थापकीय संचालक ज्योती यांचे राहील.

4. चालू आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारचा एकरकमी लाभ घेतलेला विद्यार्थी या योजनेकरीता पात्र राहणार नाही.

5. महाज्योती मार्फत MBA-CAT/CMAT-CET, UGC-NET SET, मिलीटरी भरती प्रशिक्षण यापैकी नाही. चालु योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी या योजनेकरीता पात्र राहणार

6. बँक खाते फक्त अर्जदाराच्या नावाचेच असावे, नातेवाईक/पालक/मित्र यापैकी आढळल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज महाज्योती, नागपूर मार्फत रद्द करण्यात येईल..

7. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा. 0712-2870120/21.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 मध्ये किती रुपयांची मदत मिळू शकते ?

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 मध्ये रु. 10,000 पर्यंतची मदत मिळू शकते.

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

महाज्योती अर्थ सहाय्य योजना 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.