Table of Contents
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023: आज दि. 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ची घोषणा केली आहे. मराठी सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांचे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 चे संक्षिप्त विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023: विहंगावलोकन | |
पुरस्काराचे नाव | महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 |
कोनातर्फे दिला जातो | महाराष्ट्र सरकार |
पुरस्काराचे स्वरूप | 25 लाख रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र |
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023चे विजेते | श्री. अशोक सराफ |
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय व अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
निकष:
- महाराष्ट्र भूषण पुरस्कारचा मानकरी होण्यासाठी संबंधित व्यक्तीने त्या क्षेत्रात किमान 20 वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी.
- 2012 आधी हा पुरस्कार फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींना देण्यात येत असे, परंतु सप्टेंबर 2012 मध्ये यातील नियमांमध्ये बदल करून हा पुरस्कार परप्रांतीयांना सुद्धा देण्यात येतो परंतु त्यासाठी संबंधित परप्रांतीय व्यक्तीने महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य करणे गरजेचे आहे.
स्वरूप
- सुरुवातीला महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप रुपये 5 लाख रोख आणि प्रशस्तीपत्रक असे होते. परंतु या वर्षी या पुरस्काराचे स्वरूप, रुपये 25 लाख रोख, शाल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी
खालील तक्त्यात आत्तापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी दिली आहे.
वर्ष | नाव | क्षेत्र |
---|---|---|
1996 | पु. ल. देशपांडे | साहित्य |
1997 | लता मंगेशकर | कला, संगीत |
1999 | विजय भटकर | विज्ञान |
2000 | सुनील गावसकर | क्रीडा |
2001 | सचिन तेंडुलकर | क्रीडा |
2002 | भीमसेन जोशी | कला, संगीत |
2003 | अभय बंग आणि राणी बंग | समाजसेवा व आरोग्यसेवा |
2004 | बाबा आमटे | समाज सेवा |
2005 | रघुनाथ माशेलकर | विज्ञान |
2006 | रतन टाटा | उद्योग |
2007 | रा.कृ. पाटील | समाजसेवा |
2008 | नानासाहेब धर्माधिकारी | समाजसेवा |
2008 | मंगेश पाडगावकर | साहित्य |
2009 | सुलोचना लाटकर | कला, सिनेमा |
2010 | जयंत नारळीकर | विज्ञान |
2011 | अनिल काकोडकर | विज्ञान |
2015 | बाबासाहेब पुरंदरे | साहित्य |
2021 | आशा भोसले | कला, संगीत |
2022 | अप्पासाहेब धर्माधिकारी | समाजसेवा |
2023 | अशोक सराफ | कला |
अशोक सराफ यांची कारकीर्द
अशोक सराफ हे मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. चित्रपटांबरोबरच त्यांनी आजवर अनेक नाटकांत ही काम केले आहे. त्यांची ओळख विनोदी अभिनेता म्हणून जरी असली तरी त्यांनी असंख्य गंभीर भूमिकादेखील गाजवल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 1969 मध्ये झाली आणि ती अजून देखील सुरु आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘पांडू हवालदार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ असे मराठी चित्रपट व ‘हम पांच’ सारख्या हिंदी मालिकांमधून नेहमीच त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
अशोक सराफ यांना मिळालेले इतर पुरस्कार:
- 2017 मध्ये सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
- सराफ यांनी 4 हून अधिक फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले आहेत
- मराठी चित्रपटांसाठी 10 महाराष्ट्र शासन पुरस्कार.
- “राम राम गंगाराम” (1977) साठी, फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
- त्यांना ‘पांडू हवालदार’ या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला.
- त्यांना “सवाई हवालदार” या चित्रपटासाठी स्क्रीन अवॉर्डमध्ये पुरस्कार मिळाला.
- त्यांना “मायका बिटुआ” साठी भोजपुरी चित्रपट पुरस्कार मिळाला.
- महाराष्ट्राचा फेव्हरेट कोनमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला.